मुख्य घटक:
१) बटाटा - २ मध्यम आकाराचे
२) तांदूळ - २ कप बासमती किंवा आंबेमोहोर
३) सफरचंद - २ मध्यम आकाराची
पूरक घटक:
१) भोपळी मिरची - १ मध्यम आकाराची
२) गाजर - १ मध्यम आकाराचे
३) मटार - पाव कप
४) फरसबी - साधारण ७ ते ८ शेंगा
याव्यतिरीक्त:
१) तूप - ७ ते ८ टेबलस्पून
२)गरम मसाला पावडर - दोन टेबलस्पून
३) मिरी, दालचिनी, लवंग, वेलची प्रत्येकी साधारण ३-३
३) लिंबूरस - २ टेबलस्पून
४) हळद - १ टिस्पून
५) लाल तिखट - १ टिस्पून
६) चवीनुसार मीठ, साखर
७) पुलाव शिजवण्यासाठी पाणी - साडेतीन कप + अर्धा कप
सजावटीसाठी:
तळलेले काजूचे तुकडे
१) तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवावेत.
२) सफरचंदांचे 'सळी' आकारात जाडसर तुकडे करून त्यांना अर्धा टेस्पून लिंबूरस चोळून ठेवावा, म्हणजे ते तुकडे काळे पडणार नाहीत.
३) बटाटा, गाजर आणि भोपळी मिरचीचे चौकोनी आकारात तुकडे करून घ्यावेत. फरसबीचे लांबट उभ्या आकाराचे तुकडे करून घ्यावेत.
४) भोपळी मिरची वगळून बटाटा, गाजर, फरसबी आणि मटार वाफवून घ्यावेत.
५) एका गॅसवर साडेतीन कप पाणी एका भांड्यात उकळण्यास ठेवावे.
६) एका पॅनमधे ३ टेबलस्पून तूप गरम करून त्यात मिरी, दालचिनी, लवंग, वेलची हा खडा मसाला किंचित परतून घ्यावा. त्यात निथळून घेतलेले तांदूळ चांगले परतून घ्यावेत. चवीनुसार मीठ घालावे. तांदूळ चांगला हलका झाला की त्यात साडेतीन कप उकळीचे पाणी घालावे. व्यवस्थित ढवळून झाकण ठेवून भात शिजण्यास ठेवावा. भात तयार झाला की एका मोठ्या परातीत हलक्या हाताने मोकळा पसरवून ठेवावा. गुठळ्या राहता कामा नयेत.
७) दुसर्या पॅनमधे उरलेले तूप घालावे. त्यात भोपळी मिरचीचे तुकडे घालून परतून घ्यावे. नंतर सफरचंदाचे तुकडे घालावेत. एकदाच परतून त्यात वाफवलेल्या भाज्या घालाव्यात. उरलेला लिंबूरस घालून परतावे. मग गरम मसाला पावडर, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, साखर घालून हलकेच व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. गॅसची आच मंदच असावी, नाहीतर गरम मसाला, तिखट इत्यादी खाली लागण्याची शक्यता असते.
८) ही भाजी तयार झाल्यावर त्याच भांड्यात शिजवून घेतलेला भात घालून हलक्या हाताने सगळे व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
९) अर्धा कप पाणी त्यावर शिंपडून झाकण पुलाव शिजण्यास ठेवावा.
१०) पुलाव तयार झाल्यावर त्यावर तळलेले काजू पसरून ठेवावेत.
हा पुलाव झटपट होतो, बिर्याणीसारखा वेळखाऊ पदार्थ नाही.
ह्या पुलावाबरोबर टोमॅटो सूप आणि काकडी, टोमॅटोचे दह्यातले सॅलड एकदम फक्कड लागते.
आमची आपली सरड्याची धाव
तांदूळ म्हटल्यावर भातच आठवला. नवरतन पुलाव अनेक जण अनेक प्रकारांनी करत असतीलच, पण संयोजकांनी दिलेले साहित्य वाचल्यावर ह्याहून काही नाविन्यपूर्ण पाककृती करण्यासाठी डोकं चाललं नाही. एक गोड पदार्थ जमेल असे वाटले होते, पण ती कल्पना कुटुंबातील पाककला निपुणांसमोर मांडल्यावर ज्या तर्हेच्या प्रतिक्रिया आल्या त्याला मायबोलीवरच अतिशय गोंडस नाव आहे त्यामुळे त्या पाककृतीचा प्रयोग करायला धीर झाला नाही. तर, उपलब्ध वेळेत केलेला हा प्रसाद (तिखट असला तरी) मायबोली गणेशबाप्पा आणि तुम्ही गोड मानून घ्याल अशी अपेक्षा आहे
गणपती बाप्पा मोरया!!
सही... मस्तं लागेल...
सही... मस्तं लागेल...
शाब्बास! मीही करून बघेन. हळद
शाब्बास! मीही करून बघेन.
हळद वगळली तरी चालेल असं वाटतंय, मसालेभातासारखा दिसतोय
लै भारी, मंजूडी. फोटोशेजारी
लै भारी, मंजूडी.
फोटोशेजारी काय कलाकारी केलेय? त्यामुळे फोटोवरचं लक्ष तिथे जातंय.
छान प्रकार.. गोड प्रकार पण
छान प्रकार.. गोड प्रकार पण येऊ द्या कि !
वा छानच.
वा छानच.
छान छान...मस्त
छान छान...मस्त
म स्त ...........मीही करून
म स्त ...........मीही करून बघेन.
बहारदार आहे हा नवरतन
बहारदार आहे हा नवरतन पुलाव..करायला सोप्पा ..करुन पहाणार!!
छान वाटतोय. फोटोशेजारी काय
छान वाटतोय.
फोटोशेजारी काय कलाकारी केलेय? त्यामुळे फोटोवरचं लक्ष तिथे जातंय.>+ १
लै भारी, तिखट-मंजुडी!
लै भारी, तिखट-मंजुडी!
मसालेभातासारखा दिसतोय>>>
मसालेभातासारखा दिसतोय>>> पूनम, आधीच कबूली दिलीये सरड्याच्या धावेची
त्यामुळे फोटोवरचं लक्ष तिथे जातंय.>>> तेच तर अपेक्षित आहे मामी आणि सावली
फोटो मोबाईलमधून काढलाय, ट्यूबलाईटचा योग्य अँगल न पकडता, त्यामुळे फारसा छान आलेला नाही.
वत्सला
तेच तर अपेक्षित आहे मामी आणि
तेच तर अपेक्षित आहे मामी आणि सावली >>
मंजूडी, सरड्याची धाव आवडली बर्का.
तेच तर अपेक्षित आहे मामी आणि
तेच तर अपेक्षित आहे मामी आणि सावली >>>>
मस्त वाटतोय. मी भात-रेस्पी-चॅलेंज्ड आहे! पण हा प्रकार मला जमेल बहुतेक असा विचार आला.. बिर्याणीसारखा वेळकाढू नाही या एका वाक्यावर आशा वाटतेय मला!
मस्त पाककृती काश्मिरी
मस्त पाककृती काश्मिरी पुलावात सफरचंद खाल्ले होते ते आवडले होते. ह्यात भोपळीमिरचीमुळे वेगळी छान चव येईल. नक्की करुन बघणार
मस्त. आणि ही देखील जमणेबल
मस्त. आणि ही देखील जमणेबल वाटतेय ह्या सरड्याचं कुंपण तर तुझ्या कुंपणापेक्षाही छोट आहे
मंजूडी, मस्त!! करून बघणार
मंजूडी, मस्त!! करून बघणार नक्की ..
बरय ह्या स्पर्धे मुळे खुप हटके आणि स्वादिष्ट पदार्थ पहायला/शिकायला मिळतायेत..
धन्यवाद
नक्की करुन बघेन...मस्त मला
नक्की करुन बघेन...मस्त मला आवडली
मस्तच .. काजूबरोबर बेदाणेही
मस्तच .. काजूबरोबर बेदाणेही आवडतील मला ह्या नवरतन पुलावात ..
यम्मी दिसतोय
यम्मी दिसतोय
सह्ही आहे हा पुलाव यावर
सह्ही आहे हा पुलाव
यावर डाळिंबाचे दाणेही मस्त दिसतिल
सशल, हो! आणि मला अननसही आवडेल
सशल, हो! आणि मला अननसही आवडेल सफरचंदाबरोबर पुलावात घालायला, शिवाय टोमॅटोच्या ग्रेव्हीत भाजी करून त्यावर फेटलेली सायपण आवडेल, पण नियमांमुळे जिन्नसांमध्ये हात आखडता घ्यावा लागला
भात, पुलाव, बिर्याणी आपले
भात, पुलाव, बिर्याणी आपले फारसे फेवरेट नाही... पण हॉटेलमध्ये शेजारच्या ताटात बिर्याणी दिसली की नेमकी तीच खावीशी वाटते.. इथेही तेच झाले.. बघून खावेसे वाटतेय..
अवांतर - फोटो आणखी छान काढून आणि छानपणे प्रेजेंट करता आला असता.
मंजूडे, आणखी एक फोटो चालला
मंजूडे, आणखी एक फोटो चालला असता की.
पूर्वी असा पुलाव केला आहे. कॅन्ड फ्रूट्स घालून. जरा गोडुस होतो पण बरोबर एखादी तिखट करी असेल तर चांगला लागतो.
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
एम्डी मस्त दिसतोय सायो,
एम्डी मस्त दिसतोय
सायो, पुलाव गोडुस असेल तर त्याला काश्मिरी पुलाव म्हणतात का?
मॅक्स, व्हय. ह्या पुलावात
मॅक्स, व्हय. ह्या पुलावात पाण्याबरोबर थोडं दूधही घालायचं.
मस्तच
मस्तच
छान सोपी मस्त पाककृती.
छान सोपी मस्त पाककृती.
मस्त रेसिपी पजो चा पहिला
मस्त रेसिपी
पजो चा पहिला प्रतिसाद
भुक चाळवलेली आहे माझी...
भुक चाळवलेली आहे माझी...