Submitted by दाद on 9 August, 2012 - 00:37
प्रत्येक कहाणी स्वप्नासारखी,
कुठेतरी सुरू व्हायची अन कुठेतरी संपायचीच!
डोळ्यात सुरू होऊन कवितेत
किंवा कवितेत सुरू होऊन डोळ्यात!
पण स्वप्नं काचेचीच शेवटी, राजा
डोळ्यांना काय, कवितेला काय
.......फुटली की खुपतातच!
-- शलाका
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा... आवडली...
वा... आवडली...
सुंदर, मनमोहक, भावपुर्ण कविता
सुंदर, मनमोहक, भावपुर्ण कविता !!..............
सुरेख.... पण स्वप्नं काचेचीच
सुरेख....
पण स्वप्नं काचेचीच शेवटी, राजा
डोळ्यांना काय, कवितेला काय
.......फुटली की खुपतातच!
हे सहीच.....
सुंदर ! अगदी नेमक्या आणि
सुंदर ! अगदी नेमक्या आणि मोजक्या शब्दात पोहोचलं सगळं.
(सध्या कविता वाचायचं बंद करूनही तुमचं नाव दिसल्यावर न राहवून उघडली....आणि खूप दिवसांनी छान कविता वाचल्याचं समाधान मिळालं :))
छान!! पण संपतेच का कहाणी
छान!! पण संपतेच का कहाणी खरेच?
वा! सध्या जुन्या माबो च्या
वा! सध्या जुन्या माबो च्या नॉस्टेल्जियात आहे. त्यात तुझी कविता..
लिहीत रहा गं..
वा .....
वा .....
धन्यवाद... (रुणुझुणू
धन्यवाद... (रुणुझुणू )
अमेलिया, खरय... कहाणी खरतर संपते ह्याला संदर्भ असतो... कुठेतरी, कुणासाठीतरी, कधीतरी. त्या संदर्भाविना कहाणी चालूच की. माझ्यासाठी संपलीतरी जगासाठी कदाचित अजूनही चालूच.
किंवा कवितेत सुरू होऊन
किंवा कवितेत सुरू होऊन डोळ्यात!<<< ही ओळ फार सुंदर वाटली
अमेलियांचा प्रश्नही दिलचस्प वाटला
छानच.
छानच.
छान विचार मांडलाय..... पण
छान विचार मांडलाय..... पण नेमकी 'गोंदवण' आताच वाचल्याने अकारण तुलना होऊन ही रचना दोन नं वर गेली (माझ्या मनात)....
डोळ्यात सुरू होऊन
डोळ्यात सुरू होऊन कवितेत
किंवा कवितेत सुरू होऊन डोळ्यात!
छोटीशीच पण प्रचंड अर्थपुर्ण..
छोटीशीच पण प्रचंड अर्थपुर्ण.. आणि वास्तविक.
स्वप्नांचं तुटणं, ती अर्ध्यात
स्वप्नांचं तुटणं, ती अर्ध्यात मोडणं ,त्यांच विखूरणं ऐकलयं, !
स्वप्न फुटणे हा प्रयोग पहिल्यांदा वाचलाय चू भू दे घे
आशय आवडलाच, दाद
ह्या कवितेतली "स्वप्नं
ह्या कवितेतली "स्वप्नं काचेचीच"... म्हणून'च' फुटणं.
काचतरी काय भंगच पावते... अगदीच मोठा आघात असेल तर मग विखुरतेही... स्वप्नासारखीच.
पुन्हा एकदा आभार, सगळ्यांचे
सुरेख..
सुरेख..
छान आशय. कविता
छान आशय. कविता आवडली.
शेवटच्या ३ ओळी खास.
----------------------------------------------------------------------
प्रथम मीदेखील फुटणं शब्दाबद्दल साशंक होतो.
पण, फुटणं हे क्रीयापद काचेकरता वापरलं गेल्याचं
ध्यानात आलं आणि शब्दार्थाकडून परत आशयाकडे
खेचला गेलो.
गुलजारांच्या काँच के ख्वाब
गुलजारांच्या
काँच के ख्वाब है, आँखों में चुभ जायेंगे
पलकों में लेना इन्हें, आँखों में रुत जायेंगे
या ओळी आठवल्या एकदम !
डोळ्यात सुरू होऊन कवितेत
किंवा कवितेत सुरू होऊन डोळ्यात! << सह्ही ! सह्ही ! सह्ही !
हम्म!... खरंय
हम्म!... खरंय
व्वाह!!! एक नंबर आवडली
व्वाह!!! एक नंबर आवडली
स्वप्नांच्या तुटण्याचा आवाज
स्वप्नांच्या तुटण्याचा आवाज होत नाही...
अतिशय सुंदर. आवडलीच.
डोळ्यात सुरू होऊन
डोळ्यात सुरू होऊन कवितेत
किंवा कवितेत सुरू होऊन डोळ्यात! >>>
आहाहा! क्या बात!
छानच!
छानच!
वाह! मोजके शब्द, अतिशय
वाह! मोजके शब्द, अतिशय प्रभावी मांडणी!
सुंदर........ <<शेवटच्या ३
सुंदर........
<<शेवटच्या ३ ओळी खास. >> +१
डोळ्यात सुरू होऊन
डोळ्यात सुरू होऊन कवितेत
किंवा कवितेत सुरू होऊन डोळ्यात!
>>>
आहाहा!
क्या बात!
Hats off!
छान... आशय आवडला
छान... आशय आवडला
कहाणी खरतर संपते ह्याला
कहाणी खरतर संपते ह्याला संदर्भ असतो..
>> + १
कहाणी आवडली
फारच सुंदर आणि मितुल्या
फारच सुंदर आणि मितुल्या शब्दात मांडलेली............