Submitted by टकाटक on 23 August, 2012 - 07:43
हल्ली एम. एस. ई. बी. बील भरणे ऑनलाईनच्या सुविधेने अतिशय सुलभ झाले आहे. आपण घरबसल्या एम. एस. ई. बी. बील भरु शकतो. फक्त आपल्याकडे कंझ्युमर नं आणि प्रोसेस सायकल नं आपल्या जवळ बाळगावा लागतो. www.mahadiscom.com च्या साईटवर जाउन pay your bill online च्या ऑप्शनला क्लीक केलं की कंझ्युमर नं आणि प्रोसेस सायकल नं विचारला जातो. आपल्या बीलावरच दोन्ही नं लिहीलेले असतात. बील भरण्याकरीता लांबलचक रांग लावायची गरज नाही.
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
www.mahadiscom.com साईटवर
www.mahadiscom.com
साईटवर जाउन
pay bill online
या ऑप्शनला क्लीक करा.
तुम्ही एकच कॉम्प्युटर वापरत
तुम्ही एकच कॉम्प्युटर वापरत असाल तर हा कंझ्युमर नम्बर ब्राऊजर मध्ये स्टोअरही होतो. या पेमेन्ट मध्ये काही डिस्काऊंतही मिळतो. मात्र मुदत टळून गेल्यावर ही लिंक डिसेबल होते. या पोर्टलवर मागच्या पेमेन्टचे डिटेल्स, दर महिना विज वापराचा इतिहास , तुमचे बिल कसे कॅल्क्युलेट केले आहे. याचा तपशील अशी उपयोगी माहिती दिलेली आहे . शिवाय इ मेल व एस एम एस वर बिल प्रप्त करण्याची सुविधाही त्यात आहे. मात्र क्रेडिट्/डेबिट कार्ड मात्र हवे. मला अजून तरी काही प्रॉब्लेम आलेला नाही.
Using it since it has
Using it since it has started. Works very well..
सेम हियर, मी ही कायम ऑनलाईनच
सेम हियर, मी ही कायम ऑनलाईनच भरते बिल, नव्या घरी प्रिपेड मीटर आहे ते ही ऑनलाईनच रिचार्ज करते.
उगिच कोणतही रेकॉर्ड ठेवायची गरज नाही, ऑनलाईन सर्व हिस्ट्री कळते. शिवाय बसल्या जागी भरता येते, फक्त ड्यू डेट उलटली की प्रॉब्लेम होतो. एखाद महिना चालेल, कारण मागच्या महिन्यातली ड्यू अमाऊंट पुढच्या महिन्याच्या वीजबिलात दिसते. वीज कट झाली तर मात्र फार कटकट होते.
साईटवर जाउन ऑनलाईन बिल भरणे
साईटवर जाउन ऑनलाईन बिल भरणे सुरक्षित आहे का नेट बँकींग वापरणे जास्त चांगले. मला अजुन डेबिट कार्ड ऑनलाईन वापरायला धीर होत नाही.
मन्स्मि१८, त्यासाठी मी एक
मन्स्मि१८, त्यासाठी मी एक ट्रिक केली आहे ऑनलाईन बिले भरण्यासाठी मी स्वतंत्र खाते व डेबिट कार्ड घेतले आहे. त्यात पुरेशी पण थोडी रक्कम मी ठेवतो. व ती संपत आली की मुख्य खात्यातून कार्ड टू कार्ड ट्रान्स्फर करतो. म्हणजे जरी घोळ झाला तरी फार प्रॉब्लेम नाही. अजून तरी काही झालेले नाही. मी वीज, लॅन्डलाईन,मोबाईल बीएसेन एल रिलायन्स्,एअर टेल्,ई, रेल्वे तिकीटे, टाटा स्काय ची बिले आणि रिचार्ज करतो. क्वचित प्रसंगी खरेदीसाठीही
बाजो... छान आयडीया आहे..
बाजो...
छान आयडीया आहे.. थँक्स..
डेबीट कार्ड साठी नेट वर वेगळा
डेबीट कार्ड साठी नेट वर वेगळा पासवर्ड ठेवायचा...... एटीम साठी वेगळा ठेवायचा.....
स्टेट बँकेच्या अॅटीएम कम
स्टेट बँकेच्या अॅटीएम कम डेबिट कार्डला डबल सिक्युरिटी कोड आहे. त्यात ए टी एम चा पासवर्ड नसतो तो वेगळाच आपणच रजिस्टर करावा लागतो. मात्र पिन चा आणि त्याचा संबंध लावण्यासाठी हा सेक्युअर कोड पहिल्या वेळेस ए टी एम मधे जाऊन रजिस्टर करावा लागतो. मग तो नेटवर वापरायचा अन रेग्युलर पिन ए टी एम वर.. (अर्थात हे दोन्हीही आपल्याला वेळोवेळी बदलताही येतात बँकेची मदत न घेता....)
हि सुविधा सुरु झाल्यापासुन
हि सुविधा सुरु झाल्यापासुन वापरतोय मी. आजही अतिशय उत्तम रित्या चालते. फक्त एकच समस्या आहे ती म्हणजे बिलाची ड्यु डेट उलटून गेल्यानंतर अगदी दुसर्या दिवशी जरी बिल भरले तरी ते लगेच काऊंट होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष जावूनच तशी नोंद करुन घ्यावी लागते.
ड्यु डेट उलटल्यावर ती लिंकच
ड्यु डेट उलटल्यावर ती लिंकच डिस एबल होते म्हणजे क्लिकच होत नाही. त्यामुळे ऑनलाईन भरले जाण्याचा प्रश्नच येत नाही. ते बील जाऊन काऊन्टरवरच भरावे लागते
मी तर डेबिटकार्ड च वापरते,
मी तर डेबिटकार्ड च वापरते, आजतागायत (सुदैवाने) कधीच काहीच घोळ झालेला नाही.
बरं मग एल आय सी च्या ऑनलाईन
बरं मग एल आय सी च्या ऑनलाईन प्रीमियम बद्द्ल कुणाला काही माहीती आहे का ? मी खुपदा प्रयत्न करुनही लॉगीन रजिस्टर होत नाहीये.
www.billdesk.com ऑनलाईन बिले
www.billdesk.com ऑनलाईन बिले भरण्याचा option आहे.
https://customer.onlinelic.in
https://customer.onlinelic.in/online_payment.htm
एल आय सी च्या ऑनलाईन प्रीमियम साठी वर निर्देशित केलेली लिंक वापरा, मी गेल्या ३-४ वर्षापासून वापरतोय कधीही समस्या आलेली नाही, लगेच पोचपावती ही मिळते
एलआयसी पेमेंट साठी तुमच्या
एलआयसी पेमेंट साठी तुमच्या पॉलिसीज आधी व्हॅलिडेट करुन घ्याव्या लागतात.. त्यानंतरच त्यांचे पैसे तुम्हाला ऑनलाईन भरता येतात.
पॉलिसीज व्हॅलिडेट कशा
पॉलिसीज व्हॅलिडेट कशा करायच्या ??????????
हो मी पण एलआयसी ऑनलाईनच
हो मी पण एलआयसी ऑनलाईनच भरते.. अकाउंट रजिस्टर करुन पॉलिसी व्हॅलिडेट करुन घ्या..
आधी तुमचे अकाउंट रजिस्टर आहे
आधी तुमचे अकाउंट रजिस्टर आहे का? नसेल तर करुन घ्या. नंतर एलाआयसी साईट वर जाऊन डाव्या बाजुला "enroll policy" अशी लिन्क असेल .ती क्लिक करा. पॉलिसी डिटेल भरा.
दिपाली : - आता लॉगीन तर झालंय
दिपाली : - आता लॉगीन तर झालंय पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे एलाआयसी साईट वर डाव्या बाजुला "enroll policy" अशी लिन्क सापडत नाहीये. पुर्ण होमपेज वर अशी लिन्क सापडत नाहीये.
लॉगीन क्रीएट झालं नव्हतं, आता
लॉगीन क्रीएट झालं नव्हतं, आता झालंय. आणि पॉलीसीज सुद्धा एनरोल केल्या. Thank you , Madam.