पुण्यात स्फोट

Submitted by मी नताशा on 17 August, 2012 - 07:37

ऑनलाइन टीम
पुणे, दि. १७ - पुण्याजवळील चिंचवडमध्ये शुक्रवारी दुपारी एक कमी तीव्रतेचा स्फोट झाला असून त्यात ३ वर्षांचे बालक जखमी झाले आहे. एका इमारतीच्या पाय-यांवर हा स्फोट झाला. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी बालकावर चिंचवडमधील बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यात झालेल्या साखळी सायकल स्फोटांप्रमाणेच हा प्रकार आहे की काय अशी भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. आज दुपारी चारच्या सुमारास चिंचवडमधील डांगे चौकातील अश्विनी नर्सिंग होमसमोरील एका इमारतीत ही दुर्घटना घडली. या ठिकाणी तातडीने पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी घाबरू नये तसेच अफवांना बळी पडू नये असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या ऑफीसमधेही सगळीकडे त्याचीच चर्चा चालू आहे , कारण बरेच जण त्याच भागात राहतात .पण नीट काहिच कळत नाहीये . Sad

बातम्यात सांगाताहेत प्लॅस्टीकच्या पिशवीत रसायने होती आणि त्या लहान मूलाने ती पिशवी उचलली.
खात्रीशीर बातमी नाही. ते बाळ सुखरुप रहावे, अशी प्रार्थना करु या.

काय भयंकर आहे...:(
मी माझ्या पोराकडून चांगलेच वदवून घेतले आहे की रस्त्यावर कुठल्याही वस्तुला हात लावायचा नाही. बाऊ होतो....
त्यात सायकलपासून टेडीपर्यंत सगळ्या वस्तू सांगितल्या....
काय दिवस आले आहेत...चार वर्षाच्या मुलाला जा बाहेर बिनधास्त खेळ असे म्हणायलाही जीभ रेटत नाही....
संध्याकाळी सणस प्लाझाच्या इथे बॉम्ब असल्याचे कळले. पोराचे बालभवन तिथून जवळच....जीवाची अक्षरश तगमग उडाली...सुदैवाने ती अफवा होती....
काय करू समजत नाहीये....हे जे कुणी आहेत त्यांना आयुष्यात कधीही सुख लाभणार नाही....एका लहान पिल्लाच्या बाबाचा शाप आहे हा... Sad

विशेष नाही. हाय टेन्शन विजेच्या तारांच्या स्पार्किन्गचा स्फोट होता तो. काळजी नसावी...

उच्च दाबाच्या तारांच्या किती सुंदर फुलबाज्या उडाल्या नैका! देखभाल नावाचा प्रकार अस्तित्वात आहे की नाही!! सगळीकडे भ्रष्टाचार!!!

-गा.पै.

(बा.जो., कृ.गै.न.!)