प्रतिभाताई,लाज घालवलीत महाराष्ट्राची

Submitted by गारम्बीचा बापू on 26 September, 2012 - 10:51

प्रतिभाताई,लाज घालवलीत महाराष्ट्राची

राष्ट्रपती भवनातील भेटवस्तू परत द्या! राष्ट्रपती सचिवालयाचा तगादा

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपल्या कार्यकाळात मिळालेल्या भेटवस्तू घरी नेल्यामुळे वाद निर्माण झाला होता. अखेर त्या १५५ वस्तू राष्ट्रपती सचिवालयाने परत मागवल्या आहेत. मात्र आम्हाला यासंदर्भातील कोणतेही पत्र मिळाले नाही, असे पाटील यांच्या परिवाराकडून सांगण्यात आले आहे.

सन्दर्भ--दि.२६-०९-२०१२ http://maharashtratimes.indiatimes.com/ — !

१८ ऑगस्ट रोजी सुभाष अग्रवाल या माहिती अधिकार कार्यकर्त्याने दाखलेल्या अर्जानंतर हा सारा प्रकार उजेडात आला . यात १५५ वस्तू अमरावतीच्या विद्या भारती शैक्षणिक विश्वस्त मंडळाकडे देण्यात आल्याचे म्हटले होते . तसेच या मंडळात प्रतिभा पाटील यांच्या परिवारीत अनेक जण आहेत , अशी माहिती देखिल समोर आली होती .

तसेच या मंडळाने त्या भेटवस्तू व्यवस्थित हाताळल्या नाहीत , असा आरोपही करण्यात येत आहे . विदेश मंत्रालयच्या अंतर्गत येणा - या संग्रहालयाला कोणतीही माहिती न देता या वस्तू अमरावतीला नेण्यात आल्याचेही कळते .

प्रतिभा पाटील राष्ट्रपती असताना अनेक विदेश दौ - यांत त्यांना प्रतिनिधी स्वरुप भेटवस्तू मिळाल्या होत्या . या मौल्यवान भेटवलस्तू राष्ट्रपती भवनातील संग्रहालयातच ठेवण्यात येतात . राष्ट्रपतीपदावर असताना मिळालेल्या भेटवस्तू या देशाची संपत्ती मानतात , असे मत जाणकारांनी व्यक्त केले होते .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक मराठी (बाई) माणूस राष्ट्रपती (!) झाला त्याचे काही कौतुक नाही. आता माहेरी परतत असताना चार गोष्टी आणल्या पदरात लपवून तर काय बिघडले ? त्यात एवढे महाराष्ट्राची लाज वैगेरे जाण्याचा प्रश्न आलाच कुठून.

महाराष्ट्राची लाज (शान) घालवण्याचे म्हणालतर, मंत्रालयाला लागलेली आग, B..ग्रेड नावाच्या गुंडाच्या टोळीकडून तोडलेला रायगडावरचा "वाघ्या" कुत्र्याचा पुतळा, बारामतीच्या टग्याने केलेला जलसंपदा भ्रष्टाचार, नॅशनल करप्ट पार्टीचे (NCP) व काँग्रेजच्या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचारांनी महाराष्ट्राची लाज (शान) अटकेपार पोहोचली आहेच ती आणखी वाढली.

प्रतिभाताईंनी राष्ट्रपतीपद भूषवून एक अत्यंत महत्त्वाचे कार्य केले आहे. ते म्हणजे राष्ट्रपतीपद हे एक खर्चिक, अनावश्यक पद असल्याचे अधोरेखित केले आहे. अक्षरशः काहीही काम नाही, एकाच वेळी भारताचे सर्वोच्चपद आणि नामधारी रबर स्टँप असणारा हा हुद्दा. काम नसले तरी अफाट पगार, पेन्शन, मानसन्मान, भपकेबाज रहाणी उपभोगायची.
बाईंनी ह्याचा आनंद मनसोक्त लुटला आहे हे वेळोवेळी दिसले आहेच. विक्रमी प्रवासखर्च, त्यात नेला जाणारा लोकांचा लवाजमा, त्यात नातेवाईकांची वाढती संख्या, वरचेवर लेकीच्या घरी पुण्याला मारलेल्या चकरा,
सुखोईचे उड्डाण, पाणबुडीची सफर असल्या निरर्थक पण खर्चिक कार्यक्रमांचा भरमार.
आणि हे सगळे कमी पडले म्हणून की काय आता भेटवस्तू लांबवण्याचा कार्यक्रम!
केवळ सोनिया देवींची मर्जी होती म्हणून ह्या बाई ह्या उच्च पदावर बसल्या अन्यथा ह्यांचे कर्तृत्व काय होते? शून्य!

कधीतरी हे पांढरा हत्ती बनलेले, उधळे, निरर्थक पद रद्द करण्याबद्दल जनता विचार करेल अशी इच्छा.

एक मराठी (बाई) माणूस राष्ट्रपती (!) झाला त्याचे काही कौतुक नाही. आता माहेरी परतत असताना चार गोष्टी आणल्या पदरात लपवून तर काय बिघडले ? त्यात एवढे महाराष्ट्राची लाज वैगेरे जाण्याचा प्रश्न आलाच कुठून.

Biggrin Biggrin Biggrin Biggrin Biggrin

महाराष्ट्राची 'लाज...' इतकी पातळ वा स्वस्त नाही की एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीने [बाई की बाबा हे महत्वाचे नाही] दिल्लीवरून काही वस्तू आपल्या घरी आणल्या म्हणून ती वाहून जाईल. या विषयसंदर्भात कोणत्याही बातमीदाराने वा वृत्तसंस्थेने "महाराष्ट्राच्या प्रतिभा पाटील यानी राष्ट्रपती भवनातून......" असे वार्तांकन कुठे केल्याचे मला आढळलेले नाही.

त्यामुळे....'लाज' जाणारच असेल....वा गेली असेल तर ती 'राष्ट्रपती' पदाची गेली आहे.... त्या कृतीने.

असो.

अशोक पाटील

यांना स्त्री असूनही बलात्कारी-खुन्यांचे दयेचे अर्ज मंजूर करा असा दबाव आणणार्‍यांना दटावून नराधमांना फासावर लटकवणे जमले नाही, आणि स्लट वॉक व दारू ढोसण्याच्या समर्थक स्त्रियांना याबाबत कांहिच वाटले नाही.

आपल्या देशात एकंदरितच accountability हा प्रकार राजकारण्यांना उरलेला नसल्याने हे प्रकार होतात. कंपन्यांमधे जसे appraisal होते तसे यांच्या कामगिरीचे केल्यासे बहुतेकांना उर्ध्व लागेल. Auditing आणि appraisal ह्या गोष्टी लोकप्रतिनिधींना अत्यंत अत्यावश्यक केल्या पाहीजेत. तरच सुयोग्य शासन नांदू शकेल.

<<सुरेख मतला, भास्करराव.
कृपया गझल पूर्ण करा>>

गल्ली चुकलात का? Please somebody draw him a site map Rofl

अशोकरावांशी सहमत, महाराष्ट्राची लाज नाही. पण राष्ट्रपतीपदाची किंमत मात्र ठेवता आली नाही.

ज्ञानेशराव, ही घ्या गझल.

नराधमांना फासावर लटकवणे जमले नाही
हाय, मजला नराधम होणे जमले नाही

राष्टपती पद दुवा असे म्हणे ते
हाय, मजला काम करणे जमले नाही!

केल्या मी परिक्रमा देशोदेशींच्या त्या
काय म्हणता, तुम्हाला पटले नाही?

पळवल्या काही भेटी अमरावतीस मी
राष्ट्रसंपतीं म्हणे, मजला कळाले नाही

घडविल्या परदेश भेटी नातलगांना मी
वदतात ते, काहीच मजला वाटले नाही.

आक्रोश का केला कोण्या पुणेकराने
खडकीत घर घेणे साधले नाही

महाराष्ट्राची 'लाज...' इतकी पातळ वा स्वस्त नाही की एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीने [बाई की बाबा हे महत्वाचे नाही] दिल्लीवरून काही वस्तू आपल्या घरी आणल्या म्हणून ती वाहून जाईल. या विषयसंदर्भात कोणत्याही बातमीदाराने वा वृत्तसंस्थेने "महाराष्ट्राच्या प्रतिभा पाटील यानी राष्ट्रपती भवनातून......" असे वार्तांकन कुठे केल्याचे मला आढळलेले नाही.

त्यामुळे....'लाज' जाणारच असेल....वा गेली असेल तर ती 'राष्ट्रपती' पदाची गेली आहे.... त्या कृतीने.

असो.<<<

अशोकराव, प्रतिभाताई महाराष्ट्रीय आहेत म्हणून महाराष्ट्राचीही लाज गेलीच. राष्ट्रपतीपदाची गेली असली तरी ते पद भूषवणारी व्यक्ती ज्या प्रदेशातून आलेली होती त्या प्रदेशाचीही थोडी जातेच की?

'माहेरचं नाक कापलंस अगदी सासरी जाऊन' असे नाही का म्हणत उनाड मुलींना त्यांचे लग्न झाल्यावर आणि त्यांनी भलतेच प्रकार केल्यावर? देशी हा एक प्रदीर्घ काळ टिकलेला ड्यु आय डी आहे याचे समाधान वाटते मनात.

१५५ तर वस्तु आहेत. त्याने काय लाज जाते ? ७०००० करोड, १ लाख ८६ हजार करोड यांनी सुद्धा लाज जात नाहि तर १५५ वस्तु म्हणजे काय राव!

@अशोक
>>त्यामुळे....'लाज' जाणारच असेल....वा गेली असेल तर ती 'राष्ट्रपती' पदाची गेली आहे.... त्या कृतीने.<<
घटनेने दिलेले अधिकार, मानमरातब आणि प्रतिष्ठा त्या जागी बसणार्‍या व्यक्तीं जर उपभोगतात तर अशा 'लाजिरवाण्या' कृती न करण्याची जबाबदारी त्यांचेवरच नाहि काय? त्यामुळे 'राष्ट्रपती' पदाची लाज राखणे वा घालविणे हे त्या पदावर बसणार्‍या व्यक्तींच्याच हाती आहे. त्यामुळे व्यक्तींनी गैर वागायचे आणि लाज मात्र पदाची गेली असे म्हणायचे हे कितपत योग्य आहे? व्यक्तींच्या अशा वागण्यानेच मग त्या पदालाच दूषणे दिली जायला लागतात. व्यक्ती पुन्हा नामानिराळ्या!
मिडियाने जरी त्या व्यक्तीच्या राज्याचा उल्लेख केला नसला तरी ती व्यक्ती ज्या राज्यातुन गेलेली आहे त्या राज्यातील लोकांना आपल्या माणसाने लाजिरवाणी गोष्ट केली तर खंत वाटते व चांगले कांहि केले तर अभिमान वाटतो हे त्या राज्यातील लोकांच्या सुसंस्क्रुतपणाचेच लक्षण नाही का?

@ज्ञानेश
ही घ्या अद्वितीय(?) गझल (हीच पहिली)

स्त्री असूनही यांना
बलात्कारी-खुन्यांचे
दयेचे अर्ज मंजूर करा
असा दबाव आणणार्‍यांना दटावून
नराधमांना फासावर लटकवणे जमले नाही,
आणि स्लट वॉक व दारू ढोसण्याच्या समर्थक स्त्रियांना
याबाबत कांहिच वाटले नाही.

१. @ बेफिकीर....

मी काहीसे व्यापक दृष्टीने पाहतो त्या पदाकडे. दुसर्‍या शब्दात 'राष्ट्रपती' या पदावर आरुढ होणारी व्यक्ती ही संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करीत असते. तिथे प्रादेशिकता आणणे म्हणजे त्या पदाला संकुचित करण्यासारखे होय.

वर श्री.क.ना. यानी दिलेल्या लिंकमधील सुभाष अगरवाल यानीही माहिती अधिकाराखाली केलेल्या अर्जात 'पूर्व राष्ट्रपती प्रतिभा पाटील' असाच उल्लेख केल्याचे आढळते. त्यामुळे निव्वळ तांत्रिकदृष्ट्या त्या महाराष्ट्राच्या आहेत आणि त्यानी त्या वस्तू अमरावती इथे आणल्या म्हणून संपूर्ण राज्याची लाज काढू नये असे मला वाटते.

बाकी तुम्ही दिलेले उदाहरण ["माहेरचे नाक कापलेस..."] हे चपखल आहेच, तरीही या संदर्भात ते लावणे काहीसे अन्यायकारक होईल. असो.

२. @ मी-भास्कर...

"...अशा 'लाजिरवाण्या' कृती न करण्याची जबाबदारी त्यांचेवरच नाहि काय? ..." नक्की नक्कीच....यू सेड इट भास्कर जी...; पण ती जबाबदारी ती व्यक्ती वा तिला तिथे बसविणारी व्यक्ती पूर्ण करीत नसेल आणि मग अशा प्रकरणात 'लाज' जाणारच असेल वा जातच असेल तर एक तर त्या व्यक्तीची अन्यथा त्या पदाची तरी जाईल. 'अमरावती' च्या बाई जर त्या वस्तू देणार नसतील वा त्याना तुम्ही त्या परत द्या असे दिल्लीकर बाई सांगणार नसतील, तर मग या संबंधितांनी त्या पदाचीच शान घालविली असे [नाईलाजाने का होईना] म्हणावे लागेल.

बाकी राज्यातील लोकांच्या सुसंस्कृतपणाबद्दलचे तुमचे मत मी ग्राह्य मानतोच. पु.ल., लता, सचिन, यांच्याबद्दल बाहेरच्या राज्यातील लोकांनी गौरवद्वगार काढले तर एक महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला निश्चित्तच अभिमान वाटतो.

अशोक. | 29 September, 2012 - 12:36 नवीन
>>मी काहीसे व्यापक दृष्टीने पाहतो त्या पदाकडे. दुसर्‍या शब्दात 'राष्ट्रपती' या पदावर आरुढ होणारी व्यक्ती ही संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करीत असते. तिथे प्रादेशिकता आणणे म्हणजे त्या पदाला संकुचित करण्यासारखे होय. <<
हे सर्वसाधारणपणे १००% बरोबरच आहे.
राजेंद्रप्रसाद, राधाकृष्णन, अब्दुल कलाम यांच्यासारख्या दिग्गजांनी भूषविलेले पद आहे ते.
या पदाकडे यारीतीने लोक बघताहेत याचि जाण त्याजागी बसणार्‍या व्यक्तीकडे असायला हवी.
पण दुर्दैवाने ती जर नसेल तर लोकांनी त्यांना ती द्यायला हवी. ते उच्चतम पद आहे तेव्हां त्या जागेवर बसलेल्या व्यक्तिबद्दल 'ब्र' देखिल काढायचा नाही असली व्यक्तिपूजाच त्या पदाची, आणि ति ज्या राज्यातून आली आहे त्या राज्याची लाज घालवायला कारणीभूत ठरते.