Submitted by Mandar Katre on 8 September, 2012 - 22:48
मागे एकदा नेट वर डेटिंग बद्दल मार्गदर्शन करणारी साईट पहात होतो .
त्यात मुलींना उपदेश केला होता कि ,
जो मुलगा हॉटेलात गेल्यावर वेटर ला "शुक-शुक"करून बोलावेल ,त्या मुलाला टाळा..........कारण त्याला इतरांच्या मान-सन्मानाची काळजी नसते...............इ.इ.इ.
तुम्हाला काय वाटते? शुक-शुक करून,आवाज काढून वेटर ला बोलावणे हे bad manners आहे का?
कृपया आपली मते मांडा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
हे संस्कृती वर अवलंबून आहे
हे संस्कृती वर अवलंबून आहे ,तसेच आपल्याकडे सुध्दा कुणाला ' ताई, आई, भाऊ, काका' असे अपरिचितांस संबोधणे सुसंस्कृत समजले जातेच ना?
मोठ्या हॉटेलमध्ये (5*,4*)
मोठ्या हॉटेलमध्ये (5*,4*) माहीती नाही. पण आमच्या गावातील (महाड) हॉटेलमध्ये वेटरला बोलवायचे असेलतर त्याला अन्ना, तंबी, छोटु असे काहीएक नावाने आम्ही बोलावतो.
आणि वरिल संवाद मला वाटते "मुन्नाभाई एमबीबीएस" या सिनेमात होता. आणि त्यात तेवढे तथ्य नाही. माझ्या पहाण्यात स्वत:ला उच्चभु समजणारे? असे काही लोक, हॉटेलात गेल्यावर वेटर ला "शुक-शुक"करून बोलावतात.
मानण्यावर आहे, बहुतांशी.
मानण्यावर आहे, बहुतांशी. 'वेटर' ना आपल्याला कुठले तरी टेबल हाक मारीत आहे इतकीच बाब पुरेसी असते. फक्त 'ए तुझ्या मा....' अशा पद्धतीचा पुकार नाही ना, एवढीच त्यांची अपेक्षा असते [असा एक सर्व्हे कोल्हापुरातील सायबर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी घेतला होता, त्यावरून निष्कर्षाप्रत आलेल्या बाबीवरून हे स्पष्ट झाले होते....].
'स्टार हॉटेल्स' आणि 'धाबा' येथील गिर्हाईक-संस्कृतीमध्ये फरक असणार यात अमान्य करण्यासारखे काही नाही. 'स्टार' इथे जाणारे कस्टमर 'एक्स्क्यूज मी' असाच पुकारा देईल तर धाब्यावरील गिर्हाईक 'अबे ओ, सुनना कम आता है क्या बे तुझे ?" असेच ऑर्डरच्यावेळी खेकसणार.
बाकी 'शुकशुक...' मुळे एखाद्याला टाळण्यासारखे त्यात काही असेल असे वाटत नाही.
महान धागा
महान धागा
त्या वेटरच्या मानसन्मानाबद्दल
त्या वेटरच्या मानसन्मानाबद्दल लोकांना इतकी काळजी आहे हे वाचून बरे वाटले.
तो प्रश्न सुटला की एकदा मायबोलीवरील चर्चेत भाग घेणार्या लोकांनी एकमेकांशी कसे वागावे हाहि विषय चर्चेला घ्या.
महान धागा उच्चभ्रू टँजेंट
महान धागा
उच्चभ्रू टँजेंट
उगाच काहीही धागा काढुन
उगाच काहीही धागा काढुन वेळ काढु पणा करु नयी...इतर खुप छचगले विषय आहेत चर्चा करण्यास ....
त्या उपदेशामागचा अर्थ 'हलके
त्या उपदेशामागचा अर्थ 'हलके समजले जाणारे काम करणार्या अनोळखी व्यक्तीशी तो मुलगा कसा वागतो' यावरून त्याची पारख करावी असा आहे.
बाकी वेटरला कसे बोलवले जावे हे ते रेस्टॉरंटमधील वातावरणावर अवलंबून आहे.
उच्च दर्जाचे रेस्टॉरंट असेल तर तुमचे टेबलची ड्युटी एका विशिष्ट वेटरची असेल. शिष्टाचारानुसार त्याच्याशी आय काँटॅक्ट साधून डोळ्यांनी किंवा दूर असल्यास बोटाच्या इशार्याने त्याला बोलवावे. त्याचे लक्ष नसल्यास वेटर अशी हलकेच हाक मारावी.
आम्ही तर बॉ लहान असो वा मोठे
आम्ही तर बॉ लहान असो वा मोठे हॉटेल वेटरला बॉस असेच म्हणतो.
कर्नाटकात टपरीवर असेल तर ' तम्मा'
महाराष्ट्रात असेल तर् मित्रा, काका. भाउ असे वयानुसार.
मॅनरचा कधी विचारच केला नाही याबाबत.
आमचा एक मित्र कुठल्याही
आमचा एक मित्र कुठल्याही हॉटेलात गेला तरी वेटरला "अहो माऊली" म्हणून हाक मारतो!
खाऊली म्हनायचे त्यापेक्षा.
खाऊली म्हनायचे त्यापेक्षा.
पु. लं. नी एकदा पॅरीसच्या एका
पु. लं. नी एकदा पॅरीसच्या एका रेस्ताराँमधे 'शांताबाई' अशी हाक मारुन वेट्रेसला टेबलाशी बोलवले होते हे (त्यांनीच लिहीलेलं) वाचलेलं आठवलं.
<<त्या उपदेशामागचा अर्थ 'हलके
<<त्या उपदेशामागचा अर्थ 'हलके समजले जाणारे काम करणार्या अनोळखी व्यक्तीशी तो मुलगा कसा वागतो' यावरून त्याची पारख करावी असा आहे.>> धन्यवाद भरत मयेकर जी ..............!