शेम शेम

Submitted by Mandar Katre on 5 September, 2012 - 13:03

आज अमेरिकेच्या वॉशिंगटन पोस्ट ह्या वृत्तपत्र समूहाने भारताच्या पंतप्रधानांवर "भ्रष्ट मंत्रीगटाचे नेते " ( जे दुर्दैवाने ते आहेतच ) आणि मौन मोहन ( वस्तुस्थिती )अशी टीका केली आहे ....कारण आज पर्यंत भारतातील इतक्या सर्वोच्च पातळीवरील नेत्या बद्दल अशी टीका झालेली नाही .
वास्तविक हि एका दुसऱ्या देशातील भारता बद्दलची प्रतिमा झाली आहे हे दुर्दैव ..... पंतप्रधान ह्या देशातील सर्वोच्च पदाची अशा प्रकारे टीका करणे योग्य नाही कारण आंतरराष्ट्रीय राजकीय पातळीवर हेच पंतप्रधान १२० कोटी जनतेच्या भारताचे ( दुर्दैवाने) प्रतिनिधित्व करत असतात ..... दुर्दैवाने ज्या व्यक्तिगत पातळीवर हि टीका झाली ती वावगी नक्कीच नाही आणि चुकीची तर नाहीच पण .... ती वयैक्तिक न होता पंतप्रधान ह्या रूपाने झाली आहे !!! त्या मुळे दुर्दैवाने असे पद अभिमानाने ( स्वच्छ म्हणून ) मिरवणारे आणि त्याच (फुक्या) अभिमानाने त्यांना खांद्यावर घेऊन नाचणारे, ह्यांच्या ( नसलेल्या ) डोक्यात थोडा तरी प्रकाश पडणार आहे कि भ्रष्टाचारा चि गंगा अशीच वाहत राहणार आहे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी एक्झॅक्टली या शब्दात नाही, पण वाजपेयींवर सुद्धा अशीच टीका 'टाईम' ने केलेली होती.
http://www.time.com/time/magazine/article/0,9171,260747,00.html

सिब्बल वगैरे लोकांची प्रतिक्रिया नाही का आली अजून यावर? 'पोस्ट' वर बंदी घाला ई? Happy

"WASHINGTON: Indian Prime Minister Manmohan Singh has been described as "a dithering, ineffectual bureaucrat presiding over a deeply corrupt government" by a leading US daily."

Has been described - म्हणजे 'असे म्हणतात'!
कोण म्हणतात? त्यांना काय माहिती आहे? त्यांचा अधिकार काय? नक्की काय म्हणाले?
बातम्या सनसनाटी करायला पराचा कावळा करणे हा तर वर्तमानपत्रांचा प्रमुख धंदा!

या कारणांमुळे अगदी वॉशिंग्टन पोस्ट ने लिहीले तरी, त्यांनी लिहीलेले सगळे खरेच असते असे नाही.

अमेरिकेत असे अनेक लोक आहेत की जे भारतविरोधी आहेत, त्यातले काही पूर्वी अमेरिकेत सिनेटर नि House of Representatives मधे होते. ते प्रत्येक वेळी भारतविरोधी निरनिराळे कायदे propose करत. आता ते लोक निवडणुका हरले.
अमेरिकेत अनेक माथेफिरू white supremacists आहेत. त्यांची अशी खात्री आहे की White Anglo-Saxon Protestant लोकांखेरीज इतर लोक ही माणसेच नाहीत म्हणून त्यांना गुलाम करा. आता ते शक्य नाही तर शिखांच्या गुरुद्वारावर भेकडासारखा हल्ला करा, ट्रेव्हान मार्टिनसारख्या काळ्या माणसाला केवळ संशयावरून मारून टाका, असले धंदे करतात.

भारतावर 'जळणारे' लोक इथे अनेक! स्लम डॉग ... सिनेमात त्यांना फक्त घाण नि दाळिद्र्यच दिसले. पण प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून यशस्वी झालेल्या माणसाची गोष्ट नाही दिसली!

इथे माझ्यासारखे अनेक लोक आहेत, ज्यांना भारतातली परिस्थिती अजिबात माहित नसते. ते लोक भारतीय वृत्तपत्रे वाचून माहिती गोळा करतात. पण भारतीय वृत्तपत्रात नुसतेच अमक्याने भ्रष्टाचार केला, घोटाळा केला असे लिहीतात, लोक ओरडतात. पण पुढे पुरावे आहेत का? आरोप खरे आहेत का, याबद्दल काही नाही! चांगले सुद्धा खूप होत असणार, त्याबद्दल का लिहीत नाही?
मग जगातल्या लोकांनी वाइटच छापले नाही तर नवलच.

त्यातून, भारताला कुणिहि शिव्या द्याव्यात. ज्या लोकांना भारतीय सरकारने पैसे देऊन भारताच्या हितसंबंधांचे रक्षण करायला इथे नेमले आहे, त्यांना आधी असे काही झाले हे माहितच नसते, किंवा उत्तर द्यायला वेळ नसतो, 'आमच्याकडून अधिकृत माहिती घेतल्याशिवाय असे छापले याबद्दल निषेध' एव्हढे सुद्धा ते कधी म्हणत नाहीत!!

तेंव्हा असले काही वाचून 'आपलेच चुकते' असे पुनः जगभर सांगत बसण्यापेक्षा मुकाट्याने आपसातली भांडणे आपसात ठेवावी.

काही आठवड्यांपुर्वीच टाईम ने त्यांना underachiever असे संबोधले होते. आता वॉशिग्टन पोस्ट. अमेरिकेला पंतप्रधान मनमोहन सिंगां कडुन काय हवे आहे आणि ते मिळत नाही म्हणुन आगपाखड सुरु आहे ?

भारतात भ्रष्टाचार आहे हे मी नाकारतच नाही, तो भारताचा प्रश्न आहे आणि भारतानेच सोडवायचा आहे. पण जेव्हा टाईम आणि वॉशिग्टन पोस्ट एकत्र सांगतात तेव्हा नक्कीच काहीतरी शिजत आहे असे वाटते, हेतू नक्कीच शुद्ध नाहीत.

उदय

भारतात भ्रष्टाचार आहे हे मी नाकारतच नाही, तो भारताचा प्रश्न आहे आणि भारतानेच सोडवायचा आहे. पण जेव्हा
टाईम आणि वॉशिग्टन पोस्ट एकत्र सांगतात तेव्हा नक्कीच काहीतरी शिजत आहे असे वाटते, हेतू नक्कीच शुद्ध
नाहीत.

+ १००००००

आजकाल काहीही झाले की त्यामागे परकिय शक्तिन्चा हात आहे हे म्हणायची फॅशन आहे.
तसही जोपर्यन्त बाहेरचे आपल्याला एखादी गोष्ट सान्गत नाहित तोपर्यन्त आपला विश्वास बसत नाही.
योगा हे एक उत्तम उदाहरण आहे
आणि त्यानी टिका केली म्हणुन रिटेल ओपन केले असे म्हणने किवा त्यामध्ये रिलेशन आहे असे मानने बालिशपणाचे आहे.

डोक्यात थोडा तरी प्रकाश पडणार आहे कि भ्रष्टाचारा चि गंगा अशीच वाहत राहणार आहे?

भ्रष्टाचाराची गंगा अखंड वाहतीच असते. फक्त हात धुवायाचा चान्स काँग्रेसला की भाजपाला हाच कळीचा मुद्दा असतो.