Submitted by बागेश्री on 30 August, 2012 - 03:03
एकच सूर्यकिरण
छेदत जाणारा,
मनावर आदळून परतणारा,
डोळ्यांत चकाकणारा!
अन् दोन डोळे,
मनाचे बिंब...
एकच आर्तता,
कालवा- कालव करणारी,
ओठांत अडकणारी,
थेट जाणवणारी,
अन् दोन डोळे
बंडखोर...
एकच हाक,
उरात दडलेली,
कधी न मारलेली,
तरीही ऐकलेली,
अन् दोन डोळे
अनभिज्ञ..
एकच खोटेपणा,
कुठेही नसलेला,
असल्याचे भासलेला,
खेळच संपलेला,
अन् दोन डोळे
अवघे गारद..
एकच जगणं
असं निसटलेलं,
वेळेने कातरलेलं,
वेळेनेच सावरलेलं,
अन् दोन डोळे
रिक्त, रिक्त....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकच माध्यम आणि वेगवेगळं
एकच माध्यम आणि वेगवेगळं व्यक्त होणं
आशय छान आहे कवितेचा.
कविता नेहमीप्रंमाणे मस्तच आहे
कविता नेहमीप्रंमाणे मस्तच आहे हां अगदी!!
धन्स
( प्रतिसाद सम्पादित !!)
वैभव अवांतर कमी लिहीशील तर
वैभव
अवांतर कमी लिहीशील तर जास्त भावेल, लिखाणावर वाट्टेल ते बोल, पण असले अर्थहीन कमेंट्स टाळ.
ओके सम्पादित करतोय चिडू नकोस
ओके सम्पादित करतोय चिडू नकोस ना यार!!
नेहमीप्रमाणेच मस्त
नेहमीप्रमाणेच मस्त जमलिये.
असल्या काही कल्पना सुचायला "बागेश्री"च असावं लागतं.
आवडली
एकच विचार मनात येणारा, हे काय
एकच विचार
मनात येणारा,
हे काय आहे,
असं सतत विचारणारा,
अन दोन डोळे
भिर भिरणारे...
नेहमीप्रमाणेच मस्त
नेहमीप्रमाणेच मस्त जमलिये.
असल्या काही कल्पना सुचायला "बागेश्री"च असावं लागतं.
आवडली >>> प्रिला अनुमोदन. मस्त कविता !
वाह सहीच आणि आशयघन.......
वाह सहीच आणि आशयघन.......
जबरी लिहिलं आहेस......
जबरी लिहिलं आहेस......
मस्तच,आवडली.
मस्तच,आवडली.
बागेश्री मस्त लिहिलयसं.
बागेश्री मस्त लिहिलयसं. आवडलं.
वाचतांना दोन डोळे इमॅजिन करुन एकदम काहीतरी गुढ वाटलं.
छान
छान
गुड वन.
गुड वन.
अप्रतिम !
अप्रतिम !
मनःपूर्वक आभारी आहे दोस्तहो
मनःपूर्वक आभारी आहे दोस्तहो
Reeyaa, I am flattered!!!
बागेश्री... मस्तचं...
बागेश्री... मस्तचं... नेहमीप्रमाणे...
एकच माध्यम आणि वेगवेगळं
एकच माध्यम आणि वेगवेगळं व्यक्त होणं >>>> दक्षिणाशी सहमत.
आशय आणि मांडणी छानच.
दोन डोळ्यांनी व्यक्तवलेलं एक
दोन डोळ्यांनी व्यक्तवलेलं एक कथानक. सुंदर ! पुनरावर्तनामुळे अर्थांची वलये विस्तारतात..
पजो, उकाका, भारती आभारी आहे
पजो, उकाका, भारती
आभारी आहे
भावुक...आशयाचं..सहज...काव्य..
भावुक...आशयाचं..सहज...काव्य....!
हेय आत्मा, अफ्टर लाँग
हेय आत्मा, अफ्टर लाँग टाईम..
आभारी आहे मित्रा
उत्तम रचना. दक्षिणाशी पूर्णतः
उत्तम रचना. दक्षिणाशी पूर्णतः सहमत.
मांडणी अतिशय सोपी, सूटसूटीत
शुभेच्छा तुला.
आवडली ..छान
आवडली ..छान
छानच आहे! एकच हाक, उरात
छानच आहे!
एकच हाक,
उरात दडलेली,
कधी न मारलेली,
तरीही ऐकलेली,
अन् दोन डोळे
अनभिज्ञ..
हे सगळ्यात आवडलं..
कातरलेलं-सावरलेलं मध्ये कातरलेलं ऐवजी दुसरा शब्द अधिक योग्य वाटला असता, अस वैम.
वाचक, अनुसया, नचिकेत,
वाचक, अनुसया, नचिकेत, धन्स!
नचिकेत भरपूर दिवसांनी प्रतिसाद