Submitted by सुधाकर.. on 31 August, 2012 - 14:08
नवं कायबाय येतंय,
नि जग बदलतय.
चालंल त्ये बी वाट चुकतंय
आन पळल त्ये बी मागं रहातंय.
पलंगावरच सुस्त मातर म्होरं जातय.
देवाचं बी साँग हुतय
त्याया म्होरं कोण कसंबी नाचतय.
माणूस माणसावर फूस्कारतय,
एका वरचढ एक हुतय,
आन मुग्रूमाचच साधतय.
कोंचं बी सरकार येतंय,
सावलीचं झाड तोडून न्हेतंय,
आन तापलं ऊन अंगाव येतय.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप वेगळीच अन
खूप वेगळीच अन आवडलीही.
''मुग्रूमाच'''' म्हणजे काय?
कोंचं बी सरकार येतंय,
कोंचं बी सरकार येतंय,
मुग्रूम = हा मगरूर या मुळ
मुग्रूम = हा मगरूर या मुळ हिंदी शब्दापासून मराठीत आलेला मगरूम/मुगरूम याचाच एक खेडवळ(ग्राम्य) उच्चार आहे. ---अर्थ- अडदांड, अहंमन्य, इ.