चित्र बोलते गुज मनीचे - (काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा) - प्रकाशचित्र क्र. २ (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)

Submitted by संयोजक on 7 September, 2012 - 11:54

Zabbu_008.jpg

स्पर्धेचे नियम व अटी :-

१. या स्पर्धेत भाग घेण्याकरीता मायबोलीचे सभासदत्व अनिवार्य आहे.
२. प्रवेशिका पाठवण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सदस्यत्व घ्यावे लागेल त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सभासद झाला आहात.
३. वरील प्रकाशचित्रावर स्वरचित चारोळी पाठवायची आहे. काव्य कुठल्याही वृत्तात, कुठल्याही छंदात चालेल, मात्र फक्त चारच ओळी.
४. एक सदस्य एका प्रकाशचित्राकरता एकच प्रवेशिका पाठवू शकतो.
५. प्रत्येक प्रकाशचित्राच्या खाली प्रतिसादात, त्या त्या चित्रावरच्या चारोळ्या लिहावयाच्या आहेत.
६. प्रवेशिका दि. २९ सप्टेंबर २०१२, अनंत चतुर्दशीपर्यंत (अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍याची प्रमाणवेळ) पाठवू शकता
७. या स्पर्धेकरता परीक्षक मंडळ नेमण्यात येईल.
८. स्पर्धेचा अंतिम निकाल अनंत चतुर्दशीनंतर काही दिवसात जाहीर करण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाल मातीतली वाट नदीकडे जाते
द्रुतगती तिथे तिची शांत क्लांत होते
तिथेच मी प्रीतीचे रोप लावलेले
आज त्याच छायेत 'ती' विश्रांती घेते

चारोळी
----------------------------------------------
हिरव्या झाडामधून जाते लाल तांबडी वाट
युगा युगाच्या वाटेवर या कधी लागतो घाट
कधी लागते गजबजलेली झाडीही घनदाट
काय सांगावे कधी इथे पडेल कुणाशी गाठ.

आयुष्याच्या पाऊल वाटेवर
सुःख दुःखाची वहिवाट चालूच राहणार
एक वेळ खचेलही ही पाऊल वाट खूप सोसून
पण शेवटी एकाकी हा प्रवास सुरूच राहणार

आयुष्याच्या वाटेवर चालताना
येईल ते स्वीकार पण गुंतू नको
मध्येच भेटेल सुबक कापले-पण
हिरवाईच्या क्षणांनी मातू नको

हिरव्या पानांमधुनी उतरता
शुभ्र उन्हे मऊशार जाहली
पायवाट तांबडी धुळीची
हिरव्या वळणावर झुकलेली...

शांत-निवांत हा हिरवा गारवा!
पायवाट ही जाते दिगंतास
ऊन-सावलीचा चालता लपंडाव
नवेच गूढ येते जन्मास!!!

गेली ही वाट रानावनातुन
रविकिरणे डोकावली त्यातुन
येथे क्षणभर विसावुन पाथस्थ
होईल जोमाने पुन्हा मार्गस्थ

वाटा पोटार्थी, भुयारी ; तुडविता नित्य,
खंत ती दाटे मनी, कटु ते सत्य
राहिल्या दूर पाऊलवाटा, स्मरती सावल्या र्निगुण
तिथवर जरी पुन्हा पोचता, अदृष्य ते वळण

हिरव्या रंगाचा मखमली शालु
त्याला सोनेरी उन्हाचे काठ
लाजत मुरडत निघाली
ही नागमोडी पाऊलवाट

पायाखालची सरळसोट वाट हलकेसे वळण घेऊन झालेली दृष्टीआड
दोहोंकडेची झाडे स्तब्ध, मूक; हवेतही दाटलेली एक शांतता, गूढ
मनातल्या उत्सुकतेस भीतीचा स्पर्श होताच पाऊल अडखळले
क्षणभर थांबून अदमास घ्यावा तर बाजूला हे खोड - आडवे, वठलेले

हिरव्या मांडवाखालून जाते आहे लाल शालुतली नवरी

झीरमिरत्या उन्हात पुरती न्हाऊन गेली

पुढील वळणावर काई आहे माहित नाही तिला

म्हणे , आहे सखा सोबतीस तर घाबरू मी कशाला

हिरव्या मांडवाखालून जाते आहे लाल शालुतली नवरी

झीरमिरत्या उन्हात पुरती न्हाऊन गेली

पुढील वळणावर काई आहे माहित नाही तिला

म्हणे , आहे सखा सोबतीस तर घाबरू मी कशाला

ही वाट की वहिवाट,कुठे घेउन जाई?
आयुष्यातही असते कदाचित वळणावळणाची दाटी
कुठे गर्द झाडी तर, कुठे रणरणते ऊन
मनात का चालले हे विचारांचे मौन.

ओढ लागली ग माहेराची सकाळपासून
वाट तांबड्या मातीची वळे झाडाझाडांतून
गर्द सावली बघून जिथं विसावलं ऊन,
'चल जाऊ त्या वाटेला' मन सोडी भंडावून

धरणीवर पडला एक वृक्ष इथे
वन्यजीव, लता नी वृक्ष हिरवे
काळाच्या आत दडतील सारे
मानवी गंध फक्त दरवळेल इथे.

वाट वाकडी खडतर असे ही जीवनापरी
भली माणसे देतील तव छाया वृक्षापरी
भिऊ नकोस कदापी तु या चराचरास
जग सचोटीने पार करशील भवसागरास

हिरव्या वळणा-वळणातून जाते
सखे, माझ्या माहेरची वाट...
कितीही चाला संपत नाही,
गर्द कोवळ्या हिरवाईचा काठ !

लहनपनीचा काळ सुखाचा
रंगायचा इथेच खेळ सावल्यांचा
सावल्यांचेही अर्थ आता कळाले
आपणही निस्वार्थी व्हावे जाणवले !

अरे ! आताशी कुठे गड चढायला सुरु झालोत
आणि लगेच दुखायला लागले पाय ??
आँ !! गेले कुठे सगळे ????
मागच्या मागे पळाले की क्वॉय ???

Pages