निरोप
येते म्यां जाऊन
तंवर नीट र्हावा
गप्पागोष्टी करताल
माजीबी याद काडा
*
दूरची हाय वाट
चाल व्हनार इक्ती
कुडी अक्षी गळनार
मन भिर्र पाखरावानी!
*
आन्भव जगायेगळे
पदरी मीबी बांदीन
सूर्य बगीन, चंद्र बगीन
आभाळ माथा धरीन
*
आसंल कदी चांदनी
सोबतीला येकुलती
वाटंल तिला बगून
कश्शी माझ्याच लेकीवानी!
*
गोळा करीन आटवनी
आन् गठुडं त्येंचं बांदीन
न्हेमीच जपीन मनात
मपली शिरीमंतीची लेनी
*
वाट चालता चालता
दिस सरुन जात्याल
मुक्कामाला सोबतीनं
अल्लाद आनून सोडत्याल
*
जसा सरंल प्रवास
समदं रितं रितं वाटंल
धा दिशांमदून कसा
बांध मनाचा फुटंल
*
पुन्ना कधी, केव्हा, कुटं
बगायाला ह्ये गावंल?
परतताना नगाधिराजाला
साकडं मग मी घालंल
*
येऊ दे की रं मला
वर्साला दर येकदा तरी
काळजात साठवीन तुला
मन व्हईल समाधानी
*
तर, भ्येटूच आपन लौकर
ती खात्री हायेच मला
आले की उलगडीन
निसर्गाअंगीच्या कळा
*
आता घेईन रजा
मागून येक मागनं
यारी दोस्ती इसरु नगा
आपुलकीचं लेनं
मस्त लिहिलं आहे...
मस्त लिहिलं आहे...
सुंदर
सुंदर
मस्तच. निसर्गाअंगीच्या कळा
मस्तच.
निसर्गाअंगीच्या कळा बघण्यास आम्ही सुद्धा उत्सुक आहोत
खूप मनापासून लिहीलेयस..
खूप मनापासून लिहीलेयस.. मस्तच..
आई ग्ग! कस्ले गोड लिहिलेय...
आई ग्ग! कस्ले गोड लिहिलेय... खूपच मस्त!
मस्तच ! खुप छान लिहिलंयस.
मस्तच ! खुप छान लिहिलंयस.
आवो जावा निवांत हिकडे सरवे
आवो जावा निवांत
हिकडे सरवे त्येच
वळुन बी बगु नगा
कायला हवे पेच ?
औंदा आमी न्हाई
याद यीलच मोप
सटवाय लिव्हुन गेली
परतेक भाळी जपताप
औंदा आमी न्हाई
याद यीलच थोडी
पहिलुन पडली नव्ह का
दुरपदीची कुडी
हा टीपी होता.
बाकी संदीप म्हणतो तसे' कळते की गेली वेळ, ना आता सुटणे हात, अपुल्याच मनातील स्वप्नें, घेऊन मिटावी मूठ' (हे शिरेस !!)
सगळे शब्द काही कळले नाहीत पण
सगळे शब्द काही कळले नाहीत पण जेवढी समजली तेवढी भयंकर गोड आहे कविता. कदाचित अशा भाषेत आहे म्हणुन जास्तच गोड वाटली.
मस्त आवडली
मस्त आवडली
शैलजा मस्त! रैना पण मस्त!
शैलजा मस्त!
रैना पण मस्त!
शैलजा मस्तच.. <<गोळा करीन
शैलजा मस्तच..
<<गोळा करीन आटवनी
आन् गठुडं त्येंचं बांदीन
न्हेमीच जपीन मनात
मपली शितिमंतीची लेनी>> छान वाटलं कडवं
धन्यवाद रैना, भा पो.
धन्यवाद
रैना, भा पो.
किती गोड!
किती गोड!
मस्त! तिकडच्या कवितापण ऐकवा
मस्त! तिकडच्या कवितापण ऐकवा बर्का
तुपली कविता मपल्याला मोप
तुपली कविता मपल्याला मोप आवडली बग शैलजा.
'नगाधिराजाला' भेटायला म्हणजे
'नगाधिराजाला' भेटायला म्हणजे हिमालयातच ना का मानस सरोवर ?
प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.......
मानस सरोवर नाही इतक्यात. ते
मानस सरोवर नाही इतक्यात. ते कधी करता येईल काय ठाऊक.
हो, हो श्यामले
छानच ग. भा पो अगदी.
छानच ग.
भा पो अगदी.