पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कणकेचा शिरा पण आठवला. छान लागायचा तो. तसा लंगरमधे मिळतो तसा तूपात थबथबलेला नसायचा, कोरडाच असायचा.

१. पातळ पोह्यांमध्ये कच्चा कांदा + टोमॅटो + काकडी + मीठ + साखर + ओले खोबरे घालून थोडा वेळ (५ मिनिटे) ठेवायचे. ते सर्व नीट मिसळून त्यावर तेल + मोहरी + हळद + मिरच्यांची फोडणी द्यायची व व्यवस्थित कालवायचे. याला आम्ही ५ मिनिटांतले पोहे म्हणतो. वरून कोथिंबीर, लिंबाचा रस हवे असल्यास घालता येतात. भाजलेले / तळलेले दाणेही यात घालू शकता.

२. कच्चे तेल-तिखट-काळा मसाला - कच्चा कांदा - दाणे घालून पातळ पोहे / दहीपोहे.

३. विविध प्रकारचे पराठे/ धिरडी - दही

४. फोडणीच्या लाह्या / लाह्या ताकात - दह्यात, मीठ-मिरची घालून काला.

५. भजी / पकौडे / बोंडा

६. बटाटे उकडून ठेवलेले असतील तर आलू टिक्की सारखे पदार्थ.

७. भेळभत्ता व चिंचेचा सॉस घरात असेल तर झटपट भेळ किंवा कोरडी भेळ.

कणकेची उकडपेंडी पण अशीच आयत्यावेळी करता येण्यासारखी
बेसनाचे पोळे
मोकळ भाजणी
वेगवेगळ्या खिरी (गोडात ऑप्शन)

मला ओल्या राजम्याची रेसिपी सांगाल का? आज भाजीवाल्याने छान आहेत करत गळ्यात मारल्या आहेत ओल्या राजम्याच्या शेंगा.
सुक्या राजम्याची करतो तशीच उसळ करायची का?

पातळ पोह्यांमध्ये कच्चा कांदा + टोमॅटो + काकडी + मीठ + साखर + ओले खोबरे घालून थोडा वेळ (५ मिनिटे) ठेवायचे. ते सर्व नीट मिसळून त्यावर तेल + मोहरी + हळद + मिरच्यांची फोडणी द्यायची व व्यवस्थित कालवायचे. याला आम्ही ५ मिनिटांतले पोहे म्हणतो. वरून कोथिंबीर, लिंबाचा रस हवे असल्यास घालता येतात. भाजलेले / तळलेले दाणेही यात घालू शकता.
>>>
अकु, हे दडपे पोह्यांचेच व्हेरिएशन वाटतेय. यम्मी प्रकार हा पण! Happy पातळ पोहे आधी जरा कढईत भाजून घ्यायचे पण. नंतर फोडणी टाकून सगळे आयटम मिक्स करताना मस्त चुरडले जातात.

आमच्याकडेही थालीपीट, तिखटअमीठाच्या पुर्‍या, कणकेचा शिरा, धिरडी, टोमॅटो आम्लेट, कच्चा चिवडा, ताजा काळामसाला, किसलेलं खोबरं घालून केलेला चिवडा, टोमॅटो, कांदा घालून केलेले दडपे पोहे... इ

दिनेशदा आणि जागु(प्राजु) ताई नमस्कार ,
तुमचे लेख वाचते छान असतात आता तुम्हि नविन धागा चालु करुन फक्त भा़ज्या/मासे/चिकन (Veg & Non Veg Week Only)

बद्द्ल चालु करु शाकता का,
उदा. वाल उसळ, ओलि भाजि, वेगवेळ्या रेसिपि पण १ आठवडा १च भाजि पण प्रकार भिन्न ,
तुमच्या उत्तराच्या प्रतिक्षेत.
कारण माझ्या घरि पिसि नाहि आनि माला जेवदे ऑफिस मध्ये वाचायला मिळते लच आणि चाहाच्या वेळात तिकेच म्हणुन विचार्ले आहे.

भाग्यश्री,

आपण असे करु शकतो, एकेक भाजी घेऊन त्याची किती विविधप्रकारे भाजी करु शकतो याचे संकलन. असा धागा अवलचा आहेच. तिथे आणखी भर घालू किंवा वेगळा धागा काढू. माश्यासाठी मात्र जागूची वाट बघावी लागेल.

उत्तर दिल्या बद्द्ल धन्यावाद दिनेशदा,आता आपन जागु ताईचि वाट पाहि त्याचे उत्तर काय येते ते

निंबुडा, हो, दडप्या पोह्यांचंच पण जरा झटपट रूप आहे हे! हो, आणि ते पातळ पोहे किंचित तुपात खरपूस भाजून घेताना इतका सुंदर दरवळ येतो... मी असे भाजलेले खमंग पोहे अनेकदा नुसतेच मटकावते!

आमच्याकडे एकदा ऑड वेळेस टीनएजर पाहुणे आले होते. त्यांना ऑफर केलेले सगळे पदार्थ ( उप्पीट, थालीपीठ, पोहे, दडपे पोहे, MTR शेवयांचा उपमा इ इ ) 'हाउ बोअरिंग' वाटत होते. गोड तर काहीही नको होते. 'समथिंग डिफरंट, समथिंग यम्मी' हवं होतं. मग मावशींनी साधं पोळ्यांचं गव्हाचं पीठ दोशासारखं पातळ भिजवलं, त्यात मीठ, साखर, जीरा पाउडर एवढंच फक्त घातलं. याचे छोटे छोटे क्रिस्प दोसे वर साजुक तुप सोडुन आणि पालकची भाजी ( भरपुर ओले काजु घातलेली) सर्व केले. सगळ्यांनी बघुन नाकं मुरडली पण खायला सुरुवात केल्यावर मावशींचा घाम काढला. आता आम्ही पोळ्यांचा कंटाळा आला तरी चेंज म्हणुन करतो. छान लागतं, पण फक्त गरम.

मनिमाऊ, त्यालाच आमच्याकडे आयते म्हणतात. पण जरा जरी निवले तरी खाववत नाहीत.
जिरे घालून करुन बघतो आता.

दिनेशदा, आयते नाव सुटेबल. Happy पोळ्यांपेक्षा करायला सोपं, म्हणजे आयतं मिळाल्यासारखंच आहे. अख्खे जिरे पण छान लागतात. आणि हो खरं आहे ते गरमच खावे लागतात.

साधं पोळ्यांचं गव्हाचं पीठ दोशासारखं पातळ भिजवलं, त्यात मीठ, साखर, जीरा पाउडर एवढंच फक्त घातलं. याचे छोटे छोटे क्रिस्प दोसे वर साजुक तुप सोडुन >>> माझी आई साखर न घालता करते.....आमरसा बरोबर तर खूपच मस्त लागते.

कोणी सावर डो ब्रेड घरी करणारे आहेत का इथे ? स्टार्टर कुठुन घेतलं ? स्टार्टर घरच्या घरी बनवलंय का कोणी ?
वेबवरच्या अन पुस्तकातल्या रेसिप्या बर्‍याच पाहिल्या आहेत. पण प्रत्यक्ष करण्याचा अनुभव कोणाला आहे का ?

अचानक पाहुणे आल्यावर करायच्या पदार्थांमध्ये आमच्याकडे मेतकूट पोहे पण असायचे. भर[पूर टोमॅटो चिरून त्यात मीठ साखर घालायची. टोमॅटोला पाणी सुटलं, की त्यातच पातळ पोहे भिजवायचे. पोहे नीट मिसळले, की यात मेतकूट घालायचं. वरून भरपूर कढिपत्ता, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर असलेली फोडणी घालायची. पाच मिनिटात पोहे तयार!

चिकन शीग कबाब रेडिमेड मिळतात ते उरले होते. ते बारिक चिरलेल्या कांद्यावर परतले, इतकंस तिखट मीठ, आले लसूण पेस्ट. कोथिंबीर, लिंबू किचन किंग मसाला घातले. त्या आधी कबाब सॉसेज सारखे बारीक चकत्या करून घेतले होते. हे सर्व लांबोड्या हॉट डॉग बन मध्ये घातले. स्वस्तात मस्त सब्ब सँडविच. ब्रेड तव्यावर गरम करून न्यूट्रालाइट, सँडवीच स्प्रेड लावले. मग फिलिन्ग घातले. सर्व फ्रीजर मध्ये असेल तर १० मिनिटात होईल.

दिनेशदा, टोमॅटो ऑम्लेट (बेसनाच्या पिठाचे) व दही पोहे हा एक ऑप्शन असायचा. तसेच उकड, व दडपे पोहे ही होत कधीकधी. आमच्याकडे शिरा व सांज्याप्रमाणे तिखट मिठाच्या पुर्‍या व खांडवीही होत असे अचानक पाहुणे वगैरे आले की.. मुळात पाहुणे म्हणजे घरचेच नातेवाईक असतील तर पाहुण्या बायका पण स्वैपाकघरात आईला मदतीला लागायच्या.

टोमॅटो ऑम्लेट (बेसनाच्या पिठाचे) व दही पोहे हा एक ऑप्शन असायचा. तसेच उकड, व दडपे पोहे ही होत कधीकधी. आमच्याकडे शिरा व सांज्याप्रमाणे तिखट मिठाच्या पुर्‍या व खांडवीही होत असे अचानक पाहुणे वगैरे आले की.. मुळात पाहुणे म्हणजे घरचेच नातेवाईक असतील तर पाहुण्या बायका पण स्वैपाकघरात आईला मदतीला लागायच्या.

माझी आई टिपिकल मराठी पदार्थच (अजुनही) करयची. पण मी अचानक कोणाकडे गेल्यावर खाल्लेले आणि ल्क्षात राहिलेले काही पदार्थ
१. भाज्या घालुन केलेलं Maggy. छान परतलेलें आणी आतलं मसाल्याचं पाकीट भुरभुरलेलं वर गरम गरम चहा
२. शेवयाचा उपमा
३. दलियाची खीर
४. उकडलेल्या शेंगा,शेंगोडे आणि पावसाळ्यातल्या वालाच्या शेंगा व मका ( हे आमच्याघरी पण असायचं)
५. फ्रुट बोल
६. ओली/सुकी भेळ
७. कट्लेट पाटिस इ.

Happy

पूर्वी बाळाच्या प्रत्येक महिन्याच्या वाढदिवसाला वेगवेगळे पदार्थ करायचे. म्हणजे बाळ त्या त्या महिन्यात काय करते त्यावरून ते पदार्थ असायचे. पहिल्या महिन्यात बाळ नुसते झोपलेले असते म्हणून पसरट असे घावन घाटले. मग बाळ मुठी वळायला लागले की लाडू, कुशीवर वळायला लागले की करंजी असे पदार्थ करायचे पण मला सगळे पदार्थ महित नहियेत. कोणाला माहिती आहे का ?

विषयांतर- आमच्याकडे माझ्या पणजेसासुबाईंनी माझी मुलगी एक दोन पाऊले टाकायला लागल्यावर घरातल्या घरात एक कार्यक्रम केला होता.......एका परातीत मुलीला उभे करून तिच्या पावलांवर लाडू ओतले होते. बोरन्हाणाला जशी बोरे ओततात तसे....मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, खाणे-पिणे आणि संपला कार्यक्रम.

दिनेशदा....नक्की या.!...आपले स्वागत आहे.

मी एका मैत्रीणीकडे(मराठी) पाहिले की तिची मुलगी चालायला लागली तेव्हा एक कार्यक्रम केलेला, ती मुलगी चालायची तेव्हा प्रत्येक पावलावर करंजी टाकायची. Happy

Pages