सर्वात जुना खेळ अशी मान्यता मिळालेली कुस्ती प्राचीन ऑलिंपिक्सचा भाग होती ग्रेको रोमन पद्धतीत कुस्तीगीर फ़क्त कमरेच्या वरच्या भागाचाच वापर करतात, तर फ़्रीस्टाइल कुस्तीत असे काही बंधन नसते. ग्रेको रोमन पद्धतीचा समावेश पहिल्याच (१८९६) अर्वाचीन ऑलिंपिक्समध्ये होता, तर फ़्रीस्टाइल कुस्ती १९०४ पासून ऑलिंपिक्समध्ये खेळली जाऊ लागली. महिला कुस्तीगिरांना २००४ पासून ऑलिंपिक्सच्या रिंगणात प्रवेश मिळाला.
स्पर्धा, पुरुषांच्या सात वजनी गटांत दोन्ही प्रकारच्या कुस्तीत तर महिलांच्या चार वजनी गटांत केवळ फ़्रीस्टाइल वर्गात अशी एकूण १८ (७+७+४) सुवर्णपदकांसाठी होईल.
कालावधी : ५ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट. स्थळ : एक्सेल. स्पर्धक : २६६ पुरुष, ७२ स्त्रिया. एका देशाचा केवळ एकच स्पर्धक एका प्रकारात. १२ X १२ मीटरच्या चौकोनी आखाड्यातल्या ९ मीटर व्यासाच्या वर्तुळाकृती मॅटवर सामने खेळले जातील.
कुस्तीगीर पर्तिस्पर्ध्याच्या खांद्याची मागची बाजू जमिनीला लावण्याचा प्रयत्न करतात. कुस्तीचा एक सामना प्रत्येकी २ मिनिटांच्या ३ अवधींत(period) खेळवला जातो. दोन अवधी जिंकणारा कुस्तीगीर विजेता ठरतो. फ़्रीस्टाइल कुस्तीतला शेवटचा अवधी निकाली होईपर्यंत खेळवला जातो. स्पर्धा बाद फ़ेरीच्या स्वरूपात खेळली जाते. अंतिम फ़ेरीत पोचलेल्या दोन कुस्तीगिरांमध्ये सुवर्णपदकासाठी सामना होतो. तर या दोघांकडून आधीच्या कोणत्याही फ़ेरीत पराभूत झालेल्या अन्य कुस्तीगिरांमध्ये पुन्हा दोन कास्यपदकांसाठी अशीच स्पर्धा (repechage) होते.
भारतीय आव्हान :
गीताकुमारी : महिला : ५५ किलो फ्रीस्टाइल : वय २३ वर्षे
अमित कुमार : ५५ किलो फ़्रीस्टाइल : वय १८ वर्षे
योगेश्वर दत्त : ६० किलो फ़्रीस्टाइल : वय २९ वर्षे
सुशील कुमार : ६६ किलो फ़्रीस्टाइल : वय २९ वर्षे : भारतीय पथकाचा ध्वजवाहक, बीजिंग ऑलिंपिक्समध्ये कांस्यपदक
नरसिंह यादव : ७४ किलो फ़्रीस्टाइल : वय २२ वर्षे
भारताच्या अमितकुमारने ५५
भारताच्या अमितकुमारने ५५ किलोच्या फ्रीस्टाइल गटातली आपली पहिली लढत जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याला पहिल्या फेरीत बाय मिळाली होती.
त्याचा प्रतिस्पर्धी इराणचा हसन राहिमी हा २०१२ चा आशियाई विजेता, तर २०११ च्या जागतिक अजिंक्यपदाच्या स्पर्धेत तिसर्या क्रमावर होता.
अमित कुमारची मॅच चांगली झाली.
अमित कुमारची मॅच चांगली झाली. त्याला उपांत्यपुर्व फेरीसाठी शुभेच्छा!
७४ वजनी गटातील यादवची मॅच ६.२० ला आहे.
अमित कुमारनी पहिल्या राउंड
अमित कुमारनी पहिल्या राउंड मध्ये हारल्यानंतरही चांगलीच मुसंडी मारली.. शेवटचा गुण मस्तच मिळाला...
थोड्याच वेळात नरसिंग यादवचीही
थोड्याच वेळात नरसिंग यादवचीही कुस्ती आहे.
नरसिंग यादव बाहेर.
नरसिंग यादव बाहेर.
यादव दोन राउंड मधेच बाहेर
यादव दोन राउंड मधेच बाहेर
सुशिल कुमारची कधी आहे?
सुशिल कुमारची कधी आहे?
नरसिंग यादव हारला... दुसर्या
नरसिंग यादव हारला... दुसर्या राउंडला अगदी शेवटी मैदानाच्या बाहेर गेल्यामुळे १ गुण गेला आणि हारला.
सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त
सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त उद्या...
अमित कुमारची पुढची फेरी आजच थोड्याच वेळात आहे. अजून साधारण वीस मिनिटांनी..
अमितकुमार, नरसिंगच्या पदकांचा
अमितकुमार, नरसिंगच्या पदकांचा निकाल आजच लागेल.
उद्या योगेश्वर दत्त आणि परवा सुशीलकुमार आखाड्यात.
अमितकुमार पराभूत
अमितकुमार पराभूत
योगेश्वर दत्तने ६० किलो वजनी
योगेश्वर दत्तने ६० किलो वजनी गटात फ्रीस्टाइल प्रकारात कांस्यपदक जिंकले.
सुशीलकुमार अंतिम फेरीत...
सुशीलकुमार अंतिम फेरीत... जबरदस्त तीन फेर्या खेळून....
सुशीलकुमार त्या दुसर्या
सुशीलकुमार त्या दुसर्या मल्लाच्या कानाला चावला काय? त्याचा कान आणि सुशीलकुमारचा ओठ याला रक्तही लागलेले होते. हा फाऊल नाही का?
सुशीलकुमारला रजतपदक. दोन
सुशीलकुमारला रजतपदक. दोन ऑलिंपिक पदके असलेला एकमेव(?) भारतीय. वैयक्तिक खेळातला नक्कीच.
सुशिल कुमारचे अभिनंदन..
सुशिल कुमारचे अभिनंदन.. त्याने सगळ्या फेर्या एकाच दिवसात खेळल्या.
सगळ्यां मल्लांच्या सगळ्या
सगळ्यां मल्लांच्या सगळ्या फेर्या एकेका दिवसातच होत्या.