Submitted by आरती on 21 November, 2011 - 10:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
दोडकी - २ (छोटी) / १ (मोठे)
हिरव्या मिरच्या - ३
दाण्याचा कुट - २ चमचे (जाडसर)
तिळ - १ चमचा
तेल - १ डाव
साखर,मिठ चविप्रमाणे
फोडणीचे साहित्य - हळद, हिंग, मोहरी, जिरे, कडिपत्ता.
क्रमवार पाककृती:
दोडक्याच्या शिरा काढुन, स्वच्छ धुवुन घ्यावे, दोडके किसुन घ्यावे, नेहमीपेक्षा थोडी जाड किसणी मिळाली तर उत्तम. हळद, हिंग, मोहरी, जिरे, कडिपत्ता सगळे घालुन फोडणी करुन घ्यावी. किसलेले दोडके घालावे. व्यवस्थीत हलवुन, फोडणी सगळ्या दोडक्याला लागेल असे बघावे. थोडी वाफ आली की दाण्याचा कुट, तिळ, मिठ, साखर घालुन हलवावे. एक वाफ आली की गॅस बंद करावा. दोडक्याचा रस राहिला असेल तर, अटेपर्यंत मंद आचेवर ठेवावे.
मस्त पिस्ता कलरची भाजी तयार होते.
वाढणी/प्रमाण:
२ जणांना पुरते.
अधिक टिपा:
१. भाजी झाकण घालुन शिजवु नये.
२. दाण्याचा कुट जाडसरच असावा.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे दोडक्याची भाजी कुणालच
अरे दोडक्याची भाजी कुणालच आवडत / आवडली नाही कि काय ?? !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडते, आवडते अगं, आजच झुकिनी
आवडते, आवडते
अगं, आजच झुकिनी किसून कोरोडा केला तेव्हा ह्या भाजीची आठवण झाली होती. ज्यांना दोडक्याचं टेक्श्चर आवडत नाही त्यांना ह्या पद्धतीने नक्की आवडेल असं वाटलं.
आरती, फोटो टाक ना. मी पण आता
आरती, फोटो टाक ना. मी पण आता दोडके आणले की याच पद्धतीने करून बघणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वरदा, अगदीच सोप्पी भाजी आहे
वरदा,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदीच सोप्पी भाजी आहे म्हणुन नाही टाकला फोटो, टाकते
दोडक्याचं टेक्श्चर आवडत नाही त्यांना ह्या पद्धतीने नक्की आवडेल असं वाटलं. >> अगदी बरोबर. दोडक्याची भाजी म्हंटल्यावर नवर्याने हातत सॉसची बाटली घेतली होती. पण एक घास खाल्ल्यावर आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी अशीच करते दोडक्याची भाजी.
मी अशीच करते दोडक्याची भाजी. फक्त तीळ नाही घालत, दाण्याचं कूट घालतेच. तसंच दोडका किसून न घेता किसणीवर सालं काढून फोडी करते. शिवाय किसलेल्या सालांची परतून चटणी करते. किसलेली सालं जरा लांब लांब असतात, म्हणून त्याचे थोडे बारीक तुकडे करुन घ्यायचे.. वरील प्रमाणे फोड्णी करुन त्यात कापलेला लसूण, तीळ आणि मिरचीचे तुकडे घालून मग दोडक्याची सालं घालून, मद गॅसवर कुरकुरीत होइपर्यंत परतायचं. अशीच दूधी भोपळ्याच्या सालांची चट्णी पण छान होते.
यम्मी दिसतेय एकदम तोंपासु
यम्मी दिसतेय
एकदम तोंपासु (दोडक्यासाठी हे कधी तोंडातून बाहेर पडेल असं वाटलं नव्हतं मला)
भाजी आणि सालांची चटणी दोन्ही
भाजी आणि सालांची चटणी दोन्ही करून बघणार!
माझी आवड्ती आहे ही भाजी मी
माझी आवड्ती आहे ही भाजी मी लसूण कापून घालते आणि लाल तिखट घालून करते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे भाजी... दोडक्याला
मस्त आहे भाजी... दोडक्याला पाणी भरपूर सुटतं ना? भाजी पचपचीत नाही ना होत किसल्यामुळे?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता दोडका आणला की अशी भाजी करून बघणार.
भारीच, दोडकं माझं खरं तर
भारीच, दोडकं माझं खरं तर दोडकं आहे, पण भाजी मस्त दिसतीय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साले काढल्यावर दोडकी किसता
साले काढल्यावर दोडकी किसता येतात का ? आमच्याकडची अगदीच कोवळी असतात. (आईच्या भाषेत कापसासारखी !! )
दिनेश, सालं नाही काढायची.
दिनेश, सालं नाही काढायची. फक्त शिरा काढायच्या. त्या थोड्या वर उचललेल्या असतात त्यामुळे, सालकाढणीने काढतान बरोबर तेवढ्याच निघुन येतात आणि साल तसेच रहाते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दोडक्याला पाणी भरपूर सुटतं
दोडक्याला पाणी भरपूर सुटतं ना? भाजी पचपचीत नाही ना होत किसल्यामुळे? >>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंजू,
पाणी सुटतं पण अगदी थोडं. काकडी वगैरे सारख नाही. भाजी पचपचीत नाही होत. पण कोरडी पण नाही होत.
करुनच बघ एकदा
आजच केली होती...छान झली!
आजच केली होती...छान झली!
अरे वा
अरे वा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दोडक्याची भाजी मला तर अजिबात
दोडक्याची भाजी मला तर अजिबात आवडत नाही.:अरेरे:
हां पण दोडक्याचे भजी छान लागतात.:स्मित:
धन्यवाद आरती. चव अगदी छान
धन्यवाद आरती.
चव अगदी छान आली, पण दोडक्यांना पाणी सुटले बरेच.
मस्त आहे रेसिपी. छान होते
मस्त आहे रेसिपी. छान होते भाजी अगदी. शिवाय एकदम सोप्पी आहे.
आज केली होती. आवडली सगळ्यांना.
धन्यवाद आरती.
आज मी पण केलीय!
आज मी पण केलीय!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)