गझल
तिनिसांजेला उरात माझ्या एक पोकळी वावरते!
आठवणींची गजबज होते, मन माझे अन् गांगरते!!
ताटावरुनी उठून गेले, पोर कधीचे कामाला.....
अजून नाही पत्ता त्याचा, घर केव्हाचे हंबरते!
हवा मोकळी आहे, झुळझुळ झुळूक वाहे वा-याची;
तुझी गंधवार्ताही नाही, अंतरंग हे गुदमरते!
काय फरक पडतो हत्तीला? खुशाल भुंकू दे कुत्री!
जे जे त्याच्या पायाखाली येते, ते ते चेंगरते!!
तुला कशाला हवे निमंत्रण? दारे उघडी तुजसाठी!
माय, मुलासाठी हृदयाच्या पायघड्याही आंथरते!!
निजलेल्या बाळास कुणाची नजर न लागो म्हणून ती....
माय तिच्या बाळावरती त्या पदर स्वत:चा पांघरते!
म्हणून माझ्या संसाराचा गाडा इथवर आलेला!
किती पसारे करतो मी, पण, पत्नी सारे आवरते!!
मूर्तिमंत सौजन्य जणू तो! स्नेहाचा निर्झर आहे!
शब्दाशब्दामधून त्याच्या प्रेम केवढे पाझरते!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विजयराव! डोके असणा-यांकडून व
विजयराव!
डोके असणा-यांकडून व डोके असणा-यांपुढेच डोकेफोड केली जावू शकते.
माझीच काय, तुमची, इतरांची कुणाचीही गझल ज्याचा त्याचा दर्जाच दाखवून देते. शायर काय जगतो, त्याची प्रतिमासृष्टी, प्रज्ञा, प्रतिभा इत्यादी गोष्टी, यावरून शायराचा दर्जाच कळतो. त्याची मानसिकता कळते.
आपण करत असलेल्या पोकळ सल्ल्यांची पोपटपंची मला ऎकवत नाही.
मला कशाला बाबा पोटशूळ उठायला पाहिजे? कुणीही कुणालाही ओवाळू देत, मला काय फरक पडतो? माझा एक शेर आहे.............
“घोटाळता न आले मज भोवती कुणाच्या;
माझ्याशिवाय बाकी सारे हुशार होते!”
हे आमचे व्यक्तीमत्व! तेव्हा आपणास आश्चर्य वाटते की वाटत नाही यावर काहीच अवलंबून नाही.
बाकी, चंगेजखानच्या भूमिकेचा आपणास कंटाळा आलेला दिसत आहे! म्हणून हे नाव आम्ही घ्यावे असे आम्हास आपण सांगत आहात.
...........प्रा.सतीश देवपूरकर
.............................................................................................
किती लिहाल?? कि ति लि हा
किती लिहाल?? कि ति लि हा ल?????
ओ देवपूरकरमामीऽ, मामांना जरा घरकाम सांगत जा बघू!
मूर्तिमंत सौजन्य जणू तो!
मूर्तिमंत सौजन्य जणू तो! स्नेहाचा निर्झर आहे!
शब्दाशब्दामधून त्याच्या प्रेम केवढे पाझरते!
------------------हा शेर आहे????????????? ---------------------------------
कमळ घर बघ
बबन वर बघ
जगन फणस घे
फणस धर बघ
हेही शेर आहेत असे माझे ठाम मत आहे.
( घ - घे चालते. शेवटचे अक्षर गुरु)
निषेध निषेध निषेध!!!! माझ्या
निषेध निषेध निषेध!!!!
माझ्या सोडून बाकी सर्वान्च्या प्रतिसादान्ची दखल(....खबर!!:डोमा:) घेतली आहे हे हेतुपुरस्सर्पणे होते आहे
देवपूरकर सर , मायबोली वर
देवपूरकर सर ,
मायबोली वर पहिल्यांदाच काहीतरी लिहितो आहे. गेले बरेच दिवस इतरांची तुमच्या गझलांवर होणारी चर्चा मी वाचतो आहे ... कधी नवीन काही शिकण्यासाठी किंवा कधी नुसती करमणूक म्हणून.
एकदा अबोला धरला तर कायमची रुसली ती
मी जेथे जे पिकते ते विकण्याचे धाडस केले
"बेफिकीर" जिंचा हा शेर आपल्याला आवडला नाही. माझ्या साठी तो "हासिले गझल" आहे. ज्याची त्याची "टेस्ट" असते.
तुमच वय , ज्ञान , गझल संपदा या सगळ्याचा उचित मान ठेऊन मी सांगू इच्छितो कि "कुठे थांबायचे आणि किती ताणायचे ह्या बाबत तुम्ही पुन्हा एकदा विचार करायला हवा" ( तुमच्या चर्चा वाचून हा माझा ( फुकटचा ) सल्ला वायाच जाणार असे वाटते ). असो.
इथे लिहिणारे "बेफिकीर"जी , ज्ञानेश या लोकांचा मी खूप मोठा चाहता आहे. मायबोली च्या आधी हे सगळे लोक सुरेशभट.इन वर लिहायचे / ओर्कुट वर लिहायचे तेव्हा पासून मी त्यांना वाचतो आहे. रणजीत ( रसप ) आणि मी बरोबर लिहायला शिकलो गझल. हि सगळी मंडळी ( माझ्या सकट ) हि "आज" ची पिढी आहे. तुमच्या मध्ये आणि आमच्या मध्ये फार मोठी जनरेशन gap आहे. तुमचे आणि आमचे विचार जुळणे जवळ जवळ अशक्य आहे. तेव्हा तुम्ही तुमचे विचार आमच्यावर लादणे किंवा आम्ही तुमच्यावर लादणे हे चूक(च) आहे.
आणि लादायचे नाहीत म्हणायचे , पण जुळवत बसायचे , सतत स्पष्टीकरण द्यायचे हेही तितकेच चूक आहे.
ज्ञानेश चे म्हणाल तर तुमच्या मनात भट साहेबांचे जे स्थान आहे ते माझ्या मनात ज्ञानेश चे आहे. त्याच्या अनेक गझल तोंडपाठ आहेत माला. हे मी कधी त्याला सांगितले नाही. त्याने हि कधी माला किंवा इतर कुणालाही "तो किती मोठा आहे" हे सांगितले नाही / नसावे. गझल चांगली असल्यास बाकी गद्य पाल्हाळ करावी लागत नाही.
कृपया आमच्या श्रद्धा स्थानांना धक्का लावू नका हि नम्र विनंती.
आकाश
बघा, गेले की नाही सगळेच मुसळ
बघा, गेले की नाही सगळेच मुसळ केरात.............
"प्रोफेश्वर" साहेब, ही तुमची
"प्रोफेश्वर" साहेब,
ही तुमची जी काही थेरं चालली आहेत. त्याचा आधी कंटाळा, नंतर वैताग आणि आता संताप येतो आहे. तुमच्या इतका आढ्यताखोर माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. तुम्ही तुमच्या फुटकळ शब्दप्रयोगासाठी दिलेले त्याहून फुटकळ स्पष्टीकरण जितकं हास्यास्पद होतं तितकं त्या फालतू युक्तिवादांचे पुन्हा दिलेलं स्पष्टीकरण संतापजनक आहे. तुम्हाला ज्ञानेश, वि.दि.पा., डॉक. आणि बेफि. ह्यांच्याबद्दल काहीही माहित नाही. त्यांच्यावर फडतूस तोंडसुख घेऊ नका. ह्यांच्या गझला वाचून आकाशदाने सांगितल्याप्रमाणे आम्ही शिकतो, मोठे होतो आहोत. ही आमची श्रद्धास्थानं आहेत. कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर चिखलफेक करणे आम्हाला मान्य नाही.
असल्या मूर्ख माणसाशी वाद घालून ज्ञानेश, वि.दि.पा., डॉक. आणि बेफि. ह्यांनी आपला बहुमूल्य वेळ खर्च करू नये ही मन:पूर्वक विनंती. कारण त्याने काहीही साध्य तर होणार नाहीच पण कदाचित तेव्हढ्या वेळात आमच्यासारखे अनेक लोक तुमच्या एखाद्या सुंदरश्या गझलेला/ शेराला मुकतील.
कदाचित, माझ्या ह्या प्रतिसादाला प्रोफेश्वर त्यांच्या आत्मप्रौढीबाज ढंगात अजून एक प्रबंधरूपी उत्तर देतील... मीही त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणार आहे. कारण माझ्याकडेही ह्यापेक्षा बरे उद्योग आहेत.
....रसप....
गझल म्हणजे काय रे भाऊ?
गझल म्हणजे काय रे भाऊ?
ज्ञानेश, वि.दि.पा., डॉक. आणि
ज्ञानेश, वि.दि.पा., डॉक. आणि बेफि. ह्यांनी आपला बहुमूल्य वेळ खर्च करू नये ही मन:पूर्वक विनंती.>>>>>>>>>>>>
येस्स मी तेच म्हणतोय
अहो या कामासाठी मी आहेच ना इथे
पहा माझा दरारा देवपूरकरान्च्या मनात किती आहे ते
अजूनही ते माझ्या 'त्रिण्' बद्दल हू कि चू करत नाहियेत
असो रणजित तू ही नकोस रे वेळ वाया घालवुस मी आहे ना तसेही मला काय काम धन्दा नाहीच आहे ना .....म्हणून म्हणालो मी
टीपः या कामात मी एकटा नाहीयेय बरका माझा विठ्ठल माझ्या सोबत आहेच नेहमीप्रमाणे
नम्रतेश्वर रण...जीत, तुझा
नम्रतेश्वर रण...जीत,
तुझा सात्विक संताप, वैताग, विषण्णता, कंटाळा, उद्वेग, चिडचीड, तडफड, जळजळ आमच्या पर्यंत पोचली हो!
मी कुणावरही तोंडसुख घेत नाही.
मला माझी पातळी कळते व ती मी तुझ्याप्रमाणे ढळू देत नाही!
मी पेशाने प्राध्यापक आहे.
माझे काम जरी मौखिक असले, तरी मी आजतागायत कुणावरही तोंडसुख घेत नाही,चिखलफेक तर दूरची बात आहे!
मौखिक सुख म्हणशील तर ते मला रोज आध्यापनातून यथेच्छ व ओतप्रोत मिळते!
माझ्या एवढ्या गझला वाचूनही (वाचल्या असतील तर हो!) तू आम्हास ओळखले नाहीस, हेच खरे!
अन्यथा, असा बिनबुडाचा, पातळी सोडलेला, हतबल प्रतिसाद लिहिला नसतास!
मी कशाला बाबा कुणावर तोंडसुख घेवू?
मला काही उद्योग नाही का दुसरा? की, उद्योग फक्त रण...जीतलाच असतात का?
तुझे घमेंडखोर सल्ले त्या त्या गुरुतुल्य व्यक्तींना दे, माझ्या प्रतिसादात लिहून काय साधू पहात आहेस?
इतकेच सांगतो......
कळतात अंतरे मजला या नात्यागोत्यांमधली......
मी कुणास टाळत नाही किंवा कवटाळत नाही!
हे आमचे व्यक्तिमत्व!
वाद वगैरे मी कधीच घालत नाही.
मी माझ्या विधानांचे तर्कशुद्ध समर्थन करत असतो!
त्याला तू वाद म्हणत असशील तर तुझा मला राग येत नाही, तर कीव येत आहे!
शेपूट घालून पळून जाणे माझ्या रक्तात नाही!
हां, मी सत्य पटवून देण्यासाठी डोकेफोड जरूर करतो, पण तुझ्यासारखेही भेटतातच ना जगात......
म्हणून आज लिहिलेल्या गझलेतील शेर देतो व थांबतो...........
मनापासुनी डोकेफोड करत मी गेलो.....
कधी शहाणे......कधी भेटले.....दीडशहाणे!
.........प्रा.सतीश देवपूरकर
...................................................................................
तिनतेरा (विशेषण /
तिनतेरा (विशेषण / क्रियाविशेषण).......म्हणजे उधळलेले, नाश पावलेले इत्यादी.
तीन तेरा आहे ना?
१) 'तिनिसांज' किंवा 'तिनि'
१) 'तिनिसांज' किंवा 'तिनि' असा शब्द मराठी भाषेत आहे.
२) 'तिन्हिसांज' हे एकवचन आहे, तर 'तिन्हीसांज' हा अनेकवचनी शब्द आहे.
....... फक्त ही दोनच विधाने "संदर्भासह" सिद्ध करून दाखवावीत. केवळ मला असे वाटते किंवा मी कुठेतरी वाचले आहे अशी सैल विधाने करू नयेत.
विज्ञानमार्गी लोकांना योग्य त्या संदर्भांचे महत्त्व वेगळे सांगायची गरज नाहीच.
सतीशजीन्सारखे न कोणी हुशार
सतीशजीन्सारखे न कोणी हुशार गझला करण्यामध्ये
रोजच गझला करण्याइतकी बहार त्यान्च्या जगण्यामध्ये
( विदिपा जी क्षमस्व आपला एक ओरीजनल शेर तोडून्फोडून वापरला म्हणून)
सह्यगिरीचा एक कडा भट देवपूरकर हिमपर्वत्
सुरेशजी दारूचा पेला सतीशजी लिम्बू सरबत्
असो धन्यवाद !!!
सतीशजीन्सारखे न कोणी हुशार
सतीशजीन्सारखे न कोणी हुशार गझला करण्यामध्ये
रोजच गझला सुचण्याइतकी बहार त्यान्च्या जगण्यामध्ये
( विदिपा जी क्षमस्व आपला एक ओरीजनल शेर तोडून्फोडून वापरला म्हणून)
सह्यगिरीचा एक कडा भट देवपूरकर हिमपर्वत्
सुरेशजी दारूचा पेला सतीशजी लिम्बू सरबत्
असो धन्यवाद !!!
तस्कराचे हाती गवसली गीता,
तस्कराचे हाती गवसली गीता, राही न मारीता ब्राम्हणासी|
कसाबाच्या हाती झाले ब्रम्हज्ञान, तो ही शत्रू जान गौतमाचा| ... मि. तुकोबा.
जो जे वांच्छिल तो तें लाहो । गझलकार ॥ ............. मि. ज्ञानेश्वर.__ फक्त- ( गझलकार||) हा शब्द --- सुधाकर.
आकाशदा आणि रणजित दोघांच्याही
आकाशदा आणि रणजित दोघांच्याही मतांशी मी सहमत आहे..
ज्ञानेश पाटील, बेफिकीर, कणखर, कैलास गायकवाड, मिलिंद छत्रे , वैभव जोशी
वरील सर्व नावे मला अत्यंत आदरणीय स्थानी आहेत...
या सर्वांच्या गझला वाचून मी शिकत आहे...मला गझल लिहावीशी वाटली ती यांच्या गझला वाचूनच..
मलाही कुणी सांगितले नाही की हे लोक फार चांगले लिहितात रे..यांना नेहमी वाचत जा...
वरील सर्वांच्या काही रचना वाचल्या आणि जे काही नाते तयार झाले...ते आपोआप झाले...आज आकाशदा/रणजित चा प्रतिसाद वाचला आणि राहवले नाही..
बाकीच्या चर्चेबाबत मी काही बोलत नाही..कारण तेवढे माझे ज्ञान नाही..
देवपूरकर सर,
आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की या सर्वांचा( ज्यांचा या धाग्याशी संबंध आहे) दर्जा ओळखून त्यांच्यावर हीन आरोप करणे बंद करावे..
वैभव..
ज्ञात गझलकारांचा स्वतःच्या
ज्ञात गझलकारांचा स्वतःच्या मते असलेला तौलनिक दर्जा व त्यातील कमीजास्तपणा यावर कृपया चर्चा करण्यात येऊ नये अशी विनंती. कोण मोठा, कोण लहान याचा या गझलेवरील चर्चेशी काही संबंध नाही. त्यातून निव्वळ भिंती तयार होतील असे वाटते. माझे हे मत कोणा एकाला उद्देशून नसून केवळ एक जनरल विनंती आहे.
बेफिजी, आपले मत पटले.. तसदी
बेफिजी,
आपले मत पटले..
तसदी बद्दल क्षमस्व..
बेफीजीना भरघोस अनुमोधन
बेफीजीना भरघोस अनुमोधन
बेफिकीरजी, चर्चा गझलेवर नसून
बेफिकीरजी,
चर्चा गझलेवर नसून ती देवपूरकरांनी वैयक्तिक पातळीवर आणली आहे. म्हणून तसं लिहिलं.
असो.
ज्ञानेश ह्यांनी म्हटल्याप्रमाणे देवपूरकरांनी -
१) 'तिनिसांज' किंवा 'तिनि' असा शब्द मराठी भाषेत आहे.
२) 'तिन्हिसांज' हे एकवचन आहे, तर 'तिन्हीसांज' हा अनेकवचनी शब्द आहे.
....... फक्त ही दोनच विधाने "संदर्भासह" सिद्ध करून दाखवावीत. केवळ मला असे वाटते किंवा मी कुठेतरी वाचले आहे अशी सैल विधाने करू नयेत.
विज्ञानमार्गी लोकांना योग्य त्या संदर्भांचे महत्त्व वेगळे सांगायची गरज नाहीच.
ज्ञानेशजी म्हणताहेत ते बरोबर
ज्ञानेशजी म्हणताहेत ते बरोबर आहे
शिवाय तिन हा सन्स्कृत शब्द अहे हेही पटवून दिले तर देवसरान्चे जणू उपकार होतील माझ्यावर
असो
निर्णय देवसरान्चा ..........................
वावावा. ५०शी गाठली धाग्याने.
वावावा. ५०शी गाठली धाग्याने.
डॉक्टर कैलासराव! इतरांची री
डॉक्टर कैलासराव!
इतरांची री पुढे ओढण्या ऎवजी आपले म्हणणे मांडले असते तर बरे झाले असते!
टीप: मायबोलीवर बाकी हांजी बाबांची फारच वर्दळ असते हल्ली!
..........प्रा.सतीश देवपूरकर
जमल्यास विचार करा असे मी म्हणालो होतो.
दुर्दैवाने आपणास हे जमले नाही.
कृपया आमच्या श्रद्धा
कृपया आमच्या श्रद्धा स्थानांना धक्का लावू नका हि नम्र विनंती.>>>
ही आमची श्रद्धास्थानं आहेत. कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर चिखलफेक करणे आम्हाला मान्य नाही.>>
आयला गजलेत बी गंमत असते.
आयला गजलेत बी गंमत असते.
जास्त प्रतिसाद आहेत म्हणुन ही गमंत कळाली.
माझ्या घरचे मला एक स्थळ
माझ्या घरचे मला एक स्थळ सुचवताहेत. मुलगा प्रोफेसर आहे. हे राम आता मी काय करु
हाय रागिणी
हाय रागिणी !!..................तू मोहिनी पवार ची बहीण का ?
असो
माझ्या घरचेही मला लग्न कर म्हणतात. तुझ्या माहितीत एखादी मला अनुरूप मुलगी असेल तर सान्ग
अन् हो आधीच सान्गून ठेवतो; मी आमच्या पंढरपुरात एक फार्मासी कॉलेज आहे तिथे लेक्चरर म्हणून जॉईन करणार आहे येत्या दिवसात ........प्रा. म्हणून नव्हे बरका लेक्चरर म्हणून !!!
ओके......... कळव ........वाट पाहतोय!!!
तुझाच
-वैवकु
बादवे तुला कसा नवरा हवाय मी बघतो अमच्या इकडे तुझ्यासाठी स्थळ.........चालेल ना?
अनुरुप म्हणजे गझला करणारी हवी
अनुरुप म्हणजे गझला करणारी हवी की वाचणारी हवी?
नाही म्हणजे वैभव माझ्या ओळखीच्या २-३ डी फर्मसी, बी फार्मसी आहेत पाहिजे तर विचारुन बघते.
पण गझला वैगेरे जमायच्या नाहीत हो त्याना आधीच सांगून ठेवते.
प्रोफेसरांच्या गझलेचे वधूवर
प्रोफेसरांच्या गझलेचे वधूवर सूचक मंडळ झाले आहे.
त्या निमित्ताने कुणाचे सूत
त्या निमित्ताने कुणाचे सूत जमले, तर प्रोफेसरांची मेहनत सत्कारणी लागली म्हणता येईल.. गझलेचे तर 'तिन'तेराच आहेत म्हणा !!
Pages