भातुकली

Submitted by सुधाकर.. on 10 August, 2012 - 06:53

आज आठवे मजला
बकुळीच्या त्या सावलीला
मातीची घेऊन भांडी
तू संसार इवला मांडी.

वेणी बाहुलीची घालताना,
कितीक लागे तुजला चिंता.
कुंतल्यातला तरी सुटेना
तो लाल रेशमी गुंता.

बाहुलीशी जिव जडे
रमुन खेळशी तू वेडे
मध्येच काही मी बडबडे
करावेस तू भात-वडे
तरी साधले तुला गडे
बाहुलीचे गीत बोबडे.

निजू घातलेस बाहुलीला
बोट लावूनी ओठाला मग
अबोलाची ती शपथ मला.

निर्मळ होती बाळपणी
भातुकलीची प्रीत आगळी
तरी आज का काळीजवेळी
तुझी नि माझी वाट वेगळी?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज आठवे मजला
बकुळीच्या त्या सावलीला
मातीची घेऊन भांडी
तू संसार इवला मांडी.>> छान वातावरण निर्मिती!

वेणी बाहुलीची घालताना,
कितीक लागे तुजला चिंता.
कुंतल्यातला तरी सुटेना
तो लाल रेशमी गुंता.>> वाह....