स्वारी निघाली, निघाली श्री गणपती रायाची
गेले अकरा दिवस आपल्याकडे पाहुणा असलेल्या श्री गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याचा आजचा दिवस. गेल्यावर्षीप्रमाणेच याहीवर्षी मायबोलीवर मी चाहूल (आम्ही येतोय...), आगमन (आम्ही आलोय...), दर्शन (लालबाग, परळ, दादर, माटुंगा परीसर) आणि विसर्जन (आम्ही निघालो...) या चार संकल्पनेवर आधारीत मुंबईच्या श्री गणेशाचे दर्शन प्रचिद्वारे प्रदर्शित केले. याच मालिकेचा हा अंतिम भाग. या मालिकेच्या पहिल्या भागातील पहिल्या प्रचित आणि अंतिम भागातील शेवटच्या प्रचित, दोन्हीत मातीचा गोळा आहे. पहिल्या प्रचितील मातीचा गोळा बाप्पांच्या आगमनाची चाहूल देतो तर शेवटच्या प्रचितील मातीचा गोळा बाप्पांच्या जाण्याचे दु:ख देतो. पण त्याचवेळी बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आग्रहाचे आमंत्रणही देतो.
=======================================================================
=======================================================================
चाहूल
आम्ही येतोय........१९ सप्टेंबर, २०१२
आगमन:
आम्ही आलोय...
दर्शनः
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे... — "लालबागचा राजा"
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा... — लालबाग परीसर आणि भायखळा (पश्चिम)
आधी वंदु तुज मोरया... — परळ, दादर आणि माटुंगा परीसर
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०१
मानाचा पहिला गणपती - गणेशगल्ली (मुंबईचा राजा २०११)
प्रचि ०२
प्रचि ०३हि शान कुणाची.....लालबागच्या राजाची
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७यंदाचा मुंबईचा राजा (२०१२) तेजूकाया
प्रचि ०८
प्रचि ०९लाडका लंबोदर (रंगारी बदक चाळ )
प्रचि १०
प्रचि ११कॉटनग्रीनचा राजा
प्रचि १२
प्रचि १३परळचा राजा (नरे पार्क)
प्रचि १४प्रगती मित्र मंडळ
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
=======================================================================
=======================================================================
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!
बाप्पा घरी निघाले की नेहमीच डोळ्यातुन पाणी येतं
(No subject)
अप्रतिम फोटो !!
अप्रतिम फोटो !!
सुंदर
सुंदर
सुंदर .. शेवट्चे ६ प्रचि
सुंदर .. शेवट्चे ६ प्रचि खासच!
खरंच, बाप्पाच्या विसर्जनाचा
खरंच, बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस नकोसा होतो.........त्याची स्थापना केलेली जागा भकास वाटते..........घर,मन,वातावरण सगळं उदास,रडवेलं होऊन जातं....आणि नकळत भरून आलेले डोळे कुणाला कळू न देता हलकेच पुसले जातात.
बाय द वे, फोटो नेहेमीप्रमाणेच अप्रतिम!!
गणपतीबाप्पा मोरया.....पुढच्या वर्षी खूप खूप लवकर या!!!
फोटो छान आहेत पण बघवत
फोटो छान आहेत पण बघवत नाहीयेत.
प्रचि २० मधले बाप्पा पाठ फिरवुन निघालेले बघुन डोळे पाणावले ....
मी जात नाही विसर्जनाला कधीच. रिकाम्या हाताने परतणे नको वाटते.
३० आवडला... मस्त...
३० आवडला... मस्त...
काल ठाणे तलावपाळीवर
काल ठाणे तलावपाळीवर विसर्जनासाठी आलेली एक छोटी मुलगी आणि तिची आई ढसाढसा रडत होत्या.
शेवटचा फोटो चटका लावणारा आहे.
बा़की सगळे अॅज युज्वल मस्तच
१० दिवसात जातात म्हणून
१० दिवसात जातात म्हणून दरवर्षी स्वागत होते. जास्त दिवस राहिले तर कंटाळा येईल...
थोडक्यात गोडी असते म्हणतात ना ते हेच.. 
देवा सरु दे माझे मी पण तुझ्या
देवा सरु दे माझे मी पण
तुझ्या धुळीचे भाळी भूषण....
डोळ्यांना धारा लागल्यात प्रचि पहाताना....
प्रचि सुंदरच आहेत.... पण
प्रचि सुंदरच आहेत.... पण सर्वांनी वर म्हटल्याप्रमाने मनाला चटका लावणारे
योगेश.... मला अगदी १००%
योगेश....
मला अगदी १००% खात्री होती की 'मुंबापुरीच्या बाप्पांच्या निरोपा'ची तू सफर आम्हाला इथे घडविणारच....झालेही तसे. वर सदस्य म्हणतात तसे गणेशाला 'पाठीमागून' बघणे म्हणजे आपल्या डोळ्यात सागर उतरल्याचे पाहणे असेच घडते. माहीत असते की 'श्री' पुढील वर्षी परत येणार आहेत, तरीही 'निरोप' कसा गलबलून टाकतो याचे अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे "गणेश विसर्जन".
फोटोबद्दल तर काय लिहायचे. आता 'जिप्सी यानी दिलेले फोटो सुंदर आहेत...' असे म्हणणे ह्यात द्विरुक्ती येते.....'जिप्सीने धाग्यावर दिलेली प्रकाशचित्रे पाहिली...' असे म्हटले तरी चालते.
धन्यवाद.
अप्रतिम फोटो. डोळ्यांचे
अप्रतिम फोटो. डोळ्यांचे पारणे फिटले. शेवटचा फोटो अगदी अंतःर्मुख करणारा.
सुंदर गणपती बाप्प्पा मोरया
सुंदर
गणपती बाप्प्पा मोरया ... पुढच्या वर्षी लवकर या