ढिंगचिका चिक चिक

Submitted by Kiran.. on 2 October, 2012 - 07:51

ऑफीसच्या लॅन व्हॅन मॅनेजरशी दोस्ती ठेवा
नाहीतर येता जाता ३ जी मधे बॅलन्स ठेवा
दोन्हीही जमले नाही तर एक ऑप्शन ठेवा
माबोला विसरून जा नि कामाशी काम ठेवा

प्रगती होईल झक्क रे
तब्येत होईल टक्क रे

ढिंगचिका चिक चिक, ढिंगचिका चिका चिका

माबोवर येऊन तरी नेमके काय करणार लाला ?
बाहेर विचारते कोण? इथे येऊन फ्री बोला
मानसपक्षी वेडा भडभडे रिनाभितुला
कट्ट्यावर भरते रोज उखाळ्यांची पाखळी शाळा

सुमती होईल आपली रे
सोबत होईल तुपली रे

ढिंगचिका चिक चिक, ढिंगचिका चिका चिका

मळमळ वाढली तर इनो नेहमी जवळ ठेवा
ऑरेंज असो अथवा लेमन त्याची चव ठेवा
नव्या डिशेसाठी पोट नेहमी साफ ठेवा
आजूबाजूला छान दिसते काय नोंद ठेवा

रूपयाला एक मिळते रे
-हिनाटिडीन गोळी रे

ढिंगचिका चिक चिक, ढिंगचिका चिका चिका

समीक्षेच्या गावी अज्ञानाचा भाव ठेवा
आर_शाला इरी~टेटर म्हणोन नाव ठेवा
जळतंय का कुठे काही याची ब्रेकिंग न्यूज ठेवा
वरचेवर पिंका मारा, धागे रंगवून ठेवा

रंगीबेरंगी होई रे
दंगल जंगी होई रे

ढिंगचिका चिक चिक, ढिंगचिका चिका चिका

शिकण्यासारखे नाही काही याची खूण ठेवा
तिसरी ढीस असला तरी डॉक्टरेटचा आव ठेवा
तोंडावर सांगे त्याच्या पाठी तरवार ठेवा
चिडू नका हो जरा हासण्याला वाव ठेवा

काव्य घ्या समजून मस्ती रे
वस्ती ही होईल हसती रे

ढिंगचिका चिक चिक, ढिंगचिका चिका चिका

नेहमीच्या आयडीने रिप्लायाची बात ठेवा
पैलावान झालात तरी चुन्यावर कात ठेवा
साडीतल्या ड्यायड्यांनो लिपवरी स्टीक ठेवा
किरण्याच्या आत्म्यासाठी पानावरी भात ठेवा

चंदा ही नंदा होई रे
धंदा हा मंदा होई रे

ढिंगचिका चिक चिक, ढिंगचिका चिका चिका
ढिडिंग डिंग डिंग ढिडिंग डिंग डिंग
ढिंगचिका चिक चिक, ढिंगचिका चिका चिका
चिक चिक

- Kiran..
( डॉटस नही मजबुरी )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

>>किरण्याच्या आत्म्यासाठी पानावरी भात ठेवा<<

किरण्याच्या आत्म्यासाठी तोडे कावळे जिवंत ठेवा Wink
इमर्जन्सी म्हणून दर्भाच्या काड्या तयार ठेवा
ढिंका चिका..

रिया.. हा केके ना,बहुतेक त्याच्या बॉस वर चिडलाय म्हणून हे सर्व.. और कुछ नही... Wink

किरण.. तुझा परत 'रिन्हाभिंतुला' झालेला दिस्तोय Lol

हे जे काही आहे; ते न कळूनही कळल्यासारखं किंवा कळूनही न कळल्यासारखं वाटलं.
किंवा असं म्हटलं तर .....
थोडं कळलं, थोडं कळतंय, थोडं कळायचं बाकी आहे.
म्हणजे नक्की काय ???? .....
असो ..... Proud

उकाका Proud

वर्षुतै
ठाणे - येरवडा लोकलमधे कुणीतरी फार आठवण काढली या नावाने. मला ओरिसात उचक्या लागल्या. पूर्ण उचकटलो होतो Biggrin

देवा$$$$$$$ काय आहे हे.. पण मी चाली-सुरात म्हणुन पाहिले... भारी वाटतं काही समजलं नाही तरी Lol