स्वागत : मायबोली-गणेशाचे

Submitted by UlhasBhide on 18 September, 2012 - 00:02

स्वागत : मायबोली-गणेशाचे

‘मायबोली’च्या मंडपी
विराजावे गणराया
आतुरले माबोकर
तुझे स्वागत कराया

तुझे ॐकार स्वरूप
इथे e-कारे साकारे
आंतर्जालीय मखरी
रूप सजते साजिरे

कला-साहित्य-नैवेद्य
गोड मानुनीया घ्यावा
आशिर्वाद रूपे आम्हा
लाभ प्रसादाचा द्यावा

माय मराठी; गणेशा
जणू तुझे शब्दरूप
तिच्या पाऊलखुणात
आम्ही तुझ्याशी तद्रूप

मार्गावर एकत्वाच्या
लाख चालती पावले
’लोकमान्य’ उद्दिष्टांना
मायबोलीने जपले

माबोकरांची ही सेवा
देवा स्वीकार करावी
कृपाप्रसादाने तुझ्या
’मायबोली’ बहरावी

.... उल्हास भिडे (१२-९-२०१२)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
गणेशोत्सव उद्यापासून सुरू होत असला तरी, उद्या ऑन-लाइन येणं जमेल की नाही याबद्दल साशंक असल्याने
ही कविता आजच प्रकाशित केली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझे ॐकार स्वरूप
इथे e-कारे साकारे
आंतर्जालीय मखरी

’लोकमान्य’ उद्दिष्टांना
मायबोलीने जपले
<<<

मस्त

मायबोली’च्या मंडपी
विराजावे गणराया
आतुरले माबोकर
तुझे स्वागत कराया>> काका, हा कंसेप्ट फार आवडला, आणि म्हणूनच कविताही Happy

तुझे ॐकार स्वरूप
इथे e-कारे साकारे
आंतर्जालीय मखरी
रूप सजते साजिरे
>>मस्तच भिडे काका . e-कार हा शब्द खूप पर्फे़क्ट वाटला.
परवा आपल्या मायबोलि चा वाढदिवस होता....

मला जशी सूचली तशीच सरळ ध्वनीमुद्रित केलेय ही वेडीवाकुडी चाल....खालील दुव्यावर ऐकून गोड मानून घ्या. Happy
http://www.divshare.com/download/19582452-afd
त्यातूनही जर कुणाला ही चाल गाण्यालायक वाटल्यास त्याने/तिने आपल्या सुमधुर आवाजात गाऊन इथे त्याचा दुवा द्यावा ही विनंती.

मस्तच !

प्रासादिक रचना. प्रमोद देवांची चालही छानच.

गणपती बाप्पा मोरया.....!

-दिलीप बिरुटे

उल्हासजी कमाल केलीत ! प्रमोदजींची चालही छान, तेवढा एक तबल्याचा ताल मिस केला.

प्रमोदजी,
तुम्ही लावलेली चाल ऐकली, चांगली वाटली.

परंतु, सदर कवितेचा आशय/भाव/मूड ध्यानात घेता,
विनवणी, आर्त आर्जव इ. भावांसाठी योग्य असलेल्या चालीपेक्षा
लाइट मूडची चाल अधिक योग्य होईल असे वाटते.

प्रांजळ वैयक्तिक मत दिलंय..... कृगैन

धन्यवाद उल्हासजी.
कवीला जे म्हणायचंय ते भाव जर चालीत नेमकेपणाने उतरले नसतील तर मग चाल नक्कीच फसली असे म्हणायला हरकत नाही. Happy
आपण म्हणताय त्या अनुषंगाने चाल लावता आल्यास पुन्हा एकदा प्रयत्न करतो.

छान कविता उकाका......
देवकाकांची चालही मस्तच. Happy

कवितेचा आशय छान जमलाय.
मायबोलीच्या आवाक्याचा आढावा नेमका मांडलाय. Happy

कला-साहित्य-नैवेद्य
गोड मानुनीया घ्यावा
आशिर्वाद रूपे आम्हा
लाभ प्रसादाचा द्यावा >> बाकी इथे मी चुकून लाभ प्रतिसादाचा द्यावा..
असं वाचलं.
म्हणलं उल्हास काका आता इथे गणपतीजवळही 'रिक्षा' फिरवू लागले की काय. Happy

छान... मायबोली ची असली तरी अगदी ऊस्फूर्त वाटते आहे आरती/कविता.

(बाकी या सदरात फक्त एकच स्वरचित आरती...? मायबोलीवर ईतके कवी लोक्स असताना हे थोड पचायला अवघड जातय... )

.