पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, हो, मी पण टोमॅटोशिवायच खाल्ला आहे. अगदी टोमॅटोच वापरायचा असेल तर हिरवा वापर. किंवा टोमॅटो ऐवजी थोडे दही वापर. चांगले लागते. आणि अंजु ने सांगीतल्या प्रमाणे हळदीची फोडणी.

लोला +१

मी नेहमी टोमॅटोशिवायच खाल्लाय << ++१

मसालेभातात टॉमेटो नाही घालत....म्हणजे आम्ही तरी नाही घालत. तयार भातावर वरतुन लिंबुं पिळायचे आणि भरपुर कोथिंबीर्-खोबरे.... व्वाह!!!!

लेमन राईस, फक्त येल्लो बेलपेपर्स, कॉर्न, पिवळा भोपळा असे घालुन देखिल पुलाव टाईप्स करता येइल.

मी नेहमी टोमॅटोशिवायच खाल्लाय.>>+++१
मसालेभातात टॉमेटो नाही घालत....म्हणजे आम्ही तरी नाही घालत.>>+१
मी त्यात हिरवी मिर्ची वापरते.

धन्यवाद सर्वांचे.
मी टोमॅटोशिवायचा मसालेभात बाहेरच खाल्लाय... बाकी दोन्ही घरी टोमॅटो (फोडणीत नाही, पण मोठ-मोठे तुकडे घातलेच पाहिजे) घालूनच करतात - का कोण जाणे... Happy

(मी आळशीपणा करतेय... मागच्या धाग्यांमधे वगैरे बघितलं नाहीये...)
ऑफिसात कप केक सेल आहे. चॅरिटी. मी भ्यंकर वाईट बेकर आहे हे माहीत असूनही माझ्या गळ्यात काही बेकुन आणायचं पडलय.
सगळ्या गोड्यांमधे काहीतरी सेव्हरी केक सदृश करता येईल का? म्हणजे वाईट झालं तरी काहीतरी वेगळं वाईट म्हणून तरी खपेल.
किंवा हमखास फसणार नाही (don't underestimate me) असं गोडाचंही बेकिंग चालेल.

दाद, भारतीय चवीचे चालणार असेल तर... मागे कुणीतरी मेथीच्या केकची पाक्रु दिली होती. त्यात बरेच वेरिएशन्स होतात. त्याचे कप्केक्स बनवून कुठल्याही सेवरी सॉसचे टॉपिंग ( मेयो+ स्रीराचा सॉस, शेजवान सॉस, ग्रीक दही+ काकडी किंवा तुमच्याकडचा फेमस सॉस, केचपही चालेल) करु शकतेस म्हणजे खाताना अगदीच ड्राय होणार नही. किंवा कप्केक्स चे सिलीकॉन्चे मोल्ड्स असतील तर ते वाफवून कपकेक ढोकळाही होइल आणी जमणार असेल तर आयसिंग बॅग वापरून त्या ढोकळ्यात चटणी भरायची आणि कोथंबीर-खोबर्‍याने बंद करायचे

कोनला रवा - बेसन ( इकत्र ) लादु चि रेसिपि माहिति अहे का ? असेल तर क्रुपाया लिहावि इथे.

सुचरिता...आंबोळे व कारवारचे पोळे एकच का ते माहित नाही,पण आंबोळे पोळे करायचे मला माहीत असलेले प्रमाण देत आहे.
तांदूळ १ किलो,उडिद डाळ पाव वाटी,मेथी दाणे १ टीस्पून.(सर्व धुवून वाळवावे व जाडसर दळून आणणे.)
आंबोळे करायच्या आदल्या दिवशी वरील पीठ पाणी घालून पळीने पडेल असे भिजवून रात्रभर झाकून ठेवणे.
(शक्य असल्यास त्यावर केळीचे पान ठेवून २-३ जळते निखारे ठेवून मग झाकणे.)
सकाळी केळीच्या पानासकट निखारे काढून टाकणे. पीठात मीठ घालून तव्यावर पोळे करणे.
ह्याबरोबर मटण किंवा गुळवणी केली तर खासच Happy

लोकहो, मसालेभातासाठी मदत केल्याबद्दल धन्यवाद. Happy

तर मी हे केले:
तेलात मोहोरी, जीरे, हिंग, हळद, कढीपत्ता, तमालपत्र, दालचिनी, लवंगा, आणि उभा बारीक चिरलेला कांदा, लसूण्+आले पेस्ट टाकून मग गाजर, फरसबी, तत्सम चिरलेल्या भाज्या चमचाभेर गरम मसाल्यात परतल्या. मग निथळलेले तांदूळ परतले. त्यात पुरेसे पाणी + मीठ टाकून उकळले. भात होत आल्यावर थोडे डेसिकेटेड कोकोनट, तीळ, साखर, कोथिंबीर मिसळली. थोडा भात लहान मुलांसाठी काढून उरलेल्या भातावर तुपातली टोमॅटो(प्लीज नोट Wink ) आणि लाल मिरच्यांची फोडणी दिली.

हा 'पिवळा भात' १० मोठी माणसे आणि ५ मुलांनी अगदी चापून खाल्ला.

मेथिच्या मुठियान्ची एखादी रेसीपी आहे का? मेथी जास्त होती म्हणून त्याच्या मुठिया केल्या. तळून खाल्या. पण अजून उरल्या आहेत.

Double post

म्हणजे मुठीया झाल्या आहेत तर. त्या तळण्यापेक्षा तीळ मोहरीच्या फोडणीवर परतून चांगल्या लागतात. वरून लाल तिखट आणि कोथिंबीर ओले खोबरे घालायचे. मोठ्या असतील तर बारीक करायच्या.

कढीमधे पण टाकता येतील, रसपात्रा सारखा प्रकार करता येईल, गोळा भातासारखा प्रकार करता येईल.

रावी रेसीपि सोप्पि आहे. मेथिची पाने बरिक चिरुन त्यात बेसन घालावे. चवीसाठी ओवा, तिळ, जीरे, आल्-लसून पेस्ट, मीठ, साखर आणी १ चमचा तान्दळाचे पीठ घालावे. सर्व जिन्नस एकत्र करून थोडे पाणी घालून मळावे. मिश्रणाचे १ इन्चचे लाम्बूड्के गोळे करावेत. मोदका सारखे वाफवून वर सन्गितल्या प्रमाणे कढी किन्वा भाजी करावी.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

Pages