ह्या कन्नडीगांना आलाय माज

Submitted by पाषाणभेद on 11 October, 2012 - 02:48

ह्या कन्नडीगांना आलाय माज

ह्या कन्नडीगांना आलाय माज
तो माज आता काढू मोडून
अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ||

लई तुरूंगवास करवला रे तुम्ही
काय सहन नाही केलं आम्ही
मराठीसाठी किती रक्त वाहवलं
ह्या कन्नडीगांना आम्हां डिवचलं
लई झालं आता
उठला मराठी माणूस पेटून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||१||

अरे गल्या-बोळांना नावं आमची
सार्‍या दुकानांना नावं आमची
सार्‍या शाळा रे आमच्या आमच्या
सारी आडनावं आमची आमची
बेळगाव महानगरपालीका आमची
एका ठरावानं होईल का तुमची?
आता चाला तोडू कर्नाटक विधान भवन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||२||

आहे जसं कन्नडी शासन मुजोर
त्याला सामील केंद्रशासन कमजोर
खेळी दोघांनी केली विधानभवनाची
साक्ष आहे जशी उंदराला मांजराची
बास झालं लई झालं
बंद करा तुमचं दडपशाहीचं संमेलन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||३||

या सीमेपाई एक पिढी गेली की रं आमची
ही सारी जमीन आमच्या बापजाद्याची
जमवून सारी फौज मराठी माणसाची
ईच्छा पुरी करू महाराष्ट्री जाण्याची
सांगून ठेवतो मुस्कटदाबी करू नका
उगा आमच्यावर वार करू नका
महाराष्ट्रात जाण्यासाठी
आमची तर फोडूच पण तुमचीबी डोकी फोडू
सांगून ठेवतो मिशीला पिळ देवून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||४||

-(अपुर्ण - योग आलाच तर पुर्ण करेन)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण सार्‍या 'ऑनलाईन मराठी कम्युनिटीजनी' मुजोर कर्नाटक, मरगळलेले मराठी नेते अन नाकर्ते केंद्रशासन यांचा ऑनलाईन निषेध करायला हवा.

-पाषाणभेद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आंबा, सीमाभागात जर तुम्ही गाडीतून डोळे मिटून जरी जात असला तरी महाराष्ट्रातून कर्नातकात आल्याचे वाढलेल्या धक्क्यांवरून जाणवते. नॅशनल हायवे सोडून जरा राज्यांच्या अखत्यारित येणार्या रस्त्याम्वरून जाउन बघा.

किंवा तुम्हाला काही सरकारी कामे करून घ्यायचि असतील नी तिथले सा ..र केवळ कानडीत बोला असा अट्टहास करत असतील तेव्हा अडाणी असल्याचे फिलींग येते ते अनुभवा. किवा घरात , शेजारी मराठी बोलत असुनही जेव्हा कोणी घरातला आजारी पडतो तेव्हा भाषा येत नसल्याने जिल्ह्या रूग्णालयात न नेता पेशंटला मराठी मुलखातल्या हॉस्पिटलात न्यावे लागते तेव्हा काय त्रास होतो ते अनुभवा.
इथली काही गावे महाराष्ट्राला किम्वा आंध्राला इतकी सांस्कृतिक नी भौगोलिक दृष्ट्याही जवळ आहेत की इतकं लाम्बवर सरकारी कामासाठी किंवा फ्री हॉस्पिटलायजेशनसाठी भाषाही येत नसताना त्याना तांगाडवणं माणूसकीरहित आहे.

सर्वप्रथम पाषाणभेद यांचे अभिनंदन. एक विनंती की ही कविता कानडीत भाषांतरित करुन आपल्या ब्लॉगवर टाकावी.

आणि - जाउद्या, सोडूनद्या असे म्हणून मराठी भाषिकांना अधिकाधिक नेभळट बनवून त्यांच्या भावनांचा व अस्मितांचा गळा दाबू पाहणार्‍या सगळ्यांना माझा 'गेट वेल सून' Happy

आंबा, सीमाभागात जर तुम्ही गाडीतून डोळे मिटून जरी जात असला तरी महाराष्ट्रातून कर्नातकात आल्याचे वाढलेल्या धक्क्यांवरून जाणवते. नॅशनल हायवे सोडून जरा राज्यांच्या अखत्यारित येणार्या रस्त्याम्वरून जाउन बघा.

आम्ही सीमाभागतच आहोत. माहीत आहे सगळे ... कन्नड येत नाही म्हणून कन्नड लोकांच्या दवाखान्यात न जाणे, हा लोकांचा वेडेपणा आहे. समजा, त्यातील एखादे कुटुंब आफ्रिकेला गेले, तर आफ्रिकन भाषा शिकली असती ना? मग इतक्या वर्षात कन्नड का नाही शिकले? मेडियम कन्नड ठेऊन सीमाभागात सेकंड ल्यांग्वेज मराठी घेता येत की. व्यवहारात अडायचं काही कारण नव्हतं. कन्नड शिकलं तरी उद्या हेड काउंटिंग समजा झालेच, तुम्ही तुमचे मत 'मराठी' म्हणून नोंदवू शकालच की!

आजूबाजूला जी भाषा चालते, ती न शिकणं हा वेडेपणा नाही का? का, उद्या ते मुंबईतले नेते तुम्हाला पावला पावलाला ट्रान्स्लेटर म्हणून मदत करणार आहेत? ते जर तुमच्या सोबत राहून प्रत्येक कन्नड बोर्ड तुम्हाला मराठीत सांगायची जबाबदारी घेत असतील, तर मीही त्यांचे ऐकले असते. अन्यथा , कन्नड शिकणेच पसंत केले असते. Proud

पाषणभेद,

नविन, आपण नक्की ठाम आहात का की तो सनदी अधिकारी होता?
मला तरी असे वाटते की तो जन्माने कानडी सनदी अधिकारी असावा. आपल्याकडे काय माहिती आहे ? ( माझा अंदाज आहे आपली माहिती खरी असेल )

हे का घडले असावे ? याचा अंदाज सांगा.

कर्नाटक राज्याची निर्मीती झाली तेव्हा कर्नाटकाला सुपीक असा जिल्हा नव्हता. त्या काळात धान्याच्या बाबतीत राज्य बंदी होती. म्हणुन बेळगाव हा समृध्द जिल्हा जोडला असावा.

तसेच खनीजांच्या बाबतीत बळ्ळारी समृध्द असल्याने ते राज्याचे नगदी उत्पन्नाचे साधन या दुरदृष्टिने बळ्ळारी जोडला असावा.

इतकी अक्कल राजकीय नेत्यांना असेल असे वाटत नाही. कर्नाटक राज्याचा मुख्य सचिवाने अनेक वर्षांच्या महसुलाच्या अभ्यासाने हे केले असावे.

जामोप्या , वादासाठी वाद तर कोणीही घालु शकतो.
म्हणून बास.
आणि मी माझ्या पहिल्या पोस्तमध्ये म्हटल्याप्रमाणे मला दररोज भाषा हा जिवनमरणाचा प्रश्न आहे इथपासून कुठलिही भाषा असलि तरिहि काय फरक पडतो इथपर्यंत सगळे अनुभव येतात.
व्यक्तिशः मला कानडी लिहिता वाचता बोलता येतं पण बहुसंख्य जनतेची मुळ भाषा काय याचा विचार गावे राज्याला जोडताना व्हायला हवा होता असे वाटते.

तसे कर्नाटकही साऊथ्वेस्टच्या केरळला नी नोर्थ ईस्टच्या आंध्राला जोडल्या गेलेल्या गावांबद्दल बोंबा मारत असतेच.

नविनजी, असलाच प्रकार महाराष्ट्राचा अहवा-डांग भाग गुजरातला जोडतांना केला गेला आहे.

>>>> मेडियम कन्नड ठेऊन सीमाभागात सेकंड ल्यांग्वेज मराठी घेता येत की.
अंबाजी, अहो तेथील मुळच्या मराठी लोकांची भाषा मराठीच होती. कर्नाटकाला तो भाग जोडल्या गेल्याने त्यांच्यावर कन्नडीची 'सक्ती' होतीये.

अन सर्वात महत्वाचे म्हणजे तो ५६ वर्षांपुर्वीचा ठराव.
अधीक माहीतीसाठी: कोणत्याही प्रांताच्या सीमा ठरवतांना त्या भागांना तसा ठराव करता येतो. (आताच्या 'दोन तालूक्यात कोठे प्रांत कार्यालय हवे' हे ज्वलंत उदाहरण घ्या महाराष्ट्रातले.)

माझी सासूरवाडी महाराष्ट्राच्या सीमेवरची आहे. माझ्या चुलतसासर्‍यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी ते तेथील सरपंच असतांना 'महाराष्ट्रात सामील होण्याचा' ठराव केला होता अन आता त्यांचे गाव महाराष्ट्रात आहे.

मला सांगा, कन्नडी लोकसंख्या बेळगावला काही वर्षांनी वाढली असतांना हा असला ठराव पास होईल काय?
त्या काळाची स्थिती लक्षात का घेत नाही तुम्ही? अन आंदोलने तर तेव्हापासून चालू आहेत, आतापासून नाही.

पाषाणभेद,

उत्कृष्ट माहीती. लेखाबद्दल आभार!

मराठ्यांचे एतद्देशीय राज्य ही दिल्लीची खरी पोटदुखी आहे. काळ्या इंग्रजांना सर्वात जास्त भीती महाराष्ट्राची वाटते. त्यामुळे मराठी आणि मराठ्यांचे खच्चीकरण करणं त्यांना अतिशय आवडता उद्योग आहे. हे अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून दिसतंय. याला सर्वांकष उत्तर शोधलं पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

या विषयावर गडकरी, मुंडे , बोलके पोपट माधव भंडारी,तावडे यांची मते नाही समजली. त्यांची सोईस्कर दातखीळ बसली असेल आता...
एनी वे येडिर्युअप्पा डीसेम्बरमध्ये भाजप सोडणार आहेत. तोपर्यन्त ते भाजपच्या या महाराष्ट्र विषयक धोरणाचा पाठपुरावा करणार का?

हे अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून दिसतंय. याला सर्वांकष उत्तर शोधलं पाहिजे.

दिल्लीला आव्हान देऊन तंजावर पर्यंत आपले बस्तान बसवणारे छ. शिवाजी महाराज.

नेहरुंचा/इंदिराजीच्या काळात सर्व महत्वाची खाती उत्तम चालवलेले सर्व मान्य नेते मा यशवंतराव चव्हाण हे इंदिराजींना विरोध करण्याची क्षमता असलेले मान्यवर होते.

राजीव गांधी आणि सध्या सोनीया गांधी यांना परकीय नागरिकत्व या मुद्यावर विरोध करणारे एकमेव मा. शरद पवार.

आता अण्णा हजारे.

मराठी माणसे निर्भीड असतात. हे खरे कारण

अधीक माहीतीसाठी: कोणत्याही प्रांताच्या सीमा ठरवतांना त्या भागांना तसा ठराव करता येतो. (

पाभे महाराज,

समजा ५० वर्षापूर्वी बेळगाव महाराष्ट्रात आणा, असा ठराव लोकानी केला. तो मानला आणि महाराष्ट्राला जोडला.

आता ५० वर्षात कन्नड सबलीकरणाची क्रिया समजा तशीच राहिली आणि २०१० साली त्या लोकानी पुन्हा ठराव आणला की आम्हाला कर्नाटकात जोडा.. तर काय केले असते?

असा ठराव एकदाच करावा, असा नियम आहे का? तसे नसेल, आणि आजची स्थिती कन्नड सबल अशीच असेल, तरी तो १९६० चा जुना ठराव मोडीतच निघतो ना? लोकांचा कल हाच निर्णयाचा बेस असेल, तर लोकशाहीनुसार नवा कल मान्य करायचा की ५० वर्षापूर्वीचा ठराव लोकांच्या माथी मारायचा?

यावर राज ठाकरे यांनी दिलेले मत मला खूप आवडले होते. Happy कुणाला त्याची लिंक मिळाल्यास द्या इथे.

बेळगाव महाराष्ट्रात आणून नक्की काय साध्य होणार आहे कुणास ठाऊक? इथे महाराष्ट्रतल्याच मराठी शाळांची (शासकीय) अवस्था बघवत नाही.

तुम्ही ज्या भागात राहत असाल तिथली भाषा शिकण्यामधे नक्की काय प्रॉब्लेम आहे? आम्ही जातीने कानडी आहोत. पण गेल्या तीन पिढ्यांपासून आमचे वास्तव्य कर्नाटकात कमी आणि गुजरात, महाराष्ट्रात जास्त आहे. तरीदेखील आम्ही घरात कानडी बोलतो. कानडी भाषा ही मातृभाषा आहे याचा अभिमान घरातच ठेवतो आणि बाहेर अस्खलित मराठी बोलतो. आजवर मला भाषेवरून कधीही मेजर प्रॉब्लेम आलेला नाही. अगदी कट्टर भाषाभिमानी तमिळनाडूमधे गेले दोन महिने राहत असूनही. सध्या मीच तमिळ शिकत आहे. पण म्हणून मी कानडी अथवा मराठी या दोन्ही भाषा विसरेन असे तर होत नाही ना? Happy उलट एखादी नविन भाषा शिकण्याने माझाच फायदा होतो.

बाकी काडी हवीच असेल तर भाषावार प्रांतरचना ही नेहरूंची कल्पना होती ना???

कन्नडची सक्ती केली काय आणि मराठीची केली काय, इंग्रजी शिकून परदेशात नोकर्‍या करुन जोडे
झिजवणे, अंतिम ध्येय हेच असल्यावर अभ्यासात एक भाषा इंग्रजी असल्याशी मतलब! उरलेल्या
भाषा मराठी की कन्नड यानी नेमका काय फरक पडतो?

पैलवानमामा, माझे हे वाक्य दिसायला विनोदी आणि उपहासात्मक वाटत असले, तरी ते वास्तव आणि सत्य आहे.

दहा वर्षापूर्वी आमच्या गावात इंग्लिश मेडियम नव्हते. सगळे मराठी मेडियमात शिकायचे.

पण आता परिस्थिती बदलली आहे. सुशिक्षित आणि पैसेवाले लोक इंग्लिश मेडियमलाच जातात. अगदी पहिली/ किंवा पाचवीपासून.

सुशिक्षित पण मध्यमवर्गीय लोकानाही नवा पर्याय मिलाला आहे.. सेमि इंग्लिश नावाचा.. त्यामुळे सगळा बुद्धिमान वर्ग इंग्लिश आणि सेमि मध्येच जातो.

मराठी माध्यमात सगळा उर्वरीत ( गाळ ? म्हणू का? ) भाग असतो, असा दिव्य भाग की ज्याना सातवीत गेले तरी स्वतःचे नाव मराठीत/ इंग्रजीत कशातच लिहिता येत नाही.

एक ना एक दिवस इंग्रजीतच शिकायचे आहे, त्याचीच ही तयारी आहे ना? महाराष्ट्रात असे, तर कर्नाटकातही तसेच असणार ना?

असेच असेल, तर महाराष्ट्रात आले काय आणि कर्नाटकातच बसले काय? काय फरक पडतो ?

मिसळपावावरचा प्रतिसाद साभार :

राज्यांच्या सीमा ठरवताना खेडे हा घटक मानून सलगतेच्या दृष्टीने सीमा ठरविल्या गेल्या होत्या. निपाणीमध्ये आणि बेळगावमध्ये मराठी बहुसंख्या आहे हे मान्य.पण आजूबाजूच्या कन्नडबहुल प्रदेशात जर निपाणी आणि बेळगाव ही मराठी बेटे असतील तर मात्र अशी बेटे महाराष्ट्रात सामील होऊ शकणार नाहीत. निपाणीहून बेळगावही ७०-८० किलोमीटरवर आहे.मधल्या खेड्यांमध्ये लोकसंख्येचे भाषिक वर्गीकरण कसे आहे याविषयी माहिती आहे का? याच न्यायाने अक्कलकोट हे महाराष्ट्रातील इतर मराठीबहुल प्रदेशातील कन्नड बेट झाले आणि त्यामुळेच अक्कलकोट कर्नाटकात सामील होऊ शकले नाही/शकणार नाही. तेव्हा अनुक्रमे बेळगाव आणि अक्कलकोट पालिकांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकात सामील व्हायचे ठराव पास केले तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही

>>२०१० साली त्या लोकानी पुन्हा ठराव आणला की आम्हाला कर्नाटकात जोडा.. तर काय केले असते?

अहो अंबाजी, ती सवलत फक्त विभाजनाच्या किंवा एकीकरणाच्या वेळीच मिळते हो. जरा समजून घेत चला.

सीमाभागातले लोक इतकेही बधीर नाही की अवास्तव मागणी करतील.

ती सवलत फक्त विभाजनाच्या किंवा एकीकरणाच्या वेळीच मिळते हो. जरा समजून घेत चला.

तेच तर मी विचारतोय, विभाजन किंवा एकीकरण कितीही वेळा होऊ शकते ना?

आणि समजा, सवलत एकदाच असते.. तरीही तो नगरपालिकेचा ठराव असतो ना? ठराव म्हणजे त्यांची इच्छा... त्यांच्यावरती असलेले राज्य सरकार तो ठराव नामंजूर करू शकते.

खालच्या बॉडीचा ठराव वरच्या बॉ डीने मंजूर केलाच पाहिजे असे कुठे आहे?

गंमत आहे..
राज ठाकरे जेव्हा बिहारींना, युपीवाल्यांना 'मराठी' शिकण्याची सक्ती करावी म्हणतात तेव्हा त्यांना वेड्यात काढणारे, इथे मात्र 'कर्नाटकात' (खरेतर बेळगावात) गेल्यावर कन्नड शिकायलाच हवी म्हणताहेत Wink

बाकी चालु द्या ! Lol

विशालभाऊ त्यांना डबल ढोलकी म्हणतात... असो! Happy

आजोबांनी सुरु केलेल्या आंदोलनाचं महत्व, त्यामागची जनभावना इत्यादिंचा विचार न करता अश्या बेजबाबदार विधानाची तुलना, ६२ च्या युद्धात चीनने गिळंकृत केलेल्या भू भागासंबंधी केल्या गेलेल्या या विधानाशी होऊ शकेल...

"वहा तो कुछ उगता हि नहि!"

असं दूर्बळ नेतृत्व, हेच आपलं दूर्भाग्य...

चक्रमचाचा,

>> कन्नडिगांना दुखावनारा माज हा शब्द काढाल का ?

सगळ्या कन्नडिगांना माज आलाय असं सूचित करायचं नाहीये (बहुतेक). पण काही लोकांना नक्कीच माज चढलाय. असे मुजोर लोक कन्नडिगांना पुढे करून स्वत: मागे लपलेत.

आ.न.,
-गा.पै.

कन्नड शिकायलाच हवी म्हणताहेत

हो म्हणणारच.. नाही तर बेळगावातल्या मर्हाट्यांचं जीणं मुश्किल होईल....

मुंबईतल्या भैय्याना मराठी शिकायची गरज नाही, कारण त्यांचे नेते मुंबईतच बसलेत.... ते त्यांना भाषा समजावून देतील..... तसे राज ठाकरेनीही उठून बेळगावात जाऊन रहावे आणि आपल्या लोकाना सहाय्य करावे. Proud मग बेळगावी मर्हाट्यांनी कानडी नाही शिकलि तरी चालेल.... पण तोपर्यंत तरी त्या लोकान्नी स्वतःच कन्नड शिकून स्वतःचीच मदत करावी, हे उत्तम नै का? Biggrin

राजाण्णा, बेळगावी यावागे होगती? निम्म भाळे मनशागे निम्दं जरुरत अदं.. आल्ले लगुलगु होगलिके बेकु .. Proud

--- माइनकाई ಮಾವು

( माईनकाई म्हणजे आंबा.. उगाच काईच्या काई म्हणू नये. Biggrin )

हाहा.... मला कळतच नाहिये, कानडी लोकांची गोष्ट..... बेळगाव तर पहिजेच्...पण खिल्लि पण उडवतात त्यांची.... म्हणजे अस बघा....माझा नवरा म्हैसुर चा आहे.... सासरची मंडळी नेहमी उत्तर कानडी लोक कशी loud (म्हणजे उत्तर कर्नाटका आणि त्या वरची.... त्यात मी पण आलेच Wink ) याचे जागोजाग उदाहरण देत असतात... उत्तर कानडी लोकांचे कानडी कसे मागास हे पण आलेच त्यात.... बर हे फक्त सासरच्या मंडळीचे आहे असे नाही, एकुणातच हा द्रुष्टिकोन सगळ्याच दक्षिण कानडी लोकांचा आहे.
मदितार्थ काय कि, सगळेच politically motivated आहे.

गम्मत अशी कि, तिकडे सीमप्रश्ना वर वाद सुरु झाला कि आमच्या कडे युद्ध सुरु होते... Wink

मुंबईतल्या भैय्याना मराठी शिकायची गरज नाही, कारण त्यांचे नेते मुंबईतच बसलेत.... ते त्यांना भाषा समजावून देतील..... तसे राज ठाकरेनीही उठून बेळगावात जाऊन रहावे आणि आपल्या लोकाना सहाय्य करावे. >>>

त्यासाठी राज ठाकरेच कशाला पाहीजेत मग? बेळगावात पण मराठी लोक, नेते आहेतच की? मग तिथल्या मराठी लोकांना तरी कन्नड शिकायची गरज काय?
काहीही मुर्ख विधाने करु नका आंबा !

माझा नवरा कानडी आहे. त्याचे बहुसंख्य नातेवाईक उत्तर कर्नाटाकातले, त्यातले बरेच बेळगावात राहतात. यातली जवळजवळ सगळी मंडळी मोडक्यातोडक्या का होईना, पण मराठीमध्ये बोलतात माझ्याशी, कारण मला कन्नड येत नाही. सरसकट सगळ्या कन्नडिगांना माज आलाय हे विधान टोकाचं आहे.

मुळात एका गावात एक भाषा संपून एकदम दुसर्‍या भाषेचा प्रदेश सुरू होणं कसं शक्य आहे? प्रांतांच्या सीमा कश्याही ठरवल्या, तरी थोड्यातरी सीमाभागातल्या लोकांना दुसर्‍या भाषेच्या प्रांतात जायला लागणारच. बेळगाव महाराष्ट्रात यावं म्हणून आंदोलन करण्याऐवजी तिथे मराठी शाळाही चालल्या पाहिजेत ही मागणी जास्त योग्य होईल असं वाटतं.

माझी बायको कन्नड आहे, मी मराठी आहे. गुण्यागोविन्दाने रहातो . दोघानीही दोन्ही भाषा शिकल्या. दोघानाही दोन्ही भाषांचा अभिमान आहे. मला द रा बेंद्रे आवडतात, शिवराम करन्थ आवडतात. तिला पु ल अन कुसुमाग्रज आवडतात.
असे अनेक लोक बेळगावात आहेत.
कुणाला कसला माज आलाय ते त्या माजकर्त्यानाच ठावूक.
कामाला लागा अन देशाची परिवर्तन करूया.

Pages