Submitted by सुधाकर.. on 21 August, 2012 - 11:54
हे असं नेहमीच कसं जादूमंतर होतं
सारं ज्ञान वेळ निघून गेल्यानंतर होतं
तो समाज ही एक आरसा होता भिववणारा
तसं तुझ्या माझ्यात ते कितीसं अंतर होतं?
त्या दिवशी तू पहीलेलं अतीभव्य वादळ
हे देखिल माझ्याच मनाच एक अवांतर होतं
आणि आज पहाटे मी पाहीलेलं ते स्वप्न
हे तुझ्या येण्यासारखच काव्यमंतर होतं.
काळीज पोखरुन स्वप्नांनीच जागा केली
तसं तुझ्याशिवाय हे जगणंच निरंतर होतं.
या भरल्या कळपातून कुठेतरी दूर जाणं
हेच फक्त आता शेवटचं गत्यंतर होतं .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
समाज भिववणारा आरसा>>>सुंदर
समाज भिववणारा आरसा>>>सुंदर उपमा.
या भरल्या कळपातून कुठेतरी दूर
या भरल्या कळपातून कुठेतरी दूर जाणं
हेच फक्त आता शेवटचं गत्यंतर होतं .
छान
थँक्स- विभा.-विक्रांत
थँक्स- विभा.-विक्रांत