देव माझा...
जसं जसं वय होत जातं, तसं आमच्यावेळी हे असे नव्हते हो, असे सूर आळवायची सवय लागते, नाही का ?
आता मुंबईतल्या गणेशोत्सवाचेच बघा ना. मी असे म्हणू शकतो कि पुर्वी थर्मोकोल नव्हते, रोंबा सोंबा नाच
नव्हता, रासायनिक रंग नव्हते, नवसाला पावणारे बाप्पा नव्हते कि राजे ही नव्हते... पण नाही, एक गोष्ट
मात्र, इतक्या वर्षात बदलली नाही, ते बाप्पाचे रुप.
अगदी लहानपणापासून बाप्पाचे जे रुप मनात ठसलेय, त्याला आजही कुणी विचलीत केलेले नाही, करु
शकणारही नाही. आणि हा बाप्पा असतो तो फक्त या उत्सवातलाच. देवळात हा भेटत नाही. देवळातल्या
मूर्तींचा कसा, धाक वाटतो. एक अंतर कायम असते. पण या मूर्तींचे तसे नसते.
शाळकरी वयात, बाप्पा म्हणजे कुणीतरी आपला वाटायचा. लाडका शिक्षक वाटायचा. आपल्याला बुद्दी देणार,
परिक्षेत उत्तम गूण मिळवून देणार, असा विश्वास वाटायचा. पण त्याचा धाक नाही वाटायचा.
येई हो विठ्ठले आरतीतला, सूर लांबवताना. प्रसादासाठी पुढे पुढे करताना, आवडलेला प्रसाद परत परत घेताना,
मूर्तीसमोर खेळताना, बाप्पा रागावेल असे कधी वाटलेच नाही.
अगदी डोळ्याला डोळा भिडवून बघत बसायचो. त्या डोळ्यांची कधी भिती वाटली नाही, उलट ते डोळे
कायम आश्वासक वाटत आले आहेत.
इतर देवांचा देवळातील मूर्ती, त्या त्या देवांचे भाव दाखवतात. श्री दत्तात्रेय नेहमीच वडीलधारे दिसतात. तर
मारुतरायाच्या अनागर रुपातही, एक धीरोदात्त मित्र दिसतो. देवीच्या रुपात कधी आई दिसते तर कधी
अन्यायाविरुद्ध लढणारी स्त्री. श्रीरामाच्या मूर्तीत सोसता न येईल असा आदर्श दिसतो तर श्रीकृष्णाच्या रुपात,
एखादे लहान मूल.
पण या बाप्पाचे तसे नाही. वरील सर्व देवदेवता किंचित मानवीरुपात असल्याने, भाव वाचता येतात. पण
गजाननाच्या चेहर्यात मानवी चेहरा नसूनही, एक प्रेमळ भाव दिसतात. बाकी सर्व देवतांच्या मूर्तींचे ओठ
किंचीत विलग दाखवल्याने, स्मितहस्याचा भास होतो, पण बाप्पाला ओठ नसले तरीही, एक मिश्किल हास्य
अनुभवायला येते.
या मूर्तीकारांचे कसब जितके वाखाणावे तितके थोडेच, या अमानवी रुपाला इतके मंगलमय करण्याची किमया
ते सहज साधतात. मूर्तीकडे बघून कधी असे वाटतही नाही कि एका मानवी शरीरावर, गजाचे मुख आहे, हे.
बाकीच्या मूर्ती, या सुघटीत शरीराच्या असल्यामूळे अतिआदर्श आणि म्हणूनच थोड्या परक्या वाटतात
तर बाप्पा हे तुंदीलतनू असले तरी, घरातलेच कुणीतरी आहेत, असे वाटतात.
आणि या आखणी कलाकारांचे कौतूक करावे तेवढे थोडेच. अत्यंत नेमके रंग आणि वळणे यातून बाप्पांचे डोळे
एवढे जिवंत करतात कि, बाप्पा कायम आपल्याकडेच बघत आहे, असे वाटत राहते.
एखाद्या मूर्तीशी एवढी मानसिक जवळीक, केवळ बाप्पाशीच होऊ शकली. आजही मूर्तीचे विसर्जन करताना,
कुणीतरी आपले माणूस, दूर निघाले असे वाटते.
देव म्हणजे ती मूर्ती नाही, ते रुप नाही... ते सर्व या पलिकडे आहे. हे तत्व मनावर बिंबवण्यासाठीच बहुदा
आपल्याकडे विसर्जनाची प्रथा आहे, पण गणेशमूर्तीच्या बाबतीत, हे स्वीकारणे फार अवघड जाते.
विसर्जन झाल्यावरही, त्या ठिकाणी तेच रुप असल्याचा, भास होत राहतो.
आज, जीवनाच्या या वळणावर बाप्पाकडे काही मागावेसे वाटत नाही, पण त्याने कायम सोबत असावे, असे मात्र
वाटते, घरातल्या एखाद्या वडीलधार्या माणसासारखे.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
वा दिनेशदा, सक्काळी सक्काळी
वा दिनेशदा, सक्काळी सक्काळी हा लेख वाचून किती प्रसन्न वाटले म्हणून सांगू......
मर्मग्राही आणि भावपूर्ण लेख.....
गप्पा मारल्यासारखी - सहज लेखनशैली.......
गणपतिबाप्पा मोरया...
खूपच छान लेख दिनेशदा.
खूपच छान लेख दिनेशदा.
छान भावपुर्ण लेख अनेकांची
छान भावपुर्ण लेख अनेकांची भावनाच तुम्ही शब्दबद्ध केली.
खुप सुरेख लेख गप्पा
खुप सुरेख लेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गप्पा मारल्यासारखी - सहज लेखनशैली......>>>>+१
अगदी डोळ्याला डोळा भिडवून बघत बसायचो. त्या डोळ्यांची कधी भिती वाटली नाही, उलट ते डोळे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कायम आश्वासक वाटत आले आहेत.>>>>मनातलं लिहंलय दिनेशदा
अगदी मनातलं,गोड सहज शब्दात
अगदी मनातलं,गोड सहज शब्दात लिहिलंय दिनेश दा..
खूप सुंदर..
लहानपणी विसर्जनाच्या दिवशी तर डोळे भरून यायचे अगदी .. गेल्या दहा दिवसांत केलेली धमाल ,वेगवेगळे प्रसाद, आंब्याची डाळ, खिरापत,या सर्व गोष्टींच्या खूप दिवस आठवणी येत राहायच्या.
गणपती ची रिकामी जागा आवरताना मात्र हृदय जड जड होऊन जायचं..
खूपच छान लेख __/|\__
खूपच छान लेख __/|\__
गणपती ची रिकामी जागा आवरताना
गणपती ची रिकामी जागा आवरताना मात्र हृदय जड जड होऊन जायचं..>>>++१११
खूप सुंदर लेख ........
किती सुंदर आणि सहज लिहिलंय...
किती सुंदर आणि सहज लिहिलंय... खुप आवडलं.
अगदी मनापासून लिहिलंय.
अगदी मनापासून लिहिलंय.
छान भावपुर्ण लेख अनेकांची
छान भावपुर्ण लेख अनेकांची भावनाच तुम्ही शब्दबद्ध केली. >>> + १ खूप आवडला लेख.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान व्यक्त केलंय ! " बाप्पा"
छान व्यक्त केलंय ! " बाप्पा" या संबोधनातच या सगळ्या भावना एकवटल्या आहेत !
लली +१
लली +१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेश, छानच लिहिलय. अगदी
दिनेश, छानच लिहिलय. अगदी मनापासून लिहिल्याच जाणवतय. बाप्पा येतानाचा उत्साह आणि जातानाची हुरहूर अजुनही तेवढीच जाणवते.
आणि हो, ते डोळ्यांच अगदी बरोब्बर. मूर्तिकाराच्या हाताची किमया आहे खरी.
खूप छान!!! मागच्या वर्षी माझी
खूप छान!!! मागच्या वर्षी माझी पाउणे तीन वयाचे लेकीने रडून रडून गोंधळ घातला होता. बाप्पा का जातोय म्हणून. तिला सांगितल की तो त्याच्या आईकडे जातोय त्याला आठवण येतेय आईची, तर ती म्हणते आईला पण आपल्याकडे राहायला बोलऊ पण बाप्पाला जाउ देउ नकोस.
शशांकजी > +१ सुंदर प्रसन्न
शशांकजी > +१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्याकडेही असच आहे.
सुंदर प्रसन्न लेख दा
अखी
खूपच सुंदर लिहिलंत! आवडलंच
खूपच सुंदर लिहिलंत! आवडलंच एकदम!
देवळातल्या मूर्तींचा कसा, धाक
देवळातल्या
मूर्तींचा कसा, धाक वाटतो. एक अंतर कायम असते. पण या मूर्तींचे तसे नसते. >>>>+१
अगदी डोळ्याला डोळा भिडवून बघत बसायचो. त्या डोळ्यांची कधी भिती वाटली नाही, उलट ते डोळे
कायम आश्वासक वाटत आले आहेत. >>> +१
विसर्जन झाल्यावरही, त्या ठिकाणी तेच रुप असल्याचा, भास होत राहतो.>>>+१
दिनेश दा , खुप च छान लिहल आहे. मनाला अगदी जवळुन स्पर्श करुन गेल....
>>आज, जीवनाच्या या वळणावर
>>आज, जीवनाच्या या वळणावर बाप्पाकडे काही मागावेसे वाटत नाही, पण त्याने कायम सोबत असावे, असे मात्र वाटते, घरातल्या एखाद्या वडीलधार्या माणसासारखे.
अगदी मनापासून.... आवडलं.
खूप आवडलं. अगदी अगदी मनातलं.
खूप आवडलं. अगदी अगदी मनातलं.
छान लिहिलयं?
छान लिहिलयं?
देवळातल्या मूर्तींचा कसा, धाक
देवळातल्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मूर्तींचा कसा, धाक वाटतो. एक अंतर कायम असते. पण या मूर्तींचे तसे नसते.>>>>> दिनेशदा, अगदी मनातल लिहिलत.
अगदी साध्या-सोप्या शब्दात, मनापासुन लिहिलेला तुमचा हा लेख खूप आवडला
छान लिहिलय
छान लिहिलय
शाळकरी वयात, बाप्पा म्हणजे
शाळकरी वयात, बाप्पा म्हणजे कुणीतरी आपला वाटायचा. लाडका शिक्षक वाटायचा. आपल्याला बुद्दी देणार,परिक्षेत उत्तम गूण मिळवून देणार, असा विश्वास वाटायचा. पण त्याचा धाक नाही वाटायचा.
श्री दत्तात्रेय नेहमीच वडीलधारे दिसतात. तर मारुतरायाच्या अनागर रुपातही, एक धीरोदात्त मित्र दिसतो. देवीच्या रुपात कधी आई दिसते तर कधी अन्यायाविरुद्ध लढणारी स्त्री. श्रीरामाच्या मूर्तीत सोसता न येईल असा आदर्श दिसतो तर श्रीकृष्णाच्या रुपात,एखादे लहान मूल.
<<<<<<< अगदी अगदी , दिनेशदा खुप सुंदर लेख, आवडला
दिनेशदा, अगदी अगदी. खूपच छान
दिनेशदा, अगदी अगदी. खूपच छान दृष्टिकोन मांडलात. बर्याचजणांच्या मनातल्या भावालाच तुम्ही शब्दरूप दिलंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप खूप आवडला लेख.
खूप खूप आवडला लेख.
फार आवडला लेख दिनेशदा! गप्पा
फार आवडला लेख दिनेशदा!
गप्पा मारल्यासारखी - सहज लेखनशैली......>>>> पुरंदरे काका, +१०००००
शेवटचं वाक्य तर अगदी आतून आलेलं आहे. फारच छान.
अत्यंत सुंदर शब्दबद्ध केलंय..
अत्यंत सुंदर शब्दबद्ध केलंय.. ! व्वा!!
मंगलमूर्ती मोरया!!!
मस्त.. अगदी माझ्याही मनातले.
मस्त.. अगदी माझ्याही मनातले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सेनापती +१
Pages