माकडा हाती कोलीत
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
60
असिम त्रिवेदीवर झालेला हल्ला आपल्या सर्वांवरच झाला आहे. त्याच्या व्यंग्यचित्रांच्या प्रती नेट वर आहेतच, पण त्याला समर्थन दर्शविण्याकरता इतरही अनेक व्यंग्यचित्रंकार पुढे येताहेत.
१९७६ मध्ये अशीच मुस्कटदाबी सुरु होती. सध्या India after Gandhi चा आणिबाणीचा भाग वाचतो आहे. कार्टुनिस्ट शंकर पिल्लईचं तेंव्हाचं वाक्य आहे: 'Dictatorships cannot afford laughter. In all the years of Hitler, there was never a good comedy, not a good cartoon, not a parody, or a spoof'.
अजुन बरंच लिहायला हवं, लिहायचं आहे, ... लवकरच.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
लिहा लिहा. चार दिवस सासुचे
लिहा लिहा.
चार दिवस सासुचे झाले आता चार दिवस सुनेचे येणार की काय?
आम्हाला याचि देही याचि डोळा आणिबाणी दिसणार बहुतेक.
फेसबूक, किंवा तस्तम काही
फेसबूक, किंवा तस्तम काही संकेतस्थळांवर लोक जे काही लिहीत आहेत, त्यावरून शासनाने स्वतःहून असीम त्रिवेदीला अटक केली, असा समज झालेला दिसतो आहे.
असीम त्रिवेदीविरुद्ध किरजीत गायकवाड नामक इसमाने तक्रार केली आहे. पोलिसांकडे तक्रार तर नोंदवली आहेच, शिवाय उच्च न्यायालयातही जनहित याचिका नोंदवली आहे.
असीम त्रिवेदीच्या व्यंगचित्रांमुळे राष्ट्रध्वज, अशोकस्तंभ आणि राज्यघटना यांचा अपमान झाल्याची ही तक्रार आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. असीमला न्यायालयीन कोठडी मिळाली कारण त्याने जामीन घ्यायला नकार दिला. त्याला ताब्यात ठेवण्याची आवश्यकता नाही, असं गृहमंत्रालयाने आणि पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
राहता राहिला देशद्रोहाचा गुन्हा. इंग्लंडने २ वर्षांपूर्वीच कायदे बदलले, आपण आजही तेच कायदे वापरत आहोत. बिनायक सेन, अरुंधती रॉय यांच्या लिखाणावक्तव्यांमुळे देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर पूर्वी दाखल झाला आहे.
सचिन तेंडुलकरने तिरंग्याच्या
सचिन तेंडुलकरने तिरंग्याच्या रूपातला केक कापला, सानिया मिर्झा तिरंग्याशेजारी पाय वर टाकून बसली, मंदिरा बेदीच्या डिझायनर साडीवर भारताचा राष्ट्रध्वज पायांजवळ होता...इ.इ. कृतींमुळे भारताच्या राष्ट्रीय चिन्हांचा अपमान होतो असे म्हणणारे आणि असीम त्रिवेदीने मात्र तसलं काही केलं नाही असं म्हणणारे लोक एकच असतील का?
असिम त्रिवेदीने काहीही अपमान
असिम त्रिवेदीने काहीही अपमान केला नाही असे मला वाटते. व्यंगचित्रातून त्याला सध्या चाललेल्या भ्रष्टाचाराचे स्वरूप दाखवायचे होते. कालच परत ३५००० करोड रू चा जलसिंचन भ्रष्टाचार उघडकीला आला. त्याचे व्यंगचित्र योग्य होते.
न्युज मध्ये काही लोक त्याची तुलना ही अरूंधती रॉय करत आहेत. पण ती होऊ शकत नाही. तिथे काश्मीर मध्ये जाऊन उघड उघड नवीन राष्ट्र मागा असा अनाहून सल्ला दिला होता. तो वेगळा अन त्याच देशाशी एकनिष्ट राहून, देशामधील सध्याच्या परिस्थितीला व्यंगचित्रातून मांडणे वेगळे.
अमुक एका कृतीमुळे
अमुक एका कृतीमुळे तिरंग्याच्या, घटनेचा, अशोकस्तंभाचा अपमान झाला, असं मानणारे लोक आहेत. हा अपमान व्यंगचित्रामुळे असू शकेल, किंवा तिरंग्याचा केक कापण्यामुळे असू शकेल, किंवा तिरंग्याची बिकिनी घातल्यामुळे असू शकेल. यात अपमान महत्त्वाचा की हेतू?
करेक्ट चिनूक्स. अनेक देशात
करेक्ट चिनूक्स.
अनेक देशात बिकिनी म्हणून ध्वजासारखा कपडा परिधान केला जातो. त्यात व्यक्ती म्हणून मला अपमान न वाटता त्या लोकांच्या देशप्रेमाबद्दल आदर वाटतो. हे पर्स्पेक्टिव आहे, ते डबक्यातल्या व्यक्तींना कधीही कळायचे नाही.
परत एकदा तशा लोकांसाठी.
तिरंगा जाळणे / फाडणे गुन्हा पण परिधान करणे राष्ट्रप्रेमच.
केक कापणे हा अपमान नाही.
असो. मुळ मुद्दा असीमचा आहे. त्याच्यावर केस करणारा एक मुर्ख माणूस आहे. त्याची मुलाखत आज सकाळी पाहिली, त्याच्या देशप्रेमाचा कल्पना बेगडी आहेत.
सगळे इंटरनेट म्हणजे माकडाच्या
सगळे इंटरनेट म्हणजे माकडाच्या हाती कोलीतच झाले आहे.
--
भारतीय मानचिन्हांचा अपमान हा
भारतीय मानचिन्हांचा अपमान हा भारताचा अपमानच आहे, त्याचे समर्थन करनारेही देशद्रोहीच ठरतात.
हुसेनने भारतमातेला दुखावले म्हणून त्या धाग्यावर आम्ही त्याला बडवले होते.
आता इथे , त्रिवेदीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशी कोलांटी उलांडी मारुन आम्हाला माकड व्हायचे नाही.
-- माकड न झालेली शेळी
देशाची व घटनेची खरी अवहेलना-
देशाची व घटनेची खरी अवहेलना- व तीही प्रचंड प्रमाणात- भ्रष्टाचार व स्वार्थी राजकारणाने होत असताना त्यावर पोटतिडीकेने कोरडे ओढण्यासाठी कुणीतरी केलेल्या प्रयत्नात तिरंगा किंवा घटनेचा तिरकस उल्लेख आलाच तर त्याचा फार बाऊ करण्यात काय हंशील आहे ? खरा देशाभिमान झेंड्यासारख्या प्रतिकांबद्दल अतिजागरूक असण्यात आहे कीं प्रत्यक्ष देशाच्या सर्वांगीण प्रगति व प्रतिमेबद्दल ? माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात सद्यस्थितीत तरी असे विचार येतच असावेत .
भाऊकाका, अनुमोदन .. खरेतर,
भाऊकाका, अनुमोदन .. खरेतर, माझी स्थिती देखिल दोलनामय झाली होती.. पण तुमच्या post मुळे मन निश्चिंत झाले..धन्यवाद..:)
> फेसबूक, किंवा तस्तम काही
> फेसबूक, किंवा तस्तम काही संकेतस्थळांवर लोक जे काही लिहीत आहेत, त्यावरून शासनाने स्वतःहून असीम त्रिवेदीला अटक केली, असा समज झालेला दिसतो आहे.
चिनूक्सने खोलवर तपास केला तसा बहुतांश लोक कशाचाच करत नाहीत. ऐकीव आणि अर्धवट माहितीवर मतं बनवतात, आणि नुसतीच बनवत नाहीत तर त्यानुसार बर्या-वाईट (म्हणजे वाईटच जास्त) गोष्टी करतात. शासन, देश, जग बदलायचे असल्यास आपल्याबद्दलही विचार करायला हवा.
पण, चिन्मय, पुढे काय करायचे हे तर शासन ठरवु शकतं ना? सेडीशनचा आरोप रद्द करावा का नाही ते वगैरे?
वर ज्या पिल्लईंबद्दल लिहिले आहे त्यांनी काढलेलेच (आणि पुर्वप्रकाशीत) कार्टुन पाठ्यपुस्त्कातुन वगळण्यात आले.
आपण छोट्या-छोट्या गोष्टींवरुन अपमान होईल इतके कच्च्या मनाचे आहोत का?
राजीवला म्हणे बायकोमुळे राजकारणात पडायचे नव्हते. आता त्या बायकोनेच राहुलला तयार केले आहे. त्यांचा अर्थातच काही दोष नाही - त्या तर एक-एकट्या व्यक्तीच आहेत. पण व्यक्तीपुजा ही भारतीयांमधे चांगलीच रुजली आहे ती कमी होऊ शकली तर बरेच साध्य होईल. त्या करता उपाय जालीम आहेत ...
राजीव, त्याची ( की त्यांची)
राजीव, त्याची ( की त्यांची) बायको , राहूल ..... हे या प्रकरणात कसे संबंधित आहेत?
खोलवर तपास करण्याची गरज नसते.
खोलवर तपास करण्याची गरज नसते. थोडं नीट काळजीपूर्वक बघितलं, वाचलं की गोष्टी कळतात.
>>सचिन तेंडुलकरने
>>सचिन तेंडुलकरने तिरंग्याच्या रूपातला केक कापला, सानिया मिर्झा तिरंग्याशेजारी पाय वर टाकून बसली, मंदिरा बेदीच्या डिझायनर साडीवर भारताचा राष्ट्रध्वज पायांजवळ होता...इ.इ. कृतींमुळे भारताच्या राष्ट्रीय चिन्हांचा अपमान होतो असे म्हणणारे आणि असीम त्रिवेदीने मात्र तसलं काही केलं नाही असं म्हणणारे लोक एकच असतील का?<<
सचिन, सानिया, मंदिरा, संजय, सलमान, हुसेन आणि अशा बड्या बड्या , सगळे काही स्वतःच्या हिताकरता करणार्या लोकांनी केलेल्या कसल्याही कृतिचे समर्थन करणारे आणि कोणत्याही अर्थाने बलदंड नसलेल्या पण देशातिल आताच्या परिस्थितीने अस्वस्थ होऊन नि:स्वार्थ काम करनार्या असिम सारख्या व्यंगचित्रकारावर, एखाद्या दहशतवाद्यावर तुटून पडावे तसे आक्रमक होणारे लोक
एकच असतील का?
>>आपण छोट्या-छोट्या गोष्टींवरुन अपमान होईल इतके कच्च्या मनाचे आहोत का? <<
'छोटी का मोठी ' तसेच 'अपमान कि गौरव' हे सापेक्ष आहे. मन कच्चे होणार कि मजबूत हे त्यावर अवलंबून. याचे निश्चित असे निकष नाहीत असे दिसून येते. 'सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ' हे मात्र आजही सत्य आहे हेच असिम प्रकरणात दिसून आले.
>>फेसबूक, किंवा तस्तम काही
>>फेसबूक, किंवा तस्तम काही संकेतस्थळांवर लोक जे काही लिहीत आहेत, त्यावरून शासनाने स्वतःहून असीम त्रिवेदीला अटक केली, असा समज झालेला दिसतो आहे.
असीम त्रिवेदीविरुद्ध किरजीत गायकवाड नामक इसमाने तक्रार केली आहे. पोलिसांकडे तक्रार तर नोंदवली आहेच, शिवाय उच्च न्यायालयातही जनहित याचिका नोंदवली आहे. <<
अशा कितितरी तक्रारि होत असतात. म्हणून कांही लगेच इतक्या टोकाला जाऊन अटक केली जाते काय? व्यंगचित्रांमधून व्यक्त होणारी भावना काय राष्ट्रद्रोहाची आहे? शासन टीकेबद्दल कमालीचे असहिष्णू झाल्याचे यावरून दिसून येत आहे. आणिबाणीच्या काळाची आठवण झाली. दुर्गाबाईंनी साहित्यसंम्मेलनात आणिबाणीविरुद्ध आवाज उठवला कि टाकले त्यांना तुरुम्गात, आणि तेहि स्वतंत्र भारतात.
मन उगाचच साशंक होतेय, सातीने
मन उगाचच साशंक होतेय, सातीने लिहिल्याप्रमाणे अगदी तशीच परिस्थिती निर्माण झालीय खरी.
अनुशासन पर्व काय न २० कलमी कार्यक्रम काय न बाते कम काम ज्यादा काय न हम होंगे कामयाब काय ... आम्हाला शाळेत हि कलमे पाठ करावी लागली होती !
मागे तामीळनाडूतील एका
मागे तामीळनाडूतील एका व्यगचिंत्रकाराने तेथील सरकारावर काढलेल्या व्यंगचित्रामुळे त्याला जेलयात्रा घडली होती.
त्याच्या व्यंगचित्रात प्रेक्षकातिल एकजण शेजार्याला सांगत असतो, ' व्यासपिठावर तो भामट्यासारखा दिसतोय ना, तो आहे आमदार. आणि दरवडेखोरासारखा दिसतोय तो आहे मंत्री! '
व्यंचिचे नाव आठवत नाही. पूर्ण टक्कल पडलेला, गोल चेहर्याचा , लहान मुलासारखा निष्पाप चेहर्याचा गृहस्थ होता. देशभरातून टीका झाल्यावर सोडवे लागले त्याला. त्याचे नाव कोणाला आठवते का?
पण असिमचे प्रकरण त्याहून भयावह आहे. कोणीही पोलिस अधिकारि कोणावरहि इतके गंभीर गुन्हे कोणाच्या तरी तक्रारीवरून दाखल करून सरळ कोठडीत टाकू शकतो मात्र भयानक दंगल समोर चालली असतांना मात्र त्यांना वरचे आदेश का लागतात?
माझ्या मते परिस्थिती फारच
माझ्या मते परिस्थिती फारच वेगळी आहे १९७५ च्या आणीबाणी पेक्षा. सध्या कांग्रेस वर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत पण जिथे जिथे भाजपा वा कॉंग्रेस सोडून अजून कोणी आहे ते पण तसलेच आहेत. म्हणजे कोणीही सत्तेवर आला तरी कशातच फरक पडणार नाहीये. गम्मत म्हणजे सगळ्या विरोधी पक्षांनी एकदम मिठाची गुळणी धरली आहे. एकाचाही मोठ्याने आवाज आला नाहीये. कारण सगळ्यांचेच हात दगडाखाली आहेत. सगळे कायदे खरे म्हणजे बदलायला हवेत पण सत्तेत असणाऱ्यांना ते सोयीस्कर असल्याने कोणीच काही करत नाहीये. जेपिंनी आंदोलन केले तेंव्हा ते सत्तेत नव्हते आणि त्यामुळे सगळे बऱ्यापैकी स्वच्छ होते पण नंतर सत्तेवर आलेल्यांचे पाय पण मातीचेच निघाले. आता तर कहरच आहे. आणि अण्णा आणि केजारीवालांना पाठींबा आहे पण ही मंडळी फारच आक्रस्ताळी आणि हेकेखोर वाटतात. त्यामुळे सर्व दिशानच झालेले दिसते.
कलाकाराचे नाव असिम
कलाकाराचे नाव असिम त्रिवेदीऐवजी याकूब किंवा अफझल असते,तर इथे जमलेल्या मान्यवरानी आपली हीच मते मांडली असती का?
हो शेळी, माझे मत हेच राहिले
हो शेळी, माझे मत हेच राहिले असते ! ( पण मी मान्यवर नाही !!!! )
चैत्यन्य, त्या वेळी काँग्रेसला पर्याय असू शकतो, हेच आम्हा सर्वांना अप्रूपाचे होते. नंतर भयंकर निराशा झाल्याने,
आता सगळ्यालाच पर्याय असावा, असे वाटू लागले आहे.
>>कलाकाराचे नाव असिम
>>कलाकाराचे नाव असिम त्रिवेदीऐवजी याकूब किंवा अफझल असते,तर इथे जमलेल्या मान्यवरानी आपली हीच मते मांडली असती का?<<
मान्यवरांचे माहीत नाही, पण असिम त्रिवेदीऐवजी याकूब , अफझल , मायकेल, झैलसिंग किंवा शेळीतै यांनी हीच व्यंगचित्रे काढली असती तरी मी त्यांना पाठिबा दिला असता.
मी असीम त्रिवेदी ह्यांनी
मी असीम त्रिवेदी ह्यांनी काढलेले एकही व्यंगचित्र पाहिले नाही की इथे ही बातमी पोचली नाही.
कोण्या एका व्यंगचित्राकाराला
कोण्या एका व्यंगचित्राकाराला अटक झाली ही आणीबाणी येण्याची चाहूल आहे हे अत्यंत हास्यास्पद लॉजिक आहे.
अर्थात ती येण्याच्या कल्पनेनेच काहींना आनंदाच्या उकळ्या फुटतील हा भाग वेगळा, कारण गेल्या आणीबाणीत कोणी काय केले आणि कुणाला कसा पाठिंबा दिला हा फार जुना इतिहास नाही!!!
असिम त्रिवेदी प्रकरणात कायद्याने त्याची भूमिका बजावली आणि असिमने त्याचा पूरेपूर वापर आपल्या प्रसिद्धि आणि इमेजसाठी करुन घेतला.
'दाढी वाढलेला, हरवलेल्या डोळ्यांचा, मनस्वी कलावंत सर्वशक्तिमान सरकारपुढे पाय रोवून उभा राहतो' आयडॉल्स आणि रिअल लाईफ हिरोच्या शोधातील मिडीआ आणि पब्लीक यांना यापेक्षा उत्तम 'स्टोरी' कुठे मिळणार?
कलाकाराचे नाव असिम त्रिवेदीऐवजी याकूब किंवा अफझल असते,तर इथे जमलेल्या मान्यवरानी आपली हीच मते मांडली असती का?>>> त्यापेक्षाही योग्य प्रश्न हा आहे की, आत्ता भाजपप्रणीत सर्कार असते तर हीच मते मांडली असती का?
कलाकाराचे नाव असिम
कलाकाराचे नाव असिम त्रिवेदीऐवजी याकूब किंवा अफझल असते,तर इथे जमलेल्या मान्यवरानी आपली हीच मते मांडली असती का?>>> त्यापेक्षाही योग्य प्रश्न हा आहे की, आत्ता भाजपप्रणीत सर्कार असते तर हीच मते मांडली असती का?
दोन्ही प्रश्न एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
मटाला बातमी आहे, त्रिवेदीने सरकारविरुद्ध जंग छेडली आहे. ते कुठले ते कलम १२४ ( सेडिशन - राष्ट्राविरुद्ध , सरकार विरुद्ध द्रोह करण्याचे) ते कलम रद्द करावे म्हणून.
किती हा बिनडोकपणा..... त्रिवेदीचा मानचिन्हे भ्रष्ट्र रुपात काढण्यामागे चांगला उद्देश असेल तर त्याने तो कोर्टात सिद्ध करावा .. तसा त्याला चान्स आहेच. पण कायदाच रद्द करा म्हणजे हास्यास्पद आहे. मग उद्या एखाद्याने खरोखरच दुष्ट हेतूने वाइट चित्रे काढली तर , कायदाच रद्द केला असेल , तर त्याला शिक्षा कशाच्या आधारे करणार??
हे असले बालिश लोक आण्णांच्या आंदोलनात असतील तर आण्णांचे आंदोलन फसले असेच म्हणावे लागेल.
http://www.businessinsider.com/the-indian-government-is-targeting-its-ca...
http://frontierindia.org/forum/f3/aseem-trivedi-cartoon-corruption-1047/
>>कायदाच रद्द केला असेल , तर
>>कायदाच रद्द केला असेल , तर त्याला शिक्षा कशाच्या आधारे करणार?? <<
दहशतवादाविरुद्ध उपयुक्त 'पोटा' कायदा पोलिसांच्या हाती कठिण परिस्थितीत वापरायला उपयुक्त एक शस्त्र होते. असे इनामदार म्हणतात.
ते युपिए ने आल्या आल्या इलेक्टोरल गेन्स साठी उडविले तेव्हां कुठे गेले होते हे तत्व?
पोटा रद्द झाला तरी त्यासाठी
पोटा रद्द झाला तरी त्यासाठी इतर कायदे आहेतच ना?
मानचिन्ह याबबतीत मात्र एकच कायदा असेल आणि तोच रद्द करा असे एखादा म्हणत असेल तर ते योग्य आहे का?
मानचिन्ह याबबतीत मात्र एकच
मानचिन्ह याबबतीत मात्र एकच कायदा असेल आणि तोच रद्द करा असे एखादा म्हणत असेल तर ते योग्य आहे का?
<<
<<
अगदि बरोबर
पण शेळीची, शेळीताई का झाली.! आणि आधीची शेळी कुठे गेली.
शेळी रद्द झाली.. ( नोटीस
शेळी रद्द झाली.. ( नोटीस देऊन मग रद्द करायला शेळी म्हणजे पैलवान नव्हे. )
मला एक सांगाल का ज्ञानी जनहो!
मला एक सांगाल का ज्ञानी जनहो! मी अमीमची काही व्यंगचित्रे पाहीलीत. जशी पुर्वी बघायचो आणि हसू यायच तशीच ही चित्रे वाटली. नक्की काय परिक्षण केले गेले ह्या व्यंगचित्रांचे?
http://mha.nic.in/pdfs/flagco
http://mha.nic.in/pdfs/flagcodeofindia.pdf
राष्ट्रध्वजाबद्दल कोड ऑफ कंडक्ट इथे दिला आहे. **THE PREVENTION OF INSULTS TO NATIONAL HONOUR ACT, 1971 या सेक्शनमध्ये अगदी व्यवस्थित माहिती दिली आहे.
काही गोष्टी लिहताना या राष्ट्रध्वजासाठी (केवळ त्याचा अपमान होउ नये म्हणुन) कित्येक लोकांनी बलिदान दिले आहे याचा विसर न पडावा हि नम्र विनंती.
बाकि चालु द्यात.
Pages