स्पर्धेचे नियम व अटी :-
१. या स्पर्धेत भाग घेण्याकरीता मायबोलीचे सभासदत्व अनिवार्य आहे.
२. प्रवेशिका पाठवण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सदस्यत्व घ्यावे लागेल त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सभासद झाला आहात.
३. वरील प्रकाशचित्रावर स्वरचित चारोळी पाठवायची आहे. काव्य कुठल्याही वृत्तात, कुठल्याही छंदात चालेल, मात्र फक्त चारच ओळी.
४. एक सदस्य एका प्रकाशचित्राकरता एकच प्रवेशिका पाठवू शकतो.
५. प्रत्येक प्रकाशचित्राच्या खाली प्रतिसादात, त्या त्या चित्रावरच्या चारोळ्या लिहावयाच्या आहेत.
६. प्रवेशिका दि. २९ सप्टेंबर २०१२, अनंत चतुर्दशीपर्यंत (अमेरिकेच्या पश्चिम किनार्याची प्रमाणवेळ) पाठवू शकता
७. या स्पर्धेकरता परीक्षक मंडळ नेमण्यात येईल.
८. स्पर्धेचा अंतिम निकाल अनंत चतुर्दशीनंतर काही दिवसात जाहीर करण्यात येईल.
माती भरल्या हातानी घडवलस बाबा
माती भरल्या हातानी
घडवलस बाबा मला
तुझ्या हातांची कुसर
मिळो माझ्या हाताला
मायेचा हळुवार हात चाकावर फिरे
मायेचा हळुवार हात
चाकावर फिरे असा
देई आपुल्या लेकरा
नव निर्मितीचा वसा
माझी माती, माझा खेळ मलाच
माझी माती, माझा खेळ
मलाच लागेल रंगवावा..
थकता- भागत देशील मला
"आई" मायेचा ओलावा?
मुदत संपल्यामुळे प्रवेशिका
मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत. आपल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!
Pages