हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन
हिंदु धर्मात दहन केले जाते. पण एक माणूस जाळायला लाकूड फार लागते. विजेवरची दहन सोय सगळीकडे उपलब्ध नसते.
त्यामुळे हिंदु लोकानाही दफनाची सोय करता येईल काय? ( सध्या लिंगायत समाजात अशी पद्धत आहे. ) दफनाला लाकूड लागत नाही. शिवाय ठराविक काळ ८-१० वर्षे वगैरे गेला की त्याच जागेत पुन्हा पुन्हा दफन होऊ शकते.
दफन करायचे असेल तर हिंदु धर्मातही एक सोय आहे. मोठा संत होणे आणि समाधी घेणे, पण सामान्याना ते जमणारे नाही. मग सामान्याना अशी सोय आपल्या धर्माने किंवा शासनाने का केली नाही? तसेच एखादी व्यक्ती स्वतःला निधर्मी समजत असेल ( पण जन्माने हिंदु असेल ) तर तिचीही सोय होईल.
हिंदुनी पुढाकार घेऊन हिंदुंसाठी दफनभूमी करावी, अशा विचाराचे कुणी आहे का? अशी दफनभूमी सध्या कुठे आहे का? ( याबाबत धर्म काय सांगतो, हे संबंधितानी जरुर पहावे. पण आपण मेल्यावर एक झाड मरु नये अशी तळमळ असलेल्यानी याबाबत चिंता करायची गरज नाही. ) , एका पंचक्रोशीत तरी अशी सोय हवी.
मेडिकल कॉलेजात देणे, हाही सर्वाना जमणारा पर्याय नाही. ( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. आता पुन्हा मढे होऊन पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही.
)
मेडीकल कॉलेजना देणे हा पर्याय
मेडीकल कॉलेजना देणे हा पर्याय का नाही चांगला?? फक्त प्रेत तिथे पोहोचवायचा खर्च लागेल.. मेडीकल कॉलेजेसना नाहीतरी प्रेते लागतातच.
दुसरे म्हणजे हल्ली जागेचे भाव तुम्हाला माहित नाहीत का? अहो जीवंत माणसाना जागा मिळत नाही, मेलेल्यांची कोण फिकीर करणार?
एक गमतीशीर उदाहरण..
दादरला जमिनीचा भाव आहे २५,००० प्रति स्क्वे फूट..
एका माणसाच्या थडग्यासाठी कमीत कमी जागा ६ बाय ६ = ३६ स्क्वे फुट..म्हणजे एका थडग्यासाठी ९,००,००० रु???????.
अगदी सस्त्यातल्या सस्त्यात जागेचा भाव ५००/स्क्वे फुट..गुणिले ३६ = १८,००० रु.
त्यापेक्षा लाकुड स्वस्त नाही का?
मी दहन प्रथा बंद करुन
मी दहन प्रथा बंद करुन दफनप्रथा सुरु करा असे म्हणत नाही आहे.. दफन हाही एक मार्ग सर्वत्र उपलब्ध असावा, असे वाटते... जागेच्या भावाबाबत .. मी वर लिहिलेले आहे... दफनभूमीचा एरिया ठरलेला असतो. त्यातच त्याच त्याच जागेत दफन होत असते.
दफनाच्या दोन पद्धती आहेत. फक्त एक कापड घालून डायरेक्ट खड्ड्यात ठेवणे ( मुस्लिम) किंवा लाकडाची कॉफिन करुन त्यात ठेवणे ( ख्रिस्चन) .. दुसरी पद्धत जास्त खर्चिक आहे, तिलाही लाकूड लागते. त्यामुळे मला पहिलीच पद्धत अपेक्षित आहे.
दफन करुन वर काहीही देऊळ, शिलालेख वगैरे बसवू नये.
काहीतरीच काय फालतू विषय
काहीतरीच काय फालतू विषय ..............
अगदीच गरज नसलेला
इतिहासात आजवर किती मढी जळालीत किती दफन झालीत ..........काही कमी पडलय का
मग उगाच का काळजी करताय ??
काही कमी पडलय
काही कमी पडलय का?????????????? मग सतीची प्रथाही सुरु करा .. इतिहासात इतक्या बायका जळाल्या, काही कमी पडलं का?????
>>हिंदु धर्मात दहन केले जाते.
>>हिंदु धर्मात दहन केले जाते. पण एक माणूस जाळायला लाकूड फार लागते. विजेवरची दहन सोय सगळीकडे >>उपलब्ध नसते.
अगदि...अगदि..
एका "ज्वलंत" प्रश्नाला/विषयाला वाचा फोडल्याबद्दल श्री. शेळी यांचे अभिनंदन,
शेळीताई :मग इलेक्ट्रिक
शेळीताई :मग इलेक्ट्रिक शवदाहिन्या गवोगाव सुरू करा म्हणावे सरकारला
तुमची झाडे वाचतील मग ........
असो
पारशी समाजात शव उघड्यावर टाकले जाते म्हणे गिधाडे खातील म्हणून
त्याबाबत काहीतरी बोला ...................
दहन हा शवाची विल्हेवाट लावायचा फास्टेस्ट मार्ग मलातरी वाटतो .......म्हणून योग्यही !!!!!!......दहनाकरता ला़कडाऐवजी अजून काही वापरता येते का यावर सन्शोधन झाले पाहिजे ...........यावरही मत कळवा
-वै व कु
पारशी समाजात शव उघड्यावर
पारशी समाजात शव उघड्यावर टाकले जाते म्हणे गिधाडे खातील म्हणून
शव उघड्यावर टाकत नाहीत. एक मोठी विहिर असते. तिच्यात ढकलून देतात. असे केले तरी चालेल . जागाही कमी लागते.. साध्या विहिरी सारखी पण कोरडी विहिर असते. त्याला कुंपण असते, कुणी उगीच्च कुणाला ढकलु नये म्हणुन ..
चर्च गेट स्टेशच्या बाहेरच आहे. पण तिथे पारश्या शिवाय कुणाला आत सोडत नाहीत.
पण असेच काहीतरी वेगवेगळे
पण असेच काहीतरी वेगवेगळे मार्ग अवलम्बतात सर्वच धर्मात
धार्मिक श्रद्धा म्हणून पाहिले पाहिजे या विषयाकडे
असो
शवाची विल्हेवाट लावायचा फास्टेस्ट मार्ग :या बद्दल मत कळवाल का
धार्मिक श्रद्धेचा इथे प्रश्नच
धार्मिक श्रद्धेचा इथे प्रश्नच नाही... ज्याला परंपरा पाळायची आहे, त्याने पाळावी. पण ज्याना नाही, त्याना पर्याय असावा इतकाच या लेखाचा हेतु आहे.
फास्टेस्ट मार्ग .... कशाला
फास्टेस्ट मार्ग .... कशाला फास्टेस्ट हवा? मढे हळू कुजले तर चालत नाही का?
दफनाने जागेचा प्रश्न उद्भवतो.
दफनाने जागेचा प्रश्न उद्भवतो. तसेच दर २ दिवसानी त्याच जागेत आपण दफन करु शकत नाही. मरणाची सन्ख्या कमी होणार नाही. त्यामुळे दहनविधी अगदी साधा आणि सोप्पा प्रकार आहे.
असो तुम्ही शेळी असल्याने
असो
तुम्ही शेळी असल्याने तुमचे काय करायचे ते तुम्ही बघा
आम्ही माणसे आहोत आमच्या परम्परेप्रमाणे मेल्यावर जळायला आवडेल आम्हाला
वाटल्यास मारायच्या आधी प्रत्येकाने किमान १० झाडे लावायला हवीत असा नियम आमच्या धर्माशास्त्रात झाला तर उत्तमच ..नै का !!
धार्मिक श्रद्धेचा इथे प्रश्नच
धार्मिक श्रद्धेचा इथे प्रश्नच नाही>>>>>>>>>>>>
मग धार्मिक या प्रकारात का प्रसिद्ध केलात हा लेख???:दिवा:
चर्च गेट स्टेशच्या बाहेरच
चर्च गेट स्टेशच्या बाहेरच आहे. >>> चर्चगेट स्टेशनच्या बाहेर नाही आहे. मलबार हिलवर आहे.
एखाद्याने स्वतःला दफनून घेतले
एखाद्याने स्वतःला दफनून घेतले तर तो हिंदु धर्माबाबत अश्रद्ध आहे, असा अर्थ होत नाही. हिंदु धर्मातही काही जातीत ही प्रथा आहे. त्या अर्थाने मी बोललो की इथे श्रध्धेचा प्रश्न नाही.. ज्याला दहन करुन घ्यायला आवडेल त्याने तसे करावे, ज्याला दफन करुन घ्यायचे आहे, त्याने तसे करावे.
बाकी, मनुष्यजातीचे अंत्यविधी
बाकी, मनुष्यजातीचे अंत्यविधी कसे करावेत, याची चिंता एका शेळीला पडलेली बघून डोळे पानावले...:डोमा:
़खो खो हसुन पुरेवाट
़खो खो हसुन पुरेवाट
त्या अर्थाने मी बोललो की इथे
त्या अर्थाने मी बोललो की इथे श्रध्धेचा प्रश्न नाही.>>> तुम्ही डॉ. शेळी आहात की डॉ. शेळा? टायपो असावा
....
....:हहगलो:
(No subject)
शेळी | 11 August, 2012 -
शेळी | 11 August, 2012 - 16:15
एखाद्याने स्वतःला दफनून घेतले तर तो हिंदु धर्माबाबत अश्रद्ध आहे, असा अर्थ होत नाही. हिंदु धर्मातही काही जातीत ही प्रथा आहे. त्या अर्थाने मी बोललो की इथे श्रध्धेचा प्रश्न नाही.. ज्याला दहन करुन घ्यायला आवडेल त्याने तसे करावे, ज्याला दफन करुन घ्यायचे आहे, त्याने तसे करावे.
>> शेळी (बाई की बुवा?? ) अवलोकनात स्त्री लिहिलय नि इथे पुरुषासार्ख बोललो वगैरे लिहिताय्त..
समजून घे गं मेधे
समजून घे गं मेधे
डॉ. शेळा काय. . बोकड तरी
डॉ. शेळा काय. . बोकड तरी म्हणा
प्रोफाइलवर जेंडर झिरो केले
प्रोफाइलवर जेंडर झिरो केले आहे...
बोकड बरं नाही वाटत बोलायला
बोकड बरं नाही वाटत बोलायला म्हणून शेळा म्हटलं डॉ. इब्लिस
बाबा आमटेंचा मृतदेह केळीच्या
बाबा आमटेंचा मृतदेह केळीच्या पानात गुंडाळून जमिनीत पुरला गेला होता.
महात्मा जोतिबा फुले यांनीही आपल्या देहाचे दफन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा ज्यांच्या शेतजमिनी आहेत, त्यांना हे शक्य आहे. कदाचित सरकारी मालकीच्या /वनखात्याच्या जमिनीतही दफन शक्य व्हावे.
कोकणातल्या एका आंबा बागायतदाराबद्दल वाचल्याचे आठवते. जवळपास एखादे जनावर (गाय/बैल) मेले की त्याचा मृतदेह आणून ते आपल्या बागेत खड्डा खणून पुरत आणि त्यावर आंब्याचे झाड लावतात. या झाडांची वाढ जलद व जोमदार होते म्हणे.
छान माहिती... ग्रेट पर्सन्स
छान माहिती... ग्रेट पर्सन्स थिंक अलाइक हे सिद्ध झाले.
-- शेळी, द ग्रेट
माणसांचीच चिंता लागणार
माणसांचीच चिंता लागणार त्यांना. त्यांचा त्यांना प्रश्नच नाहिये. झटक्यात संपेल बोलाई मटाण. खाणारा म्हणेनाका वातड... हा का ना का...
चर्च गेट स्टेशच्या बाहेरच
चर्च गेट स्टेशच्या बाहेरच आहे. >>> चर्चगेट स्टेशनच्या बाहेर नाही आहे. मलबार हिलवर आहे.
मलबारलाही आहे. चर्चगेटच्या बाहेर आहे ते काय आहे?
चर्चगेटाच्या बाहेर अग्यारी
चर्चगेटाच्या बाहेर अग्यारी किंवा फायरप्लेस की फायर टेंपल म्हणजे पवित्र अग्नि का कायससं आहे. मुडदे-विहिर मलबार हिलातच आहे....
Pages