कलकत्ता [बंगाल]व गोहाती [आसाम] च्या सुदूर भागात मावा/खवा ताजा ,विश्वसनीय तसेच नेहमी किंवा आपल्याला हवा तेव्हा मिळणे अशक्यप्राय पण छेना व त्यापासुन केलेले रसगुल्ले-संदेश-राजभोग -छेना परवल अशा असंख्य मिठाया मिळ्तील ..आपणही बाजारातुन तयार खवा आणण्याआधी शुद्धतेचा,ताजेपणाचा विचार करतोच्.अशा वेळी "किरमीजी गुलाबजाम" चा प्रसाद मनाला सुखावुन जातो.
त्यासाठी लागणारे प्रमाण साहित्य असे आहे.
आतील सारण तयार करण्यासाठी--
१ लहान आकाराचे सफरचंद,
१ टेबल्स्पून साखर,
१ टीस्पुन दालचिनी पुड,
बाह्य-आवरण तयार करण्यासाठी-२ टेबल्स्पून तांदुळाचे पिठ ,
१ मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा,
१ टेबल्स्पुन डेसिकेटेड कोकोनट,
२ टेबलस्पून मिल्क पावडर,
१ टेबलस्पून पिठीसाखर,
१ टीस्पुन वेलची-जायफळ पुड,
१ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर,
२ टेबल्स्पून काजुचे लहान-लहान तुकडे,
चिमुटभर बेकिंग पावडर,
तळण्यासाठी पाउण वाटी साजुक तूप,
सारण व मिश्रण तयार आहे ..
१]सफरचंद सालासकट किसणीवर किसुन घ्या.
२]एका लहान पॅन /कढईत १ टेबलस्पून साखरेचे कॅरेमल करा.
त्यासाठी कढई गॅसवर ठेवुन त्यात साखर घालुन पाणी न घालता मंद गॅसवर सतत चमच्याने ढवळत पाक करायचा आहे.साखर पूर्ण विरघळली कि किरमीजी रंग येईल.
३]या कॅरेमल मधे सफरचंदाचा किस घालुन परता.दालचिनी पूड व अर्धा टेबलस्पून काजु तुकडे घालुन त्यातील पाण्याचा अंश जाईपर्यंत परता.मिश्रण घट्ट्सर झाले कि सारण तयार झाले. आता हे सारण एका वाटीत काढुन ठेवा..
४]बटाट्याचे साल काढुन , बटाटा किसा.
५]त्यात तांदुळाची पिठी,डेसिकेटेड कोकोनट,मिल्क पावडर ,पिठीसाखर ,वेलची-जायफळ पुड व चिमुटभर बेकिंग पावडर घालुन एकत्र मळुन घ्या.
६]या मिश्र गोळ्याचे लहान लहान समान गोळे करा.
तितकेच गोळे वर केलेल्या सारणाचे ही करा् हे गोळे करताना तळ हाताला थोडेसे तूप /मिश्रण सैलसर वाटत असेल तर कॉर्न फ्लोर लावुन घ्या. म्हणजे हाताला चिकटणार नाही.
७] कढईत मंद आचेवर तूप तापायला ठेवा.
८] मिश्र गोळ्याला वाटीचा आकार देवुन त्यात काजु तुकडे पसरवुन नंतर त्यात सफरचंदाच्या सारणाचा लहान गोळा ठेवुन पुन्हा गोलाकार करा.वरुन ४-५ काजुतुकडे लावा आणि हा गोळा बाहेरुन कॉर्न फ्लोर मधे घोळवुन पुन्हा छान गोलाकार आकार द्या .असे सर्व गोळे करुन घ्या.
९] कढईतील तूपात मंद आचेवर किरमीजी रंगावर तळा.झार्याने सतत बाजु पलटवत रहावे.अगदी मंद आचेवरच तळायचे आहेत..तरच ते आतपर्यंत तळले जातील..तसेच वरील पारी जास्त जाड करु नये.
१०]"किरमीजी गुलाबजाम" बाप्पाच्या प्रसादासाठी तयार आहेंत.
.............................................." गणपती बाप्पा मोरया" "मंगलमुर्ती मोरया"..............................................
पिठीसाखरेचे प्रमाण जास्त गोड हवे असल्यास वाढवता येईल..वरील प्रमाणात पुरेसा गोडवा जाणवतो.
सफरचंदाची दालचिनीयुक्त कॅर्रेमलाइज चव तसेच वरच्या आवरणातील वेलची-जायफळ चव खुपच छान लागते.त्यातील खोबरे व मिल्कपावडरची ही चव जाणवते.
कढईत घातल्यावर फुटत नाहीत त्यामुळे बिघडण्याचे चान्सेस अजिबात नाहीत.
तळताना तूप फार लागत नाही .त्यामुळे तूपकट लागत नाही.
सुलेखा, प्रकाशचित्र अनिवार्य
सुलेखा, प्रकाशचित्र अनिवार्य आहे की हो.
कॅरॅमलाइज्ड अॅपल तुम्ही वापरल्याने आता पर्याय शोधायला लागणार.
वॉव. स्पर्धेत पाकृ आली मस्तच
वॉव. स्पर्धेत पाकृ आली
मस्तच दिसताहेत गुलाबजामुन. वेगळीच आहे कृती.
छान दिसताहेत गुलाबजाम
छान दिसताहेत गुलाबजाम
भोवतालची सजावटही मस्त दिसतेय.
शीर्षकात ३०३२० ऐवजी 'सुलेखा'च लिहा
भरत्, सावली - साखरेचे कॅरेमल
भरत्, सावली -
साखरेचे कॅरेमल करुन त्यात सफरचंदाक्चा किस घातला आहे.
पाकृ.संपादित केल्यावर ,फोटो अपलोड करायला मला थोडा अवधी लागतो ..
व्वा! मस्त दिसतायत गुलाबजाम
व्वा! मस्त दिसतायत गुलाबजाम
मस्तच! स्पर्धेसाठी शुभेच्छा!
मस्तच!
स्पर्धेसाठी शुभेच्छा!
मस्तच!!
मस्तच!!
ओक्के............शेवटी
ओक्के............शेवटी सुलेखाची "पाकृ"च आली का पैल्यांदा! गुड!
मस्त आहे......करून बघीन.
मंजुडी,महिरपीसाठी
मंजुडी,महिरपीसाठी "गुंजा"वापरल्या आहेंत. हल्ली गुंज पहायला मिळत नाही .
छान, नाविन्यपूर्ण आहे हा
छान, नाविन्यपूर्ण आहे हा प्रकार !
वा, वा! मस्त प्रकार आहे. आणि
वा, वा! मस्त प्रकार आहे. आणि दिसताहेतही एकदम तोंपासु ....
मस्त मस्त.
मस्त मस्त.
कसले भारी तोंपासु दिसत आहेत
कसले भारी तोंपासु दिसत आहेत गुलाबजाम. गट्टम गट्टम करावेसे वाटत आहेत फोटोतून उचलून
छान आहेत. जरा क्लोज अप द्या
छान आहेत.
जरा क्लोज अप द्या ना सुलेखाजी.. बघायला मस्त वाटेल.
वा वा, मस्तच आणि
वा वा, मस्तच आणि इनोव्हेटिव्ह!
छान आहे रेसिपी. चव कशी असेल
छान आहे रेसिपी. चव कशी असेल याची कल्पना करून पाहिली
मस्त टेम्पटिंग आहे
मस्त टेम्पटिंग आहे रेसिपी..... नक्की करुन बघेन.
सुलेखा..कसली तोंपासु रेसिपी
सुलेखा..कसली तोंपासु रेसिपी दिलियेस.. सुप्पर्ब!!!!
४]बटाट्याचे साल काढुन किसा.
४]बटाट्याचे साल काढुन किसा. >> की साल काढलेला बटाटा किसा. (मी उगीच कीस पाडतीये... असो.)
- एक टेबलस्पून डेसिकेट कोकोनट ऐकायला छान शब्द आहे पण त्याचे करायचे काय? कृतीत त्याचा काही उल्लेख नाही आणि साहित्य आणि टीपा मध्ये आहे. वाचकाला गृहीत धरले जाते आहे की त्यांना समजेलच काय करायचे. पाककृती कल्पक आहे, सजावट फोटोही छान पण लेखन छान नाही.
सुरेख दिसताहेत ! मस्तच !
सुरेख दिसताहेत ! मस्तच !
मस्तच दिसताहेत
मस्तच दिसताहेत गुलाबजामुन.............
सिमन्तिनी,अभिप्रायाबद्दल
सिमन्तिनी,अभिप्रायाबद्दल आभार. सूचनांबद्दल धन्यवाद..योग्य बदल केला आहे.
बढिया.. नक्की करून खाणार.
बढिया.. नक्की करून खाणार.
भारी दिसतायेत...
भारी दिसतायेत...
मस्त!
मस्त!
गुलाबजाम इतके भारी झालेत तर
गुलाबजाम इतके भारी झालेत तर गणपतीपुढे शंख कशाला ठेवलाय? घंटा ठेवा फूबाईफू सारखी.
ते गुलाबजाम खावेसे वाटत आहेत
ते गुलाबजाम खावेसे वाटत आहेत , एकदम तोंपासु रेसिपी
गुलाबजाम इतके भारी झालेत तर
गुलाबजाम इतके भारी झालेत तर गणपतीपुढे शंख कशाला ठेवलाय? घंटा ठेवा फूबाईफू सारखी.
>>>
सोबत पाक नसला तरी चालतो का?
वॉव.
वॉव.