अचानक जाग आली
कुशीवर वळायला गेले
तर जाणवला फरक
पिसासारखं हलकं झालय शरीर....
डोळे किलकिले करुन
कानात सगळी शक्ती एकवटून
अंदाज घेतला...
हे काय? केवढा जनसमुदाय जमलाय !
अहाहा... खमंग वास येत आहेत
माझ्या आवडीचे सगळे पदार्थ
कुणी आणि का बरे बनवले असतील?
हळुच उठले अंथरुणातुन
तर जाणवले कुणीतरी मला
झोपेत असतानाच छान गजरा माळलाय
आवडते अत्तरही शिंपडलेय
मागे पाहिले तर मला माझ्यासारखीच
आकृती दिसली माझ्या जागेवर
खटकले मनाला.. पण आले तरी बाहेर
माझे आवडते मंद संगीत लावलेय
कुणी माझ्या कविता वाचतेय
कुणी जुने फोटो न्याहाळतेय
आणि जो-तो फक्त माझ्याविषयीच बोलतोय
मी बोलायला गेले तर
माझ्याकडे दुर्लक्ष..
माझी हसतमुख आईही
चेहरा हसरा ठेवण्याच्या प्रयत्नात
जाऊन बिलगले तिला
पण का कुणास ठाऊक
तिनेही नेहमीप्रमाणे जवळ घेतलेच नाही
इतक्यात कुणीतरी म्हणाले
चला निघुयात....
नेत्र-देहदानाला उशीर नको
आणि आतून माझ्यासारखेच
दिसणारे ते शरीर उचलुन आणले...
हम्म.. आत्ता प्रकाश पडला
आपला हा फेरा पुर्ण झालाय तर...
आपणच तर ईच्छा दर्शवली होती
साश्रुनयनांनी नाही तर हसतमुख
अंतिम निरोप देण्याची...
ग्रेट डेअरिंग - प्रथमपुरूषी
ग्रेट डेअरिंग - प्रथमपुरूषी एकवचनी वापरून या विषयावर लिहिण्याचं..
आपणच तर ईच्छा दर्शवली होती
साश्रुनयनांनी नाही तर हसतमुख
अंतिम निरोप देण्याची...
>> इथेच कविता संपली असती तर अजून पोचली असती असं वैम..
छानच...... वेगळाच विषय,
छानच...... वेगळाच विषय, प्रभावी हाताळणी..... आवडली.
आनंदयात्रीनी म्हटलंय त्याप्रमाणे
अंतिम निरोप देण्याची....
इथे कविता संपली असती तर जास्त प्रभावी वाटली असती.
वर्षा ज ब री _____/\_____
वर्षा ज ब री _____/\_____
यात्री, उल्हासजी तुमची कल्पना
यात्री, उल्हासजी तुमची कल्पना आवडली.. बदल केलाय..
धन्स
वर्षा, छानच आहे कविता
वर्षा, छानच आहे कविता
छान जमलिये वर्षा
छान जमलिये वर्षा कविता.
विडंबनापेक्षा हटके
मला प्रतिक्रियाच सुचत नाहीये
मला प्रतिक्रियाच सुचत नाहीये वर्षू !
सुरेख मांडणी. वर्षे, पोटँशियल
सुरेख मांडणी.
वर्षे, पोटँशियल आहे तुझ्यात. विडंबनाबरोबर इकडेही लक्ष दे जरा
वर्षे,
वर्षे, काँप्लिमेंट्स!!!!!
लिहीती रहा...
छानच ! अगदी मनाला भिडणारी !!
छानच ! अगदी मनाला भिडणारी !!
वर्षा सुन्न करणारी कविता.
वर्षा
सुन्न करणारी कविता.
वर्षे, काय सुंदर कविता केली
वर्षे, काय सुंदर कविता केली आहेस... एकदम मनाला भिडली....
वर्षे, पोटँशियल आहे तुझ्यात. विडंबनाबरोबर इकडेही लक्ष दे जरा<< ++१००००
"आपले मरण म्या पाहीले डोळा"
"आपले मरण म्या पाहीले डोळा" नावाचा अभंग ऐकीवात आहे. आपली रचना याच धर्तीची आहे. सुंदर आहे. पण इतक्यात निरवा निरव नको. अजुन काही चारोळ्या, विडंबने होऊद्या कारण ( या टवाळा आवडे विनोद )
वर्षे, पोटँशियल आहे तुझ्यात.
वर्षे, पोटँशियल आहे तुझ्यात. विडंबनाबरोबर इकडेही लक्ष दे जरा >> शुकुला हजारवेळेला अनुमोदन. खरंच सिरियसली घे.
(No subject)
भारीये.....
भारीये.....
वर्षे, पोटँशियल आहे तुझ्यात.
वर्षे, पोटँशियल आहे तुझ्यात. विडंबनाबरोबर इकडेही लक्ष दे जरा<< ++१००००
धन्यवाद
धन्यवाद
नितिनचंद्र यांना अनुमोदन !
नितिनचंद्र यांना अनुमोदन !
सुंदर !
सुंदर !
आयला काय कविता आहे! वेगळीच
आयला काय कविता आहे! वेगळीच धाटणी एकदम!! खमंग पदार्थांचा उल्लेख कळला नाही!
-गा.पै.
मस्तये...........जबरि......
मस्तये...........जबरि......
वेगळ्या धाटणीची,
वेगळ्या धाटणीची, सुंदर्..आवडली
वर्षे, पोटँशियल आहे तुझ्यात.
वर्षे, पोटँशियल आहे तुझ्यात. विडंबनाबरोबर इकडेही लक्ष दे जरा<< ++१००००
बाकी, कविता वाचताना घशात आवंढा आला.
खमंग पदार्थांचा उल्लेख कळला
खमंग पदार्थांचा उल्लेख कळला नाही! >> गा.पै. माझ्या आवडीचे सगळे केलेले आहे. गजरा, अत्तर तसेच घरातले वातावरण
अक्के
सगळ्यांना धन्यवाद!
मस्ताय. याचं विडंबन केव्हा
मस्ताय. याचं विडंबन केव्हा ?????
याचं विडंबन केव्हा ????? >>
याचं विडंबन केव्हा ????? >> घे
http://www.maayboli.com/node/38421
कविता मनास भिडली
कविता मनास भिडली
खुपच छान!
खुपच छान!