Submitted by अज्ञात on 1 October, 2012 - 01:00
कुणी पाहिली भोर उद्याची अवचित होइल भेट
किती भांडणे तंडुन घेशी अखेर अंत समेट
कोण्या नशिबी असे न संचित धुके हरवली वाट
नसे दूर; अंधारी उमले रोज नवीन पहाट
भंगुर हे क्षण भोगाचे उपभोगाचे वा दाट
नियतीचे चिरअनंत फिरते आशा एक रहाट
......................अज्ञात
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भेत कोणाची?
भेत कोणाची?
भेट कोणाची ??...............
भेट कोणाची ??............... मृत्यूची ......!!