टेकाडाचा चढ संपता संपत नसतो... धावून धावून छाती फुटायला आलेली असते , हातातला पलिता नाचवत तो वाट फुटेल तसा वर चढत असतो. डोक्यावरचा फेटा. सुटून पायात अडकत असला. तरी त्याला त्याच भान उरलेलं नसत..पुरुषभर उंचीच्या माजलेल्या गवतातून कसाबसा वाट काढत तो वर पोचतो.. भणाण वार त्याच्या कानात घुसतं, तसा तो भानावर येतो , धडाडणार काळीज काहीस शांत होतं. तो जिथून वर आला.. त्या टोकाला पाहतो .. दूर खाली.. आता अक्ख्या गढीने पेट घेतलेला असतो. आगीच्या ज्वाळा लपलप करत संपूर्ण गढीचा ग्रास गिळत असतात आतून येणारे भयंकर अभद्र आवाज. अजूनही त्याला ऐकू येत असतात .. तो गुढग्यांवर कोसळतो . इतक्या वेळेपासून आणलेलं उसन अवसान गळून पडतं..हळू हळू तो चालू पडतो .टेकाडाच्या दुसर्याबाजूला प्रचंड समुद्र गर्जना करीत त्या टेकडीला आपल्या भयंकर लाटांनी तडाखे
देत असतो .
हातातला पलिता आसमंतात त्याच्या ज्वाळांचे फरारे ओढत त्याला साथ देत असतो .. काही वेळ जातो..आणि अचानक. वातावरण बदलते . दूर अवकाशातून काहीतरी समुद्रात प्रचंड उर्जेने कोसळते . ज्वालामुखीचा स्फोट झाल्यागत लाटा भयंकर वेगाने आवेशाने टेकाडाला धक्के द्यायला लागतात . तो हबकून पाहायला लागतो प्रचंड वावटळ आसपास घोंगावायला लागते , मातीचे लोट आकाशात उडायला लागतात .. डोळे उघडण अशक्य होतं ..आणि जे घडू नये अशी त्याची भीती असते तेच घडतं. पावसाचे टपोरे थेंब अंगावर बरसायला लागतात .. निसर्गाने आणि नियतीने त्याच्या विरुद्ध दान टाकलेलं असत .. काही क्षणातच प्रचंड पाऊस कोसळायला लागतो .. आणि खाली दूर पेटलेली गढी परत शांत व्हायला लागते .तो बेभान होऊन." नाही नाही ".. ओरडत असतो.. पण त्याची हाक ऐकायला देखील तिथे कोणी नसतं . निसर्गाच्या रौद्र रूपा पुढे .. एक क्षुद्र जीव त्याला विरोध करायचा प्रयत्न करत असतो .. मिळालेली हि एकंच संधी . त्यावर देखील नियतीने घाला घातलेला असतो.. आता सुटका नाही . "ते" येणारच .. आता अधिक आक्रमक होऊन.. कधीही.. केंव्हाही ..
तो खाली पाहायला लागतो . गढीतल्या सर्वात वरच्या मनोर्यातला "गुलाबी , निळसर " मंद प्रकाश त्याला जाणवायला लागतो. त्याबरोबर भयानक वेगाने होणार्या सावल्यांचाही आकार त्याला दिसायला लागतो .. आत त्यांचा वावर सुरु झालेला असतो .. हळू हळू त्या सावल्या गढी बाहेर पडतात आणि त्याच्या दिशेने येऊ लागतात.
त्याची हार तो मान्य करतो .. एक क्षणभर त्याला काहीतरी आठवत .. पाकिटातून तो आपल्या बायको आणि लहान मुलाचा फोटो पाहतो ..आता ते दोघेही त्याला परत कधीच भेटणार नसतात ...अभद्र आवाज त्याच्या कानावर यायला लागतो.. खालून काहीतरी भयानक वेगाने आपल्या पाठलागावर येतंय हे त्याला जाणवत .. तो टेकाड्याच्या एका कड्यावर उभा राहतो . आणि दुसर्याच क्षणी त्याची आकृती त्या प्रचंड कड्यावरून दोन तीन ठिकाणी आपटत समुद्रात विलीन होऊन जाते ...
त्याच वेळी पाठलागावर आलेल्या काळ्या सावल्या परत गढीत परतत असतात ,.
आगीत होरपळलेल्या गढीच्या वरच्या मजल्यात काहीतरी घडत असत . त्यांचा मोठा शत्रू आज मार्गातून कायमचानिघून गेलेला असतो .. आता "ते" निर्धास्त झालेले असतात..
**********************************************************************************************************************
प्रसन्न साहेब फोन उचला , माहितेय आत्ताच आला आहात ऑफिस ला.. yz हाक मारतोय तुला सकाळ पासून ..
आणि काय अवतार आहे तुझा.. जरा नीट जा आत . नाहीतर त्यावरून पडेल तुला .. तनया ब्रेकिंग न्युज देत डेस्क वर जाऊन बसली .
मायला हा सकाळी सकाळी कसा काय आला? आणि हा मला का शोधतोय.. ?
मी हादरलोच.. आमचा YZ (आर्कीटेक्ट यश झोपे ) सकाळी १२ नंतर यायचा विचार करतो.. नाहीतर येतही नाही.. साईट वर जाऊन आमची आणि प्रोजेक्टवाल्यांची दिवस दिवस मारणे हा त्याचा आवडता छंद.
गर्दीत विस्कटलेले केस कसे बसे नीट करत.. बाहेर आलेला शर्ट कसाबसा आत खोचत मी आतमध्ये डोकावलो
येस प्रसन्न , please have a seat . मला सांग काय काम आहेत आत्ता हातात तुझ्या ?
(अपेक्षित प्रश्न ) मी धडाधड हातातली काम सांगून मोकळा झालो होतो..
तेवढ्यात.. ओके ओके . करत मला मधेच तोडत YZ सुरु झाला .एक काम कर. जेवढे ऑन गोइंग प्रोजेक्ट्स आहेत ते मनीष, तनया , आणि सुप्रीत ला डीवाइड करून टाक.
(मायला , माझी फाटली .. साला काढतोय कि काय कामावरून )
तुझ्या साठी एक वेगळ प्रोजेक्ट आलंय (हुश... ) . पुढचे ६ ,७ महिने तुला बहुतेक साईट वर जावं लागेल .
"नील हाईट्स" चे आरेकर तुला माहित आहेतच , मागच्या महिन्या आपण त्यांना पालघर मध्ये township डिझाईन करून दिली ते.. त्याचं एक पर्सनल काम आपल्याला मिळालंय
इट्स अ ड्रीम प्रोजेक्ट . थोड्या कष्टात मजबूत पैसा मिळणार आहे (YZ अशी काम लई आनंदाने घेतो . भले कितीही झोल असो.. हा मला लटकवणार एक न एक दिवस )
ओके सर ..
तर त्या आरेकरांनी म्हणे कोकणात "पोळ" नावाच्या कुठल्यातरी गावात एक ३० एकर जागा घेतलीये , त्यात एक जुन्या काळातली एक गढी सुद्धा आहे. ते सगळ तोडून त्यांना ती जागा डेवलप करायची आहे , एक मस्त रिसोर्ट करायचा विचार आहे त्यांचा , ५० क्रोर्स चा प्रोजेक्ट आहे .. so it very important for me , हे डील जर क्र्याक झाल तर आरेकारांची पुढची सगळी प्रोजेक्ट्स आपल्याकडे येतील .
(मला कळत नव्हत हा YZ एवढ पाल्हाळ का लावतोय ) .
तर त्या जागेच्या सर्वे ला. मेजरमेंट घेण्यासाठी.. इतर सर्व इन्फोर्मेशन साठी तू तिथे जाऊन ये.. याच आठवड्यात तुला जायला हव .. लवकरात लवकर मला हे काम सुरु व्हायला हव आहे ..
तिथला contractor मिळणे कठीण दिसतंय.. लेबर पण आहे कि नाही माहित नाही.. ती माहिती सुद्धा काढ .. जाताना माझी एक जुनी कार आहे ती घेऊन जा . कारण बाकी काहि सोय असेल अस वाटत नाही (YZ त्याची कार देतोय? बरा आहे ना ? काहीतरी घोळ आहे ,हे नक्की पण काय ?) हि DVD यात साईट चे फोटोग्राफ आहेत.. मी पाहिलेत. ती जळकी, तुटलेली गढी सोडल्यास बाकी जागा ए१ आहे .. काहीच नाव ठेवायला जागा नाही .. समुद्र जवळ आहे.. एक सुरेख टेकडी आहे ..
रिसोर्ट करायला एकदम उत्तम .. तर तू ते सर्व पाहून घे.. आणि परवाच निघ ओके?
येस सर .. मी उठणार तेवढ्यात YZ जरासा चाचरत म्हणाला ( हा... अब आ गया उंट पहाड के नीचे )
ते गाव खूपच लहान आहे.. आणि जी काही वस्ती आहे ती खूप लांब टप्प्यात विखुरली गेली आहे ..
निसर्गाचा वरदहस्तच आहे जणू त्या गावावर .
आणि अजून एक.. ती जी काही गढी का काय आहे तिकडे . ती म्हणे झपाटलेली आहे , you know .. haunted or possessed ...like that
अर्थात गावकर्यांच अस म्हणण आहे.. स्वतः आरेकर आणि मी तिकडे जाऊन आलेलो आहोत .. आम्हाला कोणालाही तसा अनुभव आलेला नाही . फक्त एक माहिती असावी म्हणून तुला सांगितली,जपून राहा.
(हा एवढा चाचरत का बोलतोय आज .. लोचा हे प्रसन्न )
मी जागेची कागदपत्र चाळत होतो .. तेवढ्यात तोच म्हणाला तुझ्याबरोबर मी शिरीष ला पाठवतोय .. एकट्याला नकोच..
कस काय जायचं ते पहा.. लंच नंतर तुझ काम तू कस काय manage केल आहेस ते सांग.. ओके?
ओके सर .. मी बाहेर आलो..
शिरीष साईट वर होता.. त्याला हि न्युज सांगायला हवी.. तो साला ऑफिसमध्ये कमी बाहेरच जास्त असतो. साईट वर जायचा कोण उत्साह त्याला..
असो फोन करेन नंतर त्याला
डेस्क वर आलो .. तनया आज जबरदस्त दिसत होती.. हिच्यापासून ६ महिने लांब रहाव लागणार .. अरेरे.. मनीष खुश होईल साला.. त्याचा मोठा शत्रू आहे ना मी
पीसी उघडला. DVD तले फोटो ओपन केले .. सुरुवातीला . समुद्राचे.. टेकड्यांचे, शेतांचे, फोटो होते. सुंदरच साईट आहे ..
सातव्या फोटोत ती गढी दिसली आणि मी हादरलोच .. पुढचे सगळे फोटो मी अधाश्यासारखे पहिले ..
माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता .. हो तीच ती गढी..जळलेली. भेसूर. विद्रूप..
गेल्या २५ वर्षांपासून जे अगम्य कोडं स्वतःशी बाळगून होतो .. ते आज अनपेक्षित पणे माझ्या समोर आलेल होतं ..आता ते उलगडणार यात शंकाच नव्हती
क्रमशः
क्रमशः पण चांगलीच गूढ
क्रमशः
पण चांगलीच गूढ वटतेय! पटापटा टाका!
रच्याकने: मी पहिली का क्काय?
छान आहे. झटपट पूर्ण करणार
छान आहे. झटपट पूर्ण करणार काय ?
अरे वा , भय कथा आणि गुढ कथ
अरे वा , भय कथा आणि गुढ कथ सुद्धा
लवकर येऊ देत पुढचे भाग
ह्म्म्म्म..... इंट्रेस्टिंग!!
ह्म्म्म्म..... इंट्रेस्टिंग!!
पटपट येउ ध्या हो!!
पटपट येउ ध्या हो!!
धन्स.. पुढील भाग लवकर
धन्स.. पुढील भाग लवकर टाकण्याचा प्रयत्न राहील
क्रमशा
क्रमशा
प्रसन्न अ आय हेट क्रमशः
प्रसन्न अ आय हेट क्रमशः
खि खि :
खि खि :
अहो प्रसन्न अ, काय? वाचकांवर
अहो प्रसन्न अ, काय? वाचकांवर सूड नका उगवू बरं का..लवकर लवकर टायपा!
नाहीतर मला एक सूडकथा लिहायला घ्यावी लगेल!
सुरेख. पु.ले.शु..............
सुरेख.
पु.ले.शु..............
पुढे कधी???
पुढे कधी???
लवकर भाग टाका पु ले शु
लवकर भाग टाका
पु ले शु
जबरी सुरूवात! जरा इथे
जबरी सुरूवात!
जरा इथे दुसर्या भागाची लिंक दे ना. तसंच दुसर्या भागात तिसर्याची, तिसर्या भागात चौथ्याची दे. चार भागात आटपेल ना?
भानु.....१०००००००००००
भानु.....१००००००००००० मोदक..++१
अरे व्वा... मस्तंच!
अरे व्वा... मस्तंच!
छान आहे
छान आहे
Pudhcha bhag lihila ahe ka?
Pudhcha bhag lihila ahe ka? Plz koni link deil Ka?
http://www.maayboli.com/node
http://www.maayboli.com/node/41601