प्रवास अज्ञाताचा

Submitted by अज्ञात on 29 May, 2008 - 11:26

शब्दच का ?
नाही माहीती विचारही-
येती पटलावर कुठूनसे,.........
हा प्रवास अज्ञाताचा
मी वाटसरू,..........
खेळणे कुणाचे जाणत नाही,.......
रेखतो रेष येणारी,........
आकार शोधतो; अर्थ तोच त्याचा

घालतो हात काळजास कधि-
आकाश पिंजतो,....
न कळे कशास सारे,....
व्हृदयात कुणाची वाट पाहतो एकेरी,....
वाटेत थांबतो,.....
विसरूनी भान बिचारे

आता तुम्हीच शोधावे त्यातिल,
तुमच्या परसातिल वारे,....
हे उधाणलेले,
जिरून उरलेले वादळ,....
अवशेष उराचे गडगडणारे,....
मेघ बरसणारे !!

.............................अज्ञात
१२००,नाशिक

गुलमोहर: 

अरेच्चा, ही वाचायची राहुनच गेलि होती. कशी काय निसटली पठ्ठी?

कळलं का पल्ली,म्हणून मी "अज्ञात" आहे ?