प्राचीन काले भारत खंडे
होता एक विद्वान अन वरिष्ठ
नशिबी त्याच्या होती लेकुरे
उदंड अन एकाहुनी एक विशिष्ट
प्रथम पुत्र नाव त्याचे ठेविले जेष्ठ
काम नाही केले त्याने कोणतेही निकृष्ट
कोणी होता अति शांत अन संतुष्ट
त्याला म्हणे सर्व आहेस तू शिष्ट
झाला कोणी पुत्र वर्तनानी असे दुष्ट
दुर्योधनासही लाजवे व लोकां करे त्रष्ट
असे बलवान तो आणि बोलण्यात खाष्ट
वाटे जग सारे अन लोक त्यासी कनिष्ट
कन्या रत्न असे सुन्दर, करी सर्वां आक्रुष्ट
प्रेमाने तिला दिले नाव तुश्ट चविष्ट
कविता करे ति भारी च उत्कृष्ट
पण कथा तिच्या असत फारच क्लिष्ट
एक पुत्र असे सदासर्वदा रुष्ट
कोणी म्हणे कोणास आहेस तू भ्रष्ट
तर कोणी लाथ देई भागावरी पृष्ठ
म्हणे का केलेस वर्तन तू अशिष्ट?
सर्वांमध्ये असे सतत काही वितुष्ट
आईस वाटे झाले अनिष्ट लागे कोणाची दृष्ट
होई त्यामुळे एक जण आजाराने कृष्ट
आणि बुद्धी होती एकाला अतिशय निकृष्ट
आशीर्वाद होता म्हणुनी, व्हावे पुत्र अष्ट?
एकामागून एक होते धष्ट आणि पुष्ट
मातेस त्यांच्या परंतु पडे भारी कष्ट
तरीही समाधानी खावून मुलांचे उष्ट
वर्ष्या मागून वर्षे सरली
काही केल्या टळेना अरिष्ट
दारिद्रय न झाले कधी नष्ट
नवस आईने केंला, म्हणे देव रुष्ट !
देवाच्याच दयेने पूर्ण होई उद्दिष्ट
आईच्या पुण्याईने आला उजेड स्पष्ट
आईहुनी नसे जगात कोणीही श्रेष्ठ
म्हणून नसावे आईपुढे कधीही गर्विष्ठ
आईच्या प्रेमाशी सदा असावे एकनिष्ठ
अशी हि आहे पोथी तील छोटी गोष्ट
म्हणतात लेखक होते तिचे मुनी वशिष्ट
तुम्हाला नक्की करता येईल काबिता उत्कृष्ट
वाटल्यास वाढवा अन दाखवा थोडे धारिष्ट
आणि करा या गोष्टीचे अधिक मोठे परिशिष्ट
आवडेश. घेतलेत खूपच कष्ट
आवडेश.
घेतलेत खूपच कष्ट
छान,छान.. उत्कृष्ट यमके
छान,छान.. उत्कृष्ट
यमके जुळवण्या विशिष्ट
घेतलेत खूपच कष्ट......
आता इंग्रजी यमके घ्या..
आता इंग्रजी यमके घ्या.. फास्ट, लास्ट , बीस्ट .....
किरण व सुधाकर अन्
किरण व सुधाकर अन् शेळी...........
समजली का तुम्हाला ही गोष्ट
पहा कविता आहे किती ही चविष्ट
अहहा काय हे कविचे शब्दसामर्थ्य धष्टपुष्ट
थाम्बवा पाहू तुमची ही टवाळी उपर्निर्दिष्ट
नाहीतर करावा लागेल मला तुमचा एखादा उपाय इष्ट
-वैवकु (........तुमचाच एक आप्तेष्ट ......पण टिंगलटवाळीत तुमच्यापेक्षा कनिष्ट ;))
कविता अतिशय आवडली. उत्कृष्ट
कविता अतिशय आवडली.
उत्कृष्ट शब्द-वापर.
नवे शब्द शिकवले.