भाग १ http://www.maayboli.com/node/35261
भाग २ http://www.maayboli.com/node/37192
भाग ३ http://www.maayboli.com/node/37223
तंत्र आणि अध्यात्म यातील मोठा फरक म्हणजे नीतीमत्ता .खऱ्या आध्यात्मिक सद्गुरुंकडे नीतीमत्ता ,माणुसकी,,दया-क्षमा -शांती आढळते ,पण या दम्भाचारी तांत्रिक गुरूंच्या ठायी नीतीमत्ता आणि इतर सद्गुण औषधालाही सापडणार नाहीत .
खरे सद्गुरू शिष्याच्या अहंकाराचा विलय करून त्यास ईश्वर-चरणी स्थिर करतात ,तर हे दांभिक गुरु शिष्याच्या/गिऱ्हाईकाच्या अस्मितेवरच हल्ला करून त्याचे व्यक्तिमत्त्व नासवून टाकतात .त्याला एक बाहुला बनवतात ,जो कथित गुरूच्या लहरीवर अवलंबून राहील ,त्यासाठी वशीकरण आणि तत्सम साधनांचा वापर केला जातो.
साधक हा अहंकार आणि काम-क्रोध-लोभ-मद-मोह-मत्सर या विकारांपासून मुक्त असावा अशी आध्यात्माची पहिली गरज आणि पात्रता असते ,परंतु तंत्रात द्वेष,मत्सर,दंभ आणि अहंकार यांनी लडबडलेले गुरु आणि शिष्य ठायी-ठायी आढळतात .तंत्राचे सगळे विधी करण्या मागचे उद्देश दुसऱ्याचे वाईट करणे /लुबाडणे किंवा स्त्रीमोह असेच असतात .
खरा सद्गुरू हा लोकेषणा,वित्तेषणा आणि पुत्रेषणा अशा तीन मोहापासून निर्मुक्त असतो ,म्हणजे त्याला कीर्ती/प्रसिद्धी यांची हाव नसते,,तसेच त्याला पैशाचा मोह नसतो आणि आपल्या पोराबालांचे कसे होई,,? असा स्वार्थ नसतो.असे साईबाबा म्हणत .साईबाबा नी खरा गुरु ओळखण्यासाठी ह्या तीन चाचण्या सांगितल्या आहेत .त्यात आपण कोणत्याही गुरूला पारखून घ्यावे.
स्वार्थ,अहंकार,दंभ,दुराग्रह,हट्ट,दुराभिमान यात गळ्यापर्यंत बुडालेल्या अशा तान्त्रीकाना गुरु म्हणणे म्हणजे भारतीय अध्यात्माचा अपमान आहे .हे नीच आसुरी प्रवृत्तीचे गुंड आपल्या झोटिंग-शाहीने निष्पाप कोवळ्या जीवना नाडत असतात ,यास्तव सावधान !!!!!!!!!!!!!!!!
अरे व्वा .भीमराव जी तुम्ही तर
अरे व्वा .भीमराव जी तुम्ही तर प्रवचनच द्यायला लागलात कि! बोला पुंडलिक वरदा हरी विट्ठल!
श्रीऽ ज्ञानदेऽव तुकाऽऽऽऽराऽम!
श्रीऽ ज्ञानदेऽव तुकाऽऽऽऽराऽम! पंढरीनाऽथ महराज कीऽऽऽ
जय!
(झोटिंग) इब्लिस.
छोटा भीम हा भाग आधी घ्यायला
छोटा भीम
हा भाग आधी घ्यायला हवा होता. वशीकरण वगैरेंचं समर्थन मी करू शकत नाही. त्याऐवजी अध्यात्मावर भर द्यायला हवा. भाग खूपच छोटे झालेत.
कात्रे जी व इब्लीस , हा गंभीर
कात्रे जी व इब्लीस , हा गंभीर विषय आहे, कृपया थिल्लर पणा नको
खरा सद्गुरू हा
खरा सद्गुरू हा लोकेषणा,वित्तेषणा आणि पुत्रेषणा अशा तीन मोहापासून निर्मुक्त असतो ,म्हणजे त्याला कीर्ती/प्रसिद्धी यांची हाव नसते,,तसेच त्याला पैशाचा मोह नसतो आणि आपल्या पोराबालांचे कसे होई,,? असा स्वार्थ नसतो.असे साईबाबा म्हणत .साईबाबा नी खरा गुरु ओळखण्यासाठी ह्या तीन चाचण्या सांगितल्या आहेत .त्यात आपण कोणत्याही गुरूला पारखून घ्यावे.
छान .... छान ..... छान ..........
भीमराव, कुणी पुंडलीक वरदा हरि
भीमराव,
कुणी पुंडलीक वरदा हरि विठ्ठलाचे नामस्मरण केले तर पुढील संकिर्तन पूर्ण करणे हे आम्हा वैष्णवांचे कर्तव्यच!
तेव्हा कृपया नाराज होऊ नये.
समाजात आणि विशेषत:
समाजात आणि विशेषत: धर्म-शास्त्र आणि अध्यात्म यात पसरलेला ढोंगीपणा /दांभिक पणा उजेडात आणावा/,यासाठी हा प्रपंच आहे ...
फार छान छोटा भीमराव जी ,उत्तम
फार छान छोटा भीमराव जी ,उत्तम लिखाण आहे... मी आयुष्यात पहिल्यांदाच इतकी सांगोपांग माहिती वाचली . पुढचे भाग लवकर येवूड्यात . असतं कुठे हल्ली? दिसत नाही माबोवर?