उकडलेला बटाटा - १ ते २
आले लसुण पेस्ट - १ लहान चमचा
गरम मसाला - १ लहान चमचा
खसखस - १ लहान चमचा
तीळ - १ चमचा
किसलेले सुके खोबरे - १/२ वाटी
लोणच्याचा खार - १ चमचा
बारीक चिरलेली कोथींबीर - १/२ वाटी
तेल - तळण्यासाठी
लाल तिखट - चवीनुसार
मीठ - चवीनुसार
सर्वात आधी बटाट्याच्या फोडी करुन घ्याव्या.
कोरड्या कढईत(तेल न टाकता) तीळ आणि खसखस वेगळे वेगळे भाजुन घ्या.
आता कढईत तेल गरम करुन बटाट्याच्या या फोडी लालसर सोनेरी रंगावर तळुन घ्या, तेल थोडे कमीच घ्या जेणेकरुन तळल्यानंतर उरलेल तेल फोडणीला वापरता येईल व जास्त सुधा होणार नाही.
नंतर या तळलेल्या बटाट्याच्या फोडी एका प्लेटमधे काढुन घ्या.
आता कढईत उरलेल्या तेलात आले लसुन पेस्ट, भाजलेले तीळ, खसखस घाला.
लगेचच सुक्या खोबर्याचा कीस घाला म्हणजे तीळ खसखस जळणार नाही.
नंतर गॅस बारीक करुन यात गरम मसाला, लाल तिखट, मीठ आणि लोणच्याचा खार मिसळा.
आता यामधे तळलेल्या बटाट्याच्या फोडी आणि भरपुर कोथींबीर घालुन मिक्स करुन घ्या.
झाल, आपल बटाट्याच लोणच तयार..
हे नुसत सुधा छान लागत.
यात मीठ घालाताना मात्र जरा कमीच घाला कारण लोणच्याच्या खार मधे सुधा मीठ आधीच असते.
अगदी अशाच प्रकारे अंड्याचे सुधा लोणची करता येते, पण सध्या श्रावण आहे म्हणुन दुधाची तहान ताकावर भागवायची
यात उकडलेल्या बटाट्यांऐवजी उकडलेली अंडी घालायची की अंड्याच लोणच तयार..
हे लोणच प्रवासात नेण्यासाठी करायला अगदी सोईस्कर आहे, २ दिवसही आरामात टिकतं (अर्थात आता असे २ -२ दिवसांचे प्रवास कोणी करत नाहे म्हणा )
चिउ मस्त वाटतेय पाकृ..... आधी
चिउ मस्त वाटतेय पाकृ..... आधी मी शिर्षक वाचले त्यावेळी वाटले काहीतरी विनोदी लेखन आहे आणि थोडे हसायलापण आले बघ.... पण तुझी पाकृ जरा हटकेच आहे
धन्स ग व्हिनस इतक्या पटकन
धन्स ग व्हिनस इतक्या पटकन दिलेल्या प्रतिसादासाठी
बटाटा आनि लोणच्याचा
बटाटा आनि लोणच्याचा खार...दोन्ही आवडत्या गोष्टी ... नक्की करुन पाहेन
वा! यम्मी!!
वा! यम्मी!!
स्स्स्स्स्स......तोंपासु
स्स्स्स्स्स......तोंपासु !
बटाटा कुठल्याही रूपात आवडतो. त्यामुळे नक्की करून बघणार.
(खरंतर तळातळी नको वाटते, पण तुम्ही टाकलेला फोटो पाहून मोह आवरणं कठीण आहे :))
छान आहे प्रकार हा !
छान आहे प्रकार हा !
धन्स अनु, ओवी, रुणुझुणु,
धन्स अनु, ओवी, रुणुझुणु, दिनेशदा
खरच करुन पहा फार मस्त चव असते याची .
भन्नाट फोटो! एकदम मस्त दिसतेय
भन्नाट फोटो!
एकदम मस्त दिसतेय ही डिश
चिऊ, बटाटा काय सुंदर सोनेरी
चिऊ, बटाटा काय सुंदर सोनेरी तळलायस. अतिशय सुरेख दिसतेय पाकृ
मस्त
मस्त
मस्त आहे आणि सोपी पण
मस्त आहे आणि सोपी पण वाटतेय.... नक्की करुन बघीन.
मस्त पाकृ. लेकाला बटाटा आवडतो
मस्त पाकृ. लेकाला बटाटा आवडतो त्यामुळे नक्की करुन पाहण्यात येणार!
भारीय रेसिपी! ट्राय करून
भारीय रेसिपी!
ट्राय करून पहावी!
थँक्यु सगळे.. मंजुडी, दक्षिणा
थँक्यु सगळे.. मंजुडी, दक्षिणा चैताली
मंजु, प्रिती, कृष्णा छान तर आहेच शिवाय फार पटकनही होते.. आणि घरी पण सर्वांना आवडेल, विशेष: लहान मुलांना फारच. माझ्या भाच्यालासुधा हे लोणचे फार आवडते.
बटाटा म्हणजे जीव की
बटाटा म्हणजे जीव की प्राण.
काहीही बनवा आपल्याला आवडेल.
बाकी तुमची पाकृ मस्त आहे
खरचंच फोटो तोंपासू आहे...
खरचंच फोटो तोंपासू आहे...:)
फोटो आणि रेसिपी छान आहे .. हे
फोटो आणि रेसिपी छान आहे .. हे बटाट्याच्या लोणच्यापेक्षा "अचारी आलू" या प्रकारात मोडेल असं वाटतंय ..
आसामी, नेपाळी, बेंगाली असे
आसामी, नेपाळी, बेंगाली असे वरचे लोणचे करतात. माझ्या साबा करतात त्यात काळे तीळ व लिंबाचा रस घालतात. (बॉंग पद्धतीने) करतात त्यात उकडलेला बटाटा, भाजलेले काळे तीळ कुटून व लिंबाचा रस व मग त्यावर ठेचलेली झणझणीत हिरवी मिरची,लसूण फक्त तेलात तळून घालतात.
एकदम तोंपासु रेसिपी आणि फोटो
एकदम तोंपासु रेसिपी आणि फोटो
मस्तय रेसिपी फोटो एकदम
मस्तय रेसिपी फोटो एकदम तोंपासु!!!
किती सोप्पी आहे.. धन्स चिऊ..
किती सोप्पी आहे..
धन्स चिऊ..
फोटो मस्तच आलाय. जास्त
फोटो मस्तच आलाय.
जास्त प्रमाणात केले, तर बटाट्याची वेगळ्या पद्धतीची भाजी म्हणूनही चालेल
परत एकदा सगळ्याना धन्स.
परत एकदा सगळ्याना धन्स.
झंपी, तुमची पण पद्धत वेगळी आहे, कधीतरी करुन पाहिन.
हो पोर्णिमा, खरतर लोणच असल तरी खाताना मात्र सगळे भाजीच्या प्रमाणातच खातात.
मस्त मी हीच रेसिपी शोधत होते.
मस्त मी हीच रेसिपी शोधत होते. ठाण्यात गोखल्यांकडे [मंगल आहार] मिळतं हे पण ते त्याला लोणच नाही म्हण्त् भाजी म्हणतात. फारच मस्त लागतं चवीलाही.
धन्यवाद चिऊताई
लोणच्याचा खार नाही आहे
लोणच्याचा खार नाही आहे जास्तिचा. पण लोणच्याचा मसाला आहे. तो वापारुन करता येइल का?
उकडलेले बटाटे न तळता थोड्याशा
उकडलेले बटाटे न तळता थोड्याशा तेलात तांबूस परतून वरील कृतीने छान चवीचे लोणचे / भाजी झाली. तळल्याने खमंगपणा अजून वाढला असता, पण हरकत नाही. लोणच्याची चव छानच लागत होती.
मधुरा, मसाला वापरुन केली
मधुरा, मसाला वापरुन केली नाहिये कधी पण खार सुद्धा जास्त लागत नाही.. अगदी एखदा चमचा खार सुद्धा पुरतो. आणि लोणच कोणतही चालत, कैरीच, लिंबाच किंवा अगदी मिरचीच सुधा
धन्यवाद हेकायनितेकाय आणि अरुन्धती ताई
उकडलेली अंडी तळून घ्यायची का?
उकडलेली अंडी तळून घ्यायची का?
तळुन नाही पण थोड्या तेलात
तळुन नाही पण थोड्या तेलात परतुन घ्यायची. सॉरी प्रतिसादाला थोडा उशीरच झाला.