अस्तित्वाचा तुझ्या दाखला
किती मंदिरे पवित्र क्षेत्रे !
प्रवास केला रुचला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही
पूजा अर्चा कर्मकांड अन्
महा आरत्या सदैव होती
नवरात्राच्या एके दिवशी
पशूस एका बळी चढवती
कधी दयाळू भवानीसही
गुन्हा बळीचा कळला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही
समान वस्त्रे सर्व घालती
उच्चनीच हा भेद विसरुनी
हज यात्रेचा शेवट करती
सैतानांना खडे मारुनी
पण सैतानी राज्य चालते
भेदभावही सरला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही
बालपणीचे श्रीरामाचे
हट्ट बदलले अता एवढे !
हवेच कार्टुन टीव्ही वरती
चंद्र नभीचा ! तया वावडे
निंबोणीच्या आड चंद्रही
अशात गाली हसला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही
नवीन व्याख्या लिहू लागलो,
आम्हीच वेडे, कसे जगावे
गोंधळलेला पार्थ आजही
पुन्हा जन्मुनी कृष्णा यावे
पाप काय अन् पुण्य काय हा
कधीच गुंता सुटला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही
जीवन अपुले, जगणे अपुले
देव कशाला हवा गड्यांनो ?
जगणे झाले, मरून झाले
जळा चितेवर अता मढ्यांनो
धावा केला सदैव पण तो
विटेवरूनी हलला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com
शेवटचे कडवे आवडले
शेवटचे कडवे आवडले
आवड्ली.....
आवड्ली.....
छान आहे, आवडली........
छान आहे, आवडली........
मस्त ! फारच आवडली.
मस्त ! फारच आवडली.
व्वा नेहमीप्रमानेच आपली ही
व्वा नेहमीप्रमानेच आपली ही कविता अतिशय आवडली. खुपच छान.
हज यात्रेचा शेवट करती
सैतानांना खडे मारुनी
पण सैतानी राज्य चालते
भेदभावही सरला नाही ..... .व्वा. ... शेवटची दोन्ही कडवी देखिल अशीच खुप आवडली.
छान कविता काका
छान कविता काका ...........
शेवटचे कडवे अधिक आवडले !