द्विधेत कर्तव्याच्या अन प्रेमाच्या

Submitted by रसप on 9 October, 2012 - 23:57

आकाशातुन झाला होता एक वेगळा तारा
पापणीस चुकवून वाहिला जेव्हा चुकार पारा..
आरपार हृदयाच्या गेली एक वेदना हळवी
कुणास ठाउक गदगद झाला कसा कोरडा वारा

ह्याच दिशेला दूरवर तिथे माझे घर थरथरते
छताकडे बघतो बाबा आई केवळ गहिवरते
मी सापडलो द्विधेत कर्तव्याच्या अन प्रेमाच्या
भगवंता रे सावर आता मन माझे भिरभिरते

ह्या जन्मी मी मायभू तुझे सारे ऋण फेडावे
पुढील जन्मी हक्काचे डोक्यावर छत बांधावे
एक क्षण तरी बाप जगावा चिंता सोडुन साऱ्या
एकदाच आईने माझ्या आनंदाश्रू प्यावे

यमदेवा, तू चाल पुढे मी निरोप घेउन येतो
सहकाऱ्यांना विजयासाठी अभिष्टचिंतन देतो
जाता जाता घरी एकदा क्षणभर जावे म्हणतो
त्या म्हाताऱ्या दोन जिवांचे अखेर दर्शन घेतो

....रसप....
९ ऑक्टोबर २०१२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जितू किति ग्रेट विशय निवडलास आज कवितेकरता
अभिनन्दन
कविता केलीसही उत्तम

चुकार पारा..>>मस्त

मी सापडलो द्विधेत कर्तव्याच्या अन प्रेमाच्या>>>>
माझ्या आयुष्यात जस्ट अशीच स्थिती आलीय आत्ता फक्त जरासाच बदल आहे
मी सापडलो द्विधेत कर्तव्याच्या अन कर्माच्या

एकदाच आईने माझ्या आनंदाश्रू प्यावे >>>> सर्वात जास्त आवडली ही ओळ .......... इतकी की जितका तुला माझा "लाव ना आता स्वतःला विठ्ठला । लावना माझ लळा तू लाव ना !! "...........हा शेर आवडला होता !

धन्स रे या कवितेसाठी

वैवकु,

आय थिन्क... तो शेर -

'ऐक ना आता स्वतःला विठ्ठला
लाव ना माझा लळा तू लाव ना..'

असा होता..

===========================

धन्यवाद !

अरे य्यार रियली ...काय सही आहेस तू जितू !! होहो तसाच आहे तो शेर तू म्हणतोय्स तसा !!
सॉरी माझा शेर मीच विसरलो ..सॉरी जितू

युद्धासाठी निघालेल्या सैनिकाची आहे का ही? छान जमली आहे. >>> +१००.. बेस्टच आहे ही रचना...