बालचित्रवाणी - अर्जुन - _मधुरा_

Submitted by संयोजक on 25 September, 2012 - 15:47


कलाकाराचे नाव - अर्जुन
वय - १ वर्ष ११ महिने
पालकाचा मायबोली आयडी - _मधुरा_
गणपती स्तोत्र

आधी, शशांक पुरंदरे यांनी लिहिलेलं गणपतीचं सोप्पं गाणं म्हणून घेणार होते; पण रेकॉर्ड करायला लागलं की महाराजांना फोन खेळायला हवा असायचा, आणि वक्रतुंडच म्हणायचं असायचं. तेंव्हा त्याच्या मागे पळून रेकॉर्ड केलं. श्लोक म्हणताना उड्या सुरु होत्या म्हणून volume गंडला. तर मी दोनदा रेकॉर्ड करून, त्यातल्या त्यात मोठ्या आवाजातले २ तुकडे जोडले आहेत आणि volume थोडा वाढवायचा प्रयत्न केला आहे. अधे-मधे टाळ्या पण त्यानेच वाजवल्या आहेत.
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच गोड गोड आहेस तू अर्जुन..आई-बाबांची धावपळ पाहून मध्येच हसु फुटलं..मग टाळ्या आणि मोलया..व्वॉव !! Happy

दोन वर्षांचा पण नाहीये पण किती मस्त, उत्साहात म्हटलंय अर्जुननं. मोलया आणि टाळ्या भारीच! शाब्बास अर्जुन! Happy

मो लया ! एकदम छान. Happy
<< आई-बाबांची धावपळ पाहून मध्येच हसु फुटलं..मग टाळ्या आणि मोलया..व्वॉव !! >> +१