Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सफरचंदांचे खूप पीक आले आहे.
सफरचंदांचे खूप पीक आले आहे. त्याचे काय करावे शोधले असता सफरचंदाचे लोणचे सापडले. ते करून बघते. आणखी काय काय करता येईल?
सफरचंदाचा जाम, हलवा, खवा
सफरचंदाचा जाम, हलवा, खवा घालुन वड्या, शेक, ज्युस वगैरे. अनूभवी सांगतीलच.
मृदुला, सफरचंद शिजवून घेऊन
मृदुला, सफरचंद शिजवून घेऊन त्याचे कैरीसारखे पन्हे करता येते. अॅपल सायडर असे गूगलून बघ.
दाबेली मसाला दाबेली सोडुन
दाबेली मसाला दाबेली सोडुन कशात वापरता येइइल
>>अॅपल सायडर सायडर म्हणजे
>>अॅपल सायडर
सायडर म्हणजे बियरच्या कुळातले, फर्मेंटेड. इथे घरगुती सायडर करतात बरेच लोक. पण त्याचा मोठा ड्रम वगैरे असतो.
आपण शिजवून लगेच गूळ वगैरे घालून प्यायचे असे का? पाकृचा दुवा द्यावा.
all purpose flour म्हणजे
all purpose flour म्हणजे नक्की काय, गव्हाचे पीठ का??
आणि नाचणी किंवा गव्हाचे पीठ वापरून cookies च्या रेचीपेस मिळू शकतील का
मी सर्च वापरून शोधून पहिले पण नाही मिळाल्या
नीधपला विपू टाकून ठेव मृदुला.
नीधपला विपू टाकून ठेव मृदुला. तिच्याकडे एक फंडू कृती आहे. (असं ती म्हणते
)
(all purpose floor ) म्हणजे
(all purpose floor ) म्हणजे मैदा. कुकीजमध्येच काय केक, शं.पाळे, करंज्या काही पण बनव.
नाचणीचे पीठ मात्र पूर्ण चाळलेले असावे, म्हणजे चव छान येते.
ओह ओक...
ओह ओक...
>>इथे फक्त पाककृतींबद्द्ल
>>इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा.<<
मंजूडी, अहो पण तुम्ही मागच्याच पानावर दही वड्याची कृती लिहिलीत, आँ? आता इथे दटवता आहात?
हैला झंपी, दहीवड्यांची कृती
हैला झंपी, दहीवड्यांची कृती मी इथे लिहिली आहे, तुला मागच्या पानावर कुठे दिसली? भुताटकी झाली की काय?
घरी जेव्हा जेव्हा दुध नासते,
घरी जेव्हा जेव्हा दुध नासते, त्या पनीरमधुन पराठे बनविते कारण ते घट्ट होतच नाही. यावर काही उपाय आहे का? कि ते एकदम दुकानासारखे घट्ट व्हावे.. ??
रुपाली, तो छाना रुमालात
रुपाली, तो छाना रुमालात बांधून त्यावर वजन ठेवून पाणी काढले तर अगदी वड्या करण्याएवढे कडक होते.
हाताशी वजन म्हणजे पाणी भरलेला कूकर वगैरे. तसेच हे जरा कलत्या पाटावर / फळीवर ठेवायचे, म्हणजे पाणी ओघळून जाते.
मी कपड्यात बांधुन ठेवते,
मी कपड्यात बांधुन ठेवते, दिनेशदा एकदा करुन बघते, धन्स..
दोन / तीन तास लागतील याला बरं
दोन / तीन तास लागतील याला बरं का !
मला नेहमी प्रश्न पडतो की
मला नेहमी प्रश्न पडतो की नासलेले दुध कुठल्या पदार्थात वापरावे का?त्याने अपाय होत नाही ना? कारण पनीर बनवताना दुधात लिम्बु पिळून वगैरे बनवतात म्हणजे दुध नैसर्गिक प्रक्रियेने नासलेले नसते.
अमि तुम्ही म्हणताय तसं
अमि तुम्ही म्हणताय तसं नासलेल्या दुधाचं पनीर खाऊन् तुम्हाला अपाय झालाय का म्हण्जे पोट बिघडणे इ.? नसेल तर खा बिनधास्त
मी ट्रायच नाही केलय अजून ...
मी ट्रायच नाही केलय अजून ... पण जर अपाय होत नसेल तर खाऊन पाहिन
मि अमी, पण जर दुध का नासलय हे
मि अमी, पण जर दुध का नासलय हे माहिती असेल (उदा. चुकुन दुध तापवायचे राहिले असेल) आणि चव चांगली असेल तर वापरा .
दूध नासते म्हणजे त्यात आंबट
दूध नासते म्हणजे त्यात आंबट पदार्थ पडलेला आहे.
कधी कधी एखादा किटक पडूनही ते नासते. तर कधी भांडे साफ नसल्याने, तर कधी दूधच जुने असल्याने.
नेमके कारण शोधले पाहिजे.
तापवायचे राहिले म्हणून नासले, अशी खात्री असेल तरच वापरावे. उघडे राहिले असेल तर त्यात काही पडलेय का,
ते आधी बघावे.
अयोग्य कारणांनी दूध नासले असेल तर त्याला खुपच विचित्र वास येतो.
अयोग्य कारणांनी दूध नासले
अयोग्य कारणांनी दूध नासले असेल तर त्याला खुपच विचित्र वास येतो.>> हेच सांगणार होते.
तसेच ते कधी कधी पूर्ण फाटत नाही....तापवल्यानंतर ते अर्धे दूध अर्धे पनीर असे दिसते.
मायबोलीवर मेझरिन्ग
मायबोलीवर मेझरिन्ग कप्स्,मेझरिन्ग स्पूनस् चे कन्व्हर्जन टेबल दिले होते,ते कुठे शोधू?प्लिज मदत करा.
नेटवरून साभार..... Cooking
नेटवरून साभार.....
Cooking Conversion Chart
Unit:____ Equals:____ Also equals:
1 tsp._____ 1/6 fl. oz.____ 1/3 Tbsp.
1 Tbsp.____ ½ fl. oz.____ 3 tsp.
1/8 cup____ 1 fl. oz.____ 2 Tbsp.
¼ cup____ 2 fl. oz.____ 4 Tbsp.
1/3 cup____ 2¾ fl. oz.____ ¼ cup plus 4 tsp.
½ cup____ 4 fl. oz.____ 8 Tbsp.
1 cup____ 8 fl. oz.____ ½ pint
1 pint____ 16 fl. oz.____ 2 cups
1 quart____ 32 fl. oz.____ 2 pints
1 liter____ 34 fl. oz.____ 1 quart plus ¼ cup
1 gallon____ 128 fl. oz.____ 4 quarts
Sakalcha nasta asa dhaga
Sakalcha nasta asa dhaga kadhta yeil ka ki jene karun breakfastche sarv prakar eka thikani miltil kiwa asa dhaga aadhipasun aahe ka ithe?
श्रव्या, तूम्ही उपहार अशा
श्रव्या, तूम्ही उपहार अशा शब्दाने शोधलेत तर सर्व पाककृती मिळतील.
Ok thanks dineshda mi karte
Ok thanks dineshda mi karte search
sonalisl धन्यवाद!
sonalisl धन्यवाद!
कधी नव्हे ते पालकाव्यतिरिक्त
कधी नव्हे ते पालकाव्यतिरिक्त दुसरी पालेभाजी दिसल्यामूळे मी ही भाजी घेतली. ही नक्की कोणती भाजी आहे आणि कशी करतात? ही भाजी राजगीर्याची भाजी आहे ना? मला भाजीवाल्याने चौली का साग आहे असं सांगितलं.
ही चवळिची भाजी आहे. आम्ही
ही चवळिची भाजी आहे. आम्ही कांदा परतुन त्यात भरड वाटलेली मिरची-लसुन घालतो. शेवटी जाडसर दाने कुट. छान लागते ही भाजी
( लवकर शिजते )
अल्पना, राजगिर्याची पाने
अल्पना, राजगिर्याची पाने बरीच मोठी असतात. ही माठ वर्गातली भाजी आहे. वर वर्षा ने लिहिलेय तशीच करतात.
मी ही पालेभाजी, रताळे, मिरची आणि मक्याचे दाणे एकत्र शिजवून रसभाजी कालच केलीय.
पण कडधान्य चवळीची ही भाजी नाही, तिच्या पानांचीही भाजी करतात. ती पाने त्रिदलीय असतात.
Pages