Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 6 October, 2012 - 12:49
दर्शन रांग लांब पसरत
होती सरकत नम्रपणे
लक्ष घड्याळी चप्पल आठवत
उजळणी करत मागण्यांची
अदृष्यातून काही अपेक्षित
श्रद्धा म्हणत लाचारीला
जे न मिळे ते पकडू पाहत
लाच देत दिव्यत्वाला
आखडत वर पाकीट सावरत
भाव आणत खात्रीवाचून
मिळवण्याला इहपर लोकात
चाले धूर्त गुंतवणूक
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रांगेतले सारेच यात मोडतात असे
रांगेतले सारेच यात मोडतात असे नाही ,त्या भक्ताची माफी मागून ...
अगदी खरेय,छान मांडलेत
अगदी खरेय,छान मांडलेत विक्रांत.
ले.शु.
पुन: धन्यवाद भारतीजी
पुन: धन्यवाद भारतीजी