"ए आई, मला पण बाबाला मदत करायची आहे; बाप्पाची आरास करायला!"
दोस्तांनो, गणपतीची आरास करायला आवडते ना? मग इथे तर तुम्हाला प्रत्यक्ष बाप्पालाच सजवायचंय!
चला तर मग...
१) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या १२ वर्षे वयापर्यंतच्या मुलामुलींकरता आहे.
२) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आय डी नेच भाग घ्यायचा आहे.
३) गणपती बाप्पाच्या दिलेल्या चित्राची प्रत (प्रिंटआउट) काढायची आहे.
४) सजावटीसाठी रंग, टिकल्या, चमकी, रंगीत वाळू, रंगीत कागद वा इतर सजावटीचे काहीही साहीत्य वापरू शकता.
५) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
उपक्रमात भाग घेण्यासाठी काय कराल?
प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून, १९ सप्टेंबर २०१२ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, २९ सप्टेंबर २०१२ (अमेरिकेची पश्चिम किनार्याची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
१) आपल्या पाल्याने रंगवलेले/सजवलेले चित्र स्कॅन करा किंवा त्याचे छायाचित्र/फोटो काढा.
२) प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा गृप सदस्य-नोंदणीकरता १९ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सभासद झाला आहात.
३) याच गृपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१२ गृप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)
४) नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -
सुंदर माझा बाप्पा! - मायबोली आयडी - पाल्याचे नाव
५) विषय या चौकटीमध्ये उपलब्ध पर्यायसूची (ड्रॉपडाऊन मेन्यु) मधून मायबोली, उपक्रम हा पर्याय निवडा.
६) शब्दखुणा या चौकटीमध्ये सुंदर माझा बाप्पा, मायबोली गणेशोत्सव २०१२ हे शब्द लिहा.
७) आता या नवीन धाग्यावर आपल्या मायबोली आयडीनेच मजकूरात प्रकाशचित्र टाका. यासाठी आपल्या 'माझे सदस्यत्व' मध्ये जाऊन 'खाजगी जागेत' सजवलेल्या बाप्पाची इमेज फाईल अपलोड करा. त्या फाईलचे आकारमान १५० kb इतकेच असू द्या.
८) मजकूराच्या चौकटीखाली 'मजकूरात image किंवा link द्या.' यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नवीन खिडकी (विंडो) उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी upload हा पर्याय निवडा. मग 'browse' या पर्यायावर टिचकी मारून तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटीत तशी पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकूरात समाविष्ट करा.
प्रकाशचित्र टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.
९) त्याच्या खाली पाल्याचे नाव, वय आणि तुमचे योगदान याची थोडक्यात माहिती लिहा.
१०) नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर गृप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटिवर टिचकी मारा म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
११) Save ही कळ दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, तेवढी कळ काढाच. आता तुमची प्रवेशिका प्रकाशित होऊन सगळ्यांना दिसू लागेल.
१२) जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.
मग लागा तयारीला, बच्चेकंपनीने सजवलेल्या त्यांच्या बाप्पाचे गोंडस रूप पाहायला सगळेजण उत्सुक आहेत.
चला बच्चेकंपनी मग व्हा
चला बच्चेकंपनी मग व्हा तयार!
या उपक्रमाविषयी तुमच्या काही शंका असतील तर त्या येथे विचारू शकता.
हा उपक्रम आवडला. मी अगदी आजच
हा उपक्रम आवडला. मी अगदी आजच सूचना धाग्यावर हे लिहिणार होते
आवडेश !
आवडेश !
एकदम मस्त उपक्रम......लहान
एकदम मस्त उपक्रम......लहान पणाची आठवण ताजी झाली .......बच्चे कम्पनी लागली ना कामाला ...... आमचे बच्चे आता बच्चे नाहीत , नाही तर नक्कि कामाला लावले असते........शुभेच्छा.........
धम्माल कल्पना पहायला मिळतील.
धम्माल कल्पना पहायला मिळतील. छान उपक्रम आहे.
मस्त आयडीयेची कल्पना!
मस्त आयडीयेची कल्पना!
मंडळी, गणेशोत्सव आठ दिवसांवर
मंडळी,
गणेशोत्सव आठ दिवसांवर आलाय. तयारी चालू केलीत ना?
मस्त उपक्रम आहे. लेकीला
मस्त उपक्रम आहे. लेकीला प्रिंट काढुन देईन बाप्पाची
बहिणीला सांगते सदस्यत्व
बहिणीला सांगते सदस्यत्व घ्यायला... तिच्या मुलीला आवडेल भाग घ्यायला..
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मुदत संपल्यामुळे प्रवेशिका
मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत. आपल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!