Submitted by अज्ञात on 2 September, 2012 - 06:34
आर्त आहे अंतरीचे जाहलो व्याकूळ मी
भावना लंघून गेल्या प्रीतओल्या संगमी
सावल्या बेधुंद झाल्या कुंद छाया घनतमी
समजले उमजे परी ना प्राण माझे संभ्रमी
गोत हळवे व्यापलेले व्याध सावज उभय मी
गुंतले पाशात दोघे पोत अवघे रेशमी
दाखवे उसवे न कोणी गाठ त्यांची संयमी
वाटकाठांची फुले ही बहर त्यांचा भृंग मी
..........................अज्ञात
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आत्ममग्न एकांतातून फुललेली
आत्ममग्न एकांतातून फुललेली कविता .
आवडली.. दुसरं कडवं खूप
आवडली..
दुसरं कडवं खूप आवडलं..
आत्ममग्न एकांतातून फुललेली
आत्ममग्न एकांतातून फुललेली कविता .-------> छान.
सर्वान्चे आभार
सर्वान्चे आभार
सुंदर!
सुंदर!
मनःपूर्वक आभार अमेलिया.
मनःपूर्वक आभार अमेलिया.
सुरेख्.........आवडली.......
सुरेख्.........आवडली.......
आभार योगुली
आभार योगुली