भिजवून थोडे मोड आलेले मसूर एक वाटी
सुके खोबरे किसून पाव वाटी
कांदे ४
तेल ४ चमचे
तिखट १ चमचा
हळद १/४ चमचा
हिंग चिमूटभर
धणे १ चमचा
दालचिनीचे एक इंचाचे तीन तुकडे
लसून ५ पाकळ्या
आलं अगदी छोटा तुकडा
कोथिंबीर
चिंच २ बुटुक
मीठ चवीपुरते
मसूर आधल्या दिवशी ४ वाजता भिजत घालावेत. रात्री उपसून फडक्यात बांधून ठेवावेत. सकाळी निवडून घ्यावेत.
३ कांदे उभे चिरून घ्यावेत. १ कांदा बारीक चिरून घ्यावा.
तळके वाटण * : कढई तापवावी. त्यात उभा चिरलेला कांदा टाकावा. थोडा परतला की १ चमचा तेल टाकून परतावा. त्यात आलं, लसूण चिरून टाकावा. १ चमचा धणे टाका. १ दालचिनीचा तुकडा टाका. चांगला ब्राऊन रंग होई पर्यंत परता. मिक्सरमध्ये हे सर्व काढून घ्या.
आता कढईत सुक्या खोब-याचा किस घाला. मंद आचेवर चांगला लाल होऊ द्या. हेही मिक्सरम्ध्ये घ्या. कोथिंबीरीतला एक हिस्सा यात टाका. आता मिक्सरवर हे वाटण अगदी उगाळलेल्या चंदनसारखे गुळगुळीत वाटून घ्या.
आमटी :
मोठ्या भांड्यात तीन चमचे तेल तापत ठेवा. त्यात दालचिनीचे २ तुकडे टाका. हिंग टाका. गॅस बारीक करून हळद, तिखट आणि १/२ हिस्सा कोथिंबीर घाला. लगेच कांदा घाला. कांदा थोडा परतला, त्याचा रंग बदलला की मसूर घाला. परता. तेल सुटू लागले की त्यात वरचे तळके वाटण टाका. परता. पाणी घालण्याची अजिबात घाई करू नका. ८-१० मिनिटे बारीक गॅसवर परतत रहा. मिश्रण तेल सोडू लागले, रंग ब्राऊन झाला की त्यात आवश्यक तेव्हढे पाणी घाला. आता गॅस मोठा करा. एक उकळी आली की गॅस बारी करून झाकण ठेऊन ५ मिनिटे शिजवा. भरपूर परतले असल्याने ५ मिनिटात मसूर शिजतात.
आता झाकण काढून मसूर शिजला आहे ना हे तपासा. आता त्यात चवीपुरते मीठ टाका, २ बुटुक चिंच टाका. पुन्हा मंद गॅसवर ५ मिनिटे उकलत ठेवा. आता चिंचेची बुटुकं शोधून बाहेर काढा. मग आमटीत उरलेली किथिंबीर घाला. एक उकळी आली की गॅस बंद करा. तयार आहे मसूरची आमटी उर्फ व्हेज मटण.
१. तळके वाटण ही सीकेप्यांची खासियत. प्रत्येक पदार्थानुसार यातले घटक काही प्रमाणात बदलतात. जेसे मटण असेल तर आलं, लसून जास्ती घेतले जाते शिवाय लवंग्-दालचिनी-मिरे अॅड होतात. मूगाचे बिरडे असेल तर आलं, गरम मसाला वगळले जातात, मसूराच्या आमटीला आलं-लसून दोन्ही कमी केले जातात, त्यात दालचिनी अॅड केली जाते, इ...
२. ही आमटी आंबोळ्यांबरोबर फर्मास लागते. तेव्हामात्र आमटीमध्ये पाणी जास्ती घालतात अन तिखटही वाढवतात.
३. वर सांगीतलेली आमटी तांदळाची भाकरी, फुलके, भात या बरोबर मस्त लागते. भात-आमटी, भाजलेला पापड अन लोणचे... वा !
४. श्रावणात आम्हा सीकेप्यांना मटणाचा फार विरह होतो. तो सोसायला ताकद म्हणून हे व्हेज मटण फार फार उपयोगी पडते चव खरोखर मटणासारखी येते. फक्त परतायचा कंटाळा करता कामा नये
धन्स अवलताई, मला ही रेसिपी
धन्स अवलताई, मला ही रेसिपी हवीच होती.... या प्रमाने चवळीची उसळ देखील करु शकतो का?
हो फक्त वाटणात आलं, आणि धणे
हो फक्त वाटणात आलं, आणि धणे नको
अवल, अधिक टिपा अधिक(च)
अवल, अधिक टिपा अधिक(च) पटल्या.
आशू जखमेवर मीठ ना
आशू जखमेवर मीठ ना
स्लर्रर्रर्प....
स्लर्रर्रर्प....
मस्त आहे. माझा नवरा फक्त
मस्त आहे. माझा नवरा फक्त कडधान्य खातो. त्याला नक्की आवडेल.
मस्त! टिपीकल आणि अतिशय चविष्ट
मस्त! टिपीकल आणि अतिशय चविष्ट असा सीकेपी पदार्थ
(पण एक वाटी मसूर आणि चार कांदे म्हणजे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्यांचा मसाला )
अवल.. अतिशय तोंपासुये
अवल.. अतिशय तोंपासुये रेस्पी..
मंजूडी
मस्त रेसिपी. मंजूडी
मस्त रेसिपी.
मंजूडी
प्रचि तुफान आहे ते
प्रचि तुफान आहे ते शेवटचे
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
मसूराची आमटी आमच्याकडे प्रिय
मसूराची आमटी आमच्याकडे प्रिय आहे. आता या पद्धतीने करून बघायला हवी. फक्त तो मसाला परतणे प्रकार मात्र लैच वेळखाऊ व पेशन्सचा असतो.
चला श्रावण पाळायची गरज नाहि
चला श्रावण पाळायची गरज नाहि आता
अवल, माझे बालपण शेजारच्या
अवल, माझे बालपण शेजारच्या गुप्ते काकूंच्या हातचे असे पदार्थ खाण्यात गेले. त्यांची आठवण झाली.
मंजूडी, सीकेपी पादर्थ असेच
मंजूडी, सीकेपी पादर्थ असेच आहेत बरेच. अगदी 'यु हिट द नेल"
दिनेशदा
अवल, कधी येउ खायला ?
अवल, कधी येउ खायला ?
ये, तयार आहे सकाळी एक
ये, तयार आहे
सकाळी एक मैत्रिण लेकीला घेऊन आली होती. रात्री आईला सांग तुला घेउन यायला. मला बोनसच बोनस मग
आम्ही चिंचेऐवजी आमसूल घालतो.
आम्ही चिंचेऐवजी आमसूल घालतो. चवीला थोडा गूळही घालतो. आणि मसाल्यात बडिशेप पाहिजे.
जुन्या माबोत इथे पर्टुने लिहिलेली आहे तशी. पण मी फोडणीत मोहरी-जिरे घालत नाही -
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/619.html?1190359712
अवल, मस्त रेसिपी
अवल, मस्त रेसिपी
छान रेसिपी. अवल श्रावण निघत
छान रेसिपी.
अवल श्रावण निघत नाही का ग ?
हो गं जागू :_( त्यातून मधेच
हो गं जागू :_( त्यातून मधेच तुझ्या माशाच्या रेसिपीज
दिसतात मग अशी दुधाची तहान ...
लोला, नाही गं, मी गूळ नाही घालत यात. तसं केलं तर मग ते व्हेज पारशी मटण होइल ना
डबल पोस्ट
डबल पोस्ट
होस्टेलच्या डब्यातली लडकत
होस्टेलच्या डब्यातली लडकत मावशी यांची मसूरची उसळ आठवली, अन ड्वाले पाणावले. पोट खळबळले..
पाकृ साधारणतः अशी असे:
वाढणी प्रमाण : ५० डबे.
लागणारे जिन्नस:
निवडल्यासारखं केलेले मसूर एक वाटी
सुके खोबरे किसून पाव वाटी (खोबर्याची पाव वाटी. पाव वाटी भरून नव्हे.
कांदे १
तेल ४ चमचे (चहाचे)
तिखट १ चमचा
हळद १/४ चमचा
हिंग चिमूटभर
धणे १ चमचा
लसून ५ पाकळ्या
आलं अगदी छोटा तुकडा
मीठ चवीपुरते
२ चहाचे चमचे तेलात फोडणी करून त्यात पाणी घालून मसूर घालून उकळावेत.
पाण्याचे प्रमाण ५० लोक जेवतील इतके करावे.
तयार झालेली उकळ ५० डब्यांत भरावी.
आता २ चमचे तेलात १क चमचा तिखट गरम करावे. हे लाल रंगाचे तेल एका छोट्या वाटीत भरून घ्यावे. मग एक चहाचा चमचा, या तेलात उभा बुडवून मग तो अनुक्रमाने एकेका डब्यात बुचकळून हलवावा. याने थोडा लाल तवंग येऊन मसालेदार तर्रीमार उसळ असल्याचा आभास उत्पन्न होतो.
***
होस्टेलला हेच प्रकरण ढेकणांची उसळ म्हणून फेमस होते.
इब्लिस, नवर्याच्या मेसमधली
इब्लिस,
नवर्याच्या मेसमधली दोडक्याची पाणीssssदार भाजीही अशीच तयार होत असणार.
रेसिपी चांगली आहे अवल. का कोण जाणे आमच्याकडे मसूर आणले/केले जातच नाहीत अजिबात.
रेसिपी चांगली आहे .. एक शंका
रेसिपी चांगली आहे ..
एक शंका .. कोथींबीर अशी फोडणीत घालून भरपूर शिजवल्याने त्याची चव/वास/फ्लेवर जात नाही का? ह्या रेसिपीबद्दलच असं नाही पण ज्या ज्या रेसिपीत कोथींबीर अशी फोडणीत घालून भरपूर शिजवायची असते त्याबद्दल मला हा प्रश्न पडतो .. किंवा मग अशी फोडणीत कोथींबीर घालण्याचं प्रयोजन नक्की काय?
फोडणीत कोथिंबीर टाकल्यावर
फोडणीत कोथिंबीर टाकल्यावर भारी स्वाद लागतो, सशल.
सांबार्-आमटी करताना कधीतरी ट्राय कर.
>> फोडणीत कोथिंबीर टाकल्यावर
>> फोडणीत कोथिंबीर टाकल्यावर भारी स्वाद लागतो, सशल.
हे मला माहितच नव्हतं .. नक्की ट्राय करेन ..
आतापर्यंत मी फक्त कोथींबीर वडीसाठी अशी फोडणीत भरपूर कोथींबीर घातलेली आहे पण त्यात कोथींबीरीचं इतकं डॉमिनेशन असतं की ही शंका आली नाही ..
बेटर येट, कोथिंबीर निवडतांना
बेटर येट, कोथिंबीर निवडतांना देठी (कोवळी देठं) टाकायच्या नाहीत. त्या बारीक चिरून फोडणीत घालायच्या. आणि पानं चिरून वरून घालायची. त्याने स्वादही मस्त येतो आणि पानांतलं (अ?) जीवनसत्त्वही नाश पावत नाही.
रेसीपी वाचुन डोळ्या समोर
रेसीपी वाचुन डोळ्या समोर फिरायला लागली आहे , लवकर च करुन बघते.
स्वाती, (मला नेहेमीप्रमाणे
स्वाती,
(मला नेहेमीप्रमाणे काहितरी आठवलं ह्यावरून आणि शेअर केल्याशिवाय रहावत नाहीये .. :D)
कोथींबीर निवडायला बसलं की माझी आजी कायम एक वाक्य नेहेमी म्हणायची .. कोथींबीरी ची देठं टाकून देऊ नका .. त्याची छानशी मोळी करून आमटी उकळताना टाका, छान स्वाद येईल .. हे अगदी दर वेळेला म्हणायची पण ना कधी तीने स्वतः मोळी बंधून आमटीत टाकली ना आम्ही .. )
मस्त रेसिपी आणि तोंपासु फोटो
मस्त रेसिपी आणि तोंपासु फोटो
पण ही चटपटीत वाटण लावलेली उसळच. व्हेज मटण म्हणून नाही खाऊ शकणार. कच्च्या फणसाची अशी करी केली तर खाऊ शकेन कदाचित व्हेज मटण म्हणून
Pages