Submitted by भारती.. on 16 September, 2012 - 15:37
अन्वय
प्रत्यंचेच्या अवघ्या ताणावर
चढवलेला एकच बाण.
स्वामी स्वप्नांचा. हेतू जगण्याचा.
प्राणांचा प्राण.
आंतरविस्तारांवर तरळते
चांदणे तुझ्या शक्यतेचे.
बदलते समस्यांची रंगसंगती
बदलतात आकार वस्तुजाताचे.
सारे संघर्ष सोपे होतात.
तू नाहीस. तू नव्हतास.
सारी वणवण,सारे फोलपण
तुझा भास.भ्रमनिरास.
कधीतरी पुरं बरसेल ?
मळभात दाटेल ? विजांनी फाटेल ?
तुझ्या अन्वयांचं आभाळ
माझ्या ओंजळीमध्ये साठेल ?
- भारती बिर्जे डिग्गीकर
('मध्यान्ह'मधून)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच...... "प्रत्यंचा "
मस्तच......
"प्रत्यंचा " प्रतिमेचा सुरेख वापर.
व्वा. अप्रतिम . संपूर्ण कविता
व्वा. अप्रतिम . संपूर्ण कविता खुपच आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझ्या अन्वयांचं आभाळ
माझ्या ओंजळीमध्ये साठेल ? ---------> हा लाजवाब प्रश्नांकीत शेवट म्हणजे या अप्रतिम कव्याची उंची वाढवणारा आहे.
अभिनंदन.
अप्रतिम!
अप्रतिम!
खूप आभार शाम,
खूप आभार शाम, सुधाकर,आर्.एस्.टि. ..
छान .... पहिलं आणि शेवटचं
छान .... पहिलं आणि शेवटचं कडवं अधिक चांगलं वाटलं.
सुंदर कविता व नेहमीप्रमाणेच
सुंदर कविता व नेहमीप्रमाणेच अतिशय परिपक्व विचार
भारतीताई अतिशय सुरेख
भारतीताई अतिशय सुरेख काव्य!!
आपल्या कवितेत भरीचे व.पाल्हाळ लावणारे शब्द नसतातच
अगदी नेमके अन् नीटनेटके आरेखन असते भावभावनान्चे
...........नेहमीच
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद बेफिकीर,वैभव,उल्हासजी. या अशा प्रतिसादांपासून ही कविता वंचित होती.
इथे माझ्या प्रिय मुंबईत ती मात्र निर्वासित होती, मायबोलीवर तिला घर मिळालं !
चार कडवी मिळून एक कविता
चार कडवी मिळून एक कविता आहे....
पहिली तीन कडवी तीन परिपूर्ण कविता आहेत..
आणि चौथं कडवं म्हणजे १५-२० कविता एकत्र आहेत..!
कधीतरी पुरं बरसेल ?
मळभात दाटेल ? विजांनी फाटेल ?
तुझ्या अन्वयांचं आभाळ
माझ्या ओंजळीमध्ये साठेल ?
ह्यावर विचार करावा तेव्हढा कमीच........................!
ग्रेट ! हॅट्स ऑफ !
आवडली. नेमके अर्थवाही शब्द
आवडली. नेमके अर्थवाही शब्द भिडून गेले.
व्वा कविता आवडली. कधीतरी पुरं
व्वा कविता आवडली.
कधीतरी पुरं बरसेल ?
मळभात दाटेल ? विजांनी फाटेल ?
तुझ्या अन्वयांचं आभाळ
माझ्या ओंजळीमध्ये साठेल ?
हे विशेष.
वा ! अप्रतिम सुंदर !
वा ! अप्रतिम सुंदर !