आठवण

Submitted by rupalisagade on 21 May, 2008 - 04:22

मंडळी, माझ्या पहिल्याच कथेला तुम्ही दिलेला प्रतिसाद पाहून आणखी काही लिखाण इथे टाकायला हुरुप आलाय. ही कविता, मी माझ्या अनुदिनीवर ही टाकली आहे, पण मायबोलीवर खास तुमच्यासाठी.
*******************************
मी कामात गुंतलेली असते..
अचानक
मनाच्या कुठल्याशा कप्प्यात जपलेली
एखादी आठवण खोडकर होते..
’जरा बस ना माझ्या जवळ’,
साखरपेरणी करु लागते.
मी हसते गालातल्या गालात !
तिला टप्पल मारुन,
पुन्हा कामाला लागते..
तसा तिचा खोडसाळपणा,
आणखी वाढतो..
ती हळूच, माझ्या नकळत,
मनभर फिरते..
आणखी आठवणी जाग्या करत !
आणि मग
सा-याजणी फेर धरतात..
काम बंद चा नारा देतात..
आता मात्र माझे काहीच चालत नाही..
मनातल्या मनात,
मी सा-यांना कुरवाळते..
त्यांचे लाड पुरवते.. त्यांच्यात हरवून जाते..
मग हळूच त्याही,
मला तुझ्यापाशी आणून सोडतात..
आणि मग आठवणीच्या गर्दीमध्ये,
मी फिरत रहाते,
तुझा हात हातात धरुन !

गुलमोहर: 

सुपर्ब !!!
-प्रिन्सेस...

सुरेख... आठवणींचं लडिवाळ, रूपाली!

खुप छान!
-----निलेश

मस्त.....
सहज आलीये असं वाटतं....
लिहीत रहा....

ए किति छान आहे गं....
मनातल्या मनात,
मी सा-यांना कुरवाळते..
आवडली . लिहित रहा. Happy

वाह सही एकदम....!