मुख्य जिन्नसः
उकडलेला बटाटा - १ मध्यम
मध्यम /जाड पोहे - दीड कप, त्यातले १/२ कप पोहे पाण्यात भुजवुन नरम करुन घ्या.
सफरचंद - १ मध्यम किंवा कॅन्ड अॅपल्स
इतर ४ जिन्नस -
बटर - २ टेबलस्पून
बेकिंग पावडर - १/४ टीस्पून
मैदा - आवश्यकतेनुसार
व्हाईट चॉकलेट - १/२ कप
अन्य जिन्नस-
साखर (ब्राऊन)
मीठ
पाणी
दालचिनी पूड
सजावटीसाठी -
स्ट्रॉबेरीज
डार्क चॉकलेट
स्विटी-पाय
ऑव्हन १८० डिग्रीला तापत ठेवा.
पिझ्झा प्लेट / ट्रे ला तेलाचा हात लावुन घ्या.
किंवा नॉनस्टिक पॅन तयार ठेवा. एग रिंग्ज वापरणार असाल तर त्याला आतुन तेलाचा हात लावुन घ्या.
बेस:
१. उकडलेला बटाटा सोलुन किसणीवर किसून घ्या.
२. यात १/४ कप जरावेळ पाण्यात भिजवुन नरम केलेल पोहे घाला. चिमुटभर मिठ, दालचिनी पावडर आणि १ टेबलस्पून बटर व बेकिंग पावडर घाला. थोडा थोडा मैदा घाला आणि गोळा होईतो हलक्या हाताने एकत्र करुन घ्या. मऊसूत गोळा झाला पाहिजे.
३. मळलेल्या गोळ्याचे ४-५ भाग करा. थापून गोल आकार द्या किंवा एग रिंग मधे भरा. वरतून काट्याने थोडी भोकं पाडा, तेलाचा हात लावलेल्या बेकिंग ट्रेवर ठेवा.
४. ओव्हन मधे बेक करायला ठेवा किंवा तव्यावर न तेल/तूप घालता भाजायला ठेवा.
५. तपकिरी दिसायला लागला की बाहेर काढा. गार होऊ द्या. बेस खुसखुशीत्/क्रंची व्हायला हवा.
पोहे क्रंच टॉपिंग:
१. उरलेले जाड पोहे, दालचिनी पावडर, १ टेबलस्पून मैदा आणि ब्राऊन शुगर एकत्र करा.
२. थोडे पातळ बटर घालुन एकत्र करा. तर थोडे गरम पाणी घालुन एकत्र करा.
३. हे मिश्रण एका ट्रेमधे पसरा.
४. ट्रे ओव्हनमधे ठेवा आणि क्रंची होइपर्यंत बेक करा. मधुन मधुन काट्याने हलवा. लक्ष असु द्या नाहीतर पटकन जळेल.
५. बाहेर काढुन मोकळे करुन घ्या आणि थंड व्हायला ठेऊन द्या.
अॅपल टॉपिंग:
१. सफरचंदांची साले आणि आतल्या बिया काढुन टाका. काप करा.
२. पातेल्यात सफरचंदाचे तुकडे + दालचिनी पूड + थोडे पाणी आणि साखर घालुन काप शिजवुन घ्या.
३. टीन्ड अॅप्पल वापरणार असाल तर जास्तीचा रस काढुन टाका आणि अॅपल्स पातेल्यात ओतुन एकदा गरम करुन घ्या.
४. अॅपल्स गरम असतानाच मॅश करुन घ्या आणि त्यात व्हाइइट चॉकलेट घाला. गरम सफरचंदामुळे चॉकलेट वितळेल ते नीट मिक्स करुन घ्या.
असेंबली:
१. तयार बेसवर मॅश केलेल सफरचंद पसरा.
२. त्यावर क्रंच टॉपिंग घाला.
३. स्ट्रॉबेरी ठेऊन त्यावर वितळलेले डार्क चॉकलेट ड्रिझल करा.
स्विटी-पाय सर्व करताना हवे तर सोबत व्हिप्ड क्रिम / आईसक्रिम घ्या आणि गट्टम करा
- बटाट्याचा बेस एकदम व्हर्सटाईल आहे. दालचिनी ऐवजी मिरेपूड / हिर्वी मिरची / जीरे वगैरे घालुन केला तर कुठलेही चटपटीत टॉपिंग वापरून याचाच तिखट प्रकार करता येइल... मॅश्ड छोले, चीज इ इ वापरता येइल. उरलेले बेसेस मी क्रिम चीज बरोबर खल्ले.
- पोहे क्रंच टॉपिंग मस्त कुरकुरीत होते. थंड झाले की हवाबंद डब्यात ठेवा.
- शिजवलेल्या अॅपलमधे चॉकलेट घातल्यामुळे अॅप्पलला पाणी सुटत नाही. व्हाईट चॉकलेट ऐवजी मिल्क / डार्क चॉकलेट वापरता येइल.
मस्त रेसिपी. पण आयती मिळाली
मस्त रेसिपी. पण आयती मिळाली तरच खाणार! ती सुद्धा संयम ठेऊन.
वॉव!! यम्मी दिसतयं.. प्लीज
वॉव!! यम्मी दिसतयं.. प्लीज पार्सल मिळेल का?
ऑव्हन १८० डिग्रीला तापत
ऑव्हन १८० डिग्रीला तापत ठेवा.
ओव्हन मधे बेक करायला ठेवा किंवा तव्यावर न तेल/तूप घालता भाजायला ठेवा. >>> सेल्सि. की फारेन. हा पदार्थ दोन्ही वर होऊ शकतो.
http://www.joyofbaking.com/OvenTemperatures.html
मस्त रेसिपी मुलांना तर खूपच
मस्त रेसिपी मुलांना तर खूपच आवडेल. सही दिसतोय फोटो
वॉव!! यम्मी दिसतयं..>+१ 'एकदम
वॉव!! यम्मी दिसतयं..>+१
'एकदम खरं दिसत आहे' असे लिहिणार होते मी
(तों.पा.सू. वर जाऊन आल्याचा परिणाम!)
मस्त रेसिपी 'एकदम खरं दिसत
मस्त रेसिपी
'एकदम खरं दिसत आहे' असे लिहिणार होते मी (तों.पा.सू. वर जाऊन आल्याचा परिणाम!)>>>>+१.
लाजो, किती वेगळाच प्रकार. असा
लाजो, किती वेगळाच प्रकार. असा बेस करायचे डोक्यातही आले नसते. फोटो एकदम तोंपासु
ला>>जो.. ___/\___ काय काय
ला>>जो.. ___/\___
काय काय कशकशा आयडियाज येतात गा तुझ्या डोक्यात?? धन्य आहे तुझी!!!!
वेगळा आणी टेस्टी ही दिसतोय प्रकार!!!
सही एकदम
सही एकदम
'एकदम खरं दिसत आहे' असे
'एकदम खरं दिसत आहे' असे लिहिणार होते मी हाहा (तों.पा.सू. वर जाऊन आल्याचा परिणाम!)

>>
मस्तच!
तू आणि तुझ्या कल्पना दोन्ही भन्नाट......
सहीच्च!! हा प्रकार पण मस्तच!
सहीच्च!!
हा प्रकार पण मस्तच!
मस्त !
मस्त !
वेगळीच रेसिपी आणि मस्त फोटो.
वेगळीच रेसिपी आणि मस्त फोटो.
धन्यवाद लोक्स सोनाली
धन्यवाद लोक्स
सोनाली
काय काय कशकशा आयडियाज येतात
काय काय कशकशा आयडियाज येतात गा तुझ्या डोक्यात?? >> होना.. आता भारतात आली की आपण नीट चेक करु.. नक्की काय खाते ही
सही$$$$$ रेसिपी
जबरी मस्त !
जबरी मस्त !
'एकदम खरं दिसत आहे' असे
'एकदम खरं दिसत आहे' असे लिहिणार होते मी हाहा (तों.पा.सू. वर जाऊन आल्याचा परिणाम!)
>> + १००००००
मस्तच! तू आणि तुझ्या कल्पना
मस्तच!
तू आणि तुझ्या कल्पना दोन्ही भन्नाट......>>>++११११
भारीच ! फोटो काय यमी
भारीच ! फोटो काय यमी दिसतोय...
शेवटचा फोटो बघून राहवतच
शेवटचा फोटो बघून राहवतच नाहीये...पदार्थ असेल तसा असेल.. प्रेजेंटेशन आणि फोटोसाठी दहात दहा..
लाजोक्का.... लवकर आण गं.. जीव
लाजोक्का.... लवकर आण गं.. जीव गेला माझा....