न्यूटन, स्टिफन हॉकिंग, बेअर्ड, ग्रॅहॅम बेल, मॅक्सवेल, डार्विन या सारख्या शास्त्रज्ञांचा, शॅकल्टन, कॅप्टन कुक सारख्या धाडशी माणसांचा व चॅप्लिन, ज्युली अँड्र्यूज सारख्या अभिनेत्यांचा इंग्लंड हा देश असल्यामुळे मला इंग्लंड मधे यायच्या आधी आणि आल्यानंतर काही दिवस इथल्या प्रत्येक माणसाबद्दल प्रचंड आदर वगैरे वाटायचा. इथले सर्व लोक प्रचंड हुशार, कामसू व प्रामाणिक असतील हा गैरसमज त्यातूनच झालेला!
नंतर ऑफिसातल्या लोकांचं वर्तन, पेपरातल्या बातम्या, टाटांनी मारलेली चपराक पहाता इतकं समजलं की मोजके लोक सोडता बाकीचे कामाच्या नावाखाली टाईमपासच करीत असतात. तसं हे विशेष नाही कारण जगात सगळीकडे साधारण अशीच परिस्थिती आहे.
मग विशेष काय आहे? विशेष आहे तो एक ऐतखाऊ कामचुकार समाज! या समाजातले लोक पिढ्यान पिढ्या काम न करता, आयुष्यभर शिट्ट्या मारत आरामात फिरतात. ते सगळे लोक म्युन्सिपाल्टीने दिलेल्या घरात रहातात. अशी घरं पुरविण्याचा म्युन्सिपाल्टींचा खर्च वर्षाला सुमारे २१ बिल्यन पौंड (१६८ हजार कोटी रुपये (१)) आहे. एक सहा मुलांची अविवाहीत आई महिन्याला सुमारे साडेपाच लाख रुपये भाड्याच्या व सुमारे १६ कोटी रुपयांच्या अलिशान घरात रहाते. इथे अजून अशीच उदाहरणं वाचायला मिळतील. हे सगळे पैसे अर्थातच करदात्यांच्या खिशातून येतात. नोकरदार सामान्य माणूस असली घरं फक्त स्वप्नातच बघू शकतो. त्यामुळेच आपण भरलेल्या करांवर आपल्याला न परवडणार्या घरात हे ऐतखाऊ आनंदाने रहाताना बघून त्याचा किती संताप होईल त्याची कल्पनाच केलेली बरी!
हे लोक तर्हेतर्हेच्या सरकारी भत्त्यांवर जगतात, म्हणूनच मी त्यांना भत्ताचारी म्हणतो. वरती दिला आहे तो घरभत्ता! असाच बेकारभत्ता पण असतो. बेकारभत्ता बहुतेक सगळ्या पाश्चात्य देशात मिळतो, पण इथले लोक बेकारभत्ता चालू ठेवण्यासाठी काहीना काही कारणाखाली देऊ केलेलं काम करायचं टाळतात. सध्या २५ वर्षाच्या खालच्या लोकांना आठवड्याला सुमारे साडेचार हजार रुपये तर २५च्या वरती सुमारे साडेपाच हजार रुपये इतका बेकारभत्ता आहे.
शिवाय 'मूल भत्ता' म्हणून एक भत्ता पण असतो. पैशाविना मुलांच्या काळजीत कमी पडू नये या उदात्त हेतुने तो देण्यात येतो. मूल १६ वर्षांचं होईपर्यंत तो मिळतो. पहिल्या मुलासाठी आठवड्याला सुमारे १६०० रुपये तर पुढच्या प्रत्येक मुलासाठी आठवड्याला सुमारे ११०० रुपये इतका तो आहे. साहजिकच या लोकांचा कल जास्त मुलं पैदा करण्याकडे असतो. या शिवाय गर्भारपणात स्वतःची आणि बाळाची काळजी घेण्यासाठी वेगळे पैसे मिळतात. इथल्या सरकारनेच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार १० पोरं असलेलं कुटुंब वर्षाला सुमारे ४८ लाखांपेक्षा जास्त रुपये विविध भत्त्यांपोटी कमवू शकतात.
नंतर येतो तो 'अक्षमता भत्ता' म्हणजे जे लोक काही कारणामुळे काम करण्यास असमर्थ आहेत अशा लोकांना दिलेला भत्ता! थापा मारून याचाही लोक फायदा घेतात. एक बाई आपल्याला क्रचेस घेतल्याशिवाय चालताच येत नाही आणि १० मीटर चालल्यावर प्रचंड वेदना होतात अशा बंडला मारून तो भत्ता घेत होती. रोलरकोस्टरची राईड घेतानाचे तिचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर तिला मिळालेले पैसे परत करायला लागले.
बाकी रहातो तो वेळी अवेळी लागणारा डॉक्टरांचा व औषधपाण्याचा खर्च! इंग्लंड मधे रहाणार्या सर्वांना डॉक्टरांचा काहीही खर्च नाही. औषधपाण्याचा खर्च (डॉक्टरांनी काही प्रिस्क्रिप्शन दिलं तर) एका विशिष्ट आकड्याच्या (सुमारे ६०० रुपये) पुढे कधीच जात नाही.. मग ते औषध कितीही महाग असो. गर्भार बायका, साठीच्या पुढचे म्हातारे, १८ वर्षाच्या आतील मुलं अशांना ते फुकट मिळतं. पण बेकारभत्ता मिळणार्यांना देखील ते फुकटच आहे.
असे ऐषोआरामी लोक दिवसभर काय करणार? चकाट्या पिटणे, ड्रग्ज व दारु झोकून दंगामस्ती करणे या शिवाय दुसरं काय? फावल्या वेळात चुकार पोरंपोरीं पोरं पैदा करण्याचं उदात्त कार्य करतात! अनुज बिडवेचा खुनी, कियारन स्टेपलटन हाही अशाच कुटुंबातला एक बेकार तरुण! तो धरून एकूण सहा भावंडं आहेत. आई वडील आणि पोरं म्युन्सिपाल्टिने दिलेल्या घरात रहातात. जवळपास त्यांचे इतर नातेवाईक रहातात. त्या सगळ्यांपैकी कुणीच फारसं कामबिम कधी केलेलं नाही.
तो स्वतःला सायको किलर म्हणवतो. पोलिसांना व कोर्टाला खून करण्यामागे काही विवक्षित प्रेरणा, उद्देश, द्वेष, जातीय द्वेष, गरीबी असं काहीही आढळून आलेलं नाही. केवळ चीप थ्रिल मिळविण्यासाठी केलेला एक निरर्थक खून! त्यानं अनुजला का मारलं याचं उत्तर त्यानं कोर्टात 'आय ऑनेस्टली डोन्ट नो' असं दिलं आहे.
या वरून काही चांगल्या उद्देशाने केलेल्या कायद्याचं पर्यवसान समाजकंटक निर्माण करण्यात होऊ शकतं हे मात्र दिसून येतं.
त्यातली जमेची बाजू इतकीच की स्टेपलटनला पकडणे, खटला उभा करून, सुनावणी होऊन जन्मठेपेची शिक्षा फर्मावणे हे सगळं अवघ्या ७ महिन्यात उरकलं. त्याबद्दल मला तरी ब्रिटिश पोलिसांचं आणि न्यायसंस्थेचं कौतुक वाटतं.
(१) एक पौंड = सुमारे ८० रुपये असा सध्याचा भाव आहे.
=== समाप्त ===
चांगली माहिती. आपल्याकडे हे
चांगली माहिती. आपल्याकडे हे भत्ते कधी सुरु होणार ?
तुमचं नाव बघून उगाच वाटलं की
तुमचं नाव बघून उगाच वाटलं की विनोदी धागा असावा. म्हणून अपेक्षेनी उघडला. त्यामुळे कळेना की हे विनोदी तर नाहीये, मग विनोदी लेखनात का टाकलंय?
खरंय चिमण. माझी एक मैत्रीण
खरंय चिमण.
माझी एक मैत्रीण थेल्मा प्राथमिक शाळेतील शिक्षिका म्हणून निवृत्त झाली. तर तिच्या निवृत्तीवेतनात परवडेल अश्या वृद्धाश्रमात रहायला गेली. (तो छानच आहे असे मला वाटते.) तिथे जवळच एक कौन्सिल एस्टेट आहे. एकदम टुमदार घरे. तिथली कधी काम न केलेली माणसे पाहून थेल्माला जोरदार संताप येत असे.
आणखी एका मैत्रिणीचे मत मात्र, आपण या लोकांना थोडे फार पैसे देऊन गप्प ठेवतो, नाहीतर ते सगळे गुन्हेगार झाले असते असे आहे. तिच्यामते बेकारीभत्त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे.
हे एक दुष्ट्चक्र आहे,
हे एक दुष्ट्चक्र आहे, इमानेइतबारे नोकरी करणार्या माणसाच्या हातात टॅक्स बिक्स जाउन भत्ताचारी माणसापेक्षा कमी पैसे येतात. त्यामुळे सामान्य माणसाला नोकरी / व्यवसाय करण्यासाठी मोटिव्हेशनच नाहीये.
१६ - १७ वर्षांच्या मुली शिक्षण वगैरे सोडून इतक्या लहान वयात आया बनतात...लहान मुल त्यामुळे शिक्षण / नोकरी करता येत नाही, मुल थोडं मोठं झालं की शिक्षण / कामाचा अनुभव नसल्यामुळं नोकरी मिळत नाही किंवा अतिशय जुजबी पगाराची मिळते. त्यातूनही मुल पाळणाघरात ठेवणं हे प्रकरण प्रचंड महाग आहे . असं असताना भत्ताचारी बनून राहाणं हाच एकमेव बरा मार्ग समोर राहतो .
त्यामुळे एकामागोमाग एक मुलं जन्माला घातली जातात, मुलांवरसुद्धा वाईट परिणाम होतो आणि हे चक्र कायम सुरूच राहतं.
मला खरोखर दया येते त्यांची (विशेषत: मुलींची).
ब्रिटिश लोकांचा मला खटकलेला (अव)गुण म्हण्जे 'रूटिन' / जे लिहिलय त्याची डोळे झाकून अंमलबजावणी...अजिबात विचार न करता, केस बाय केस विचारच करत नाहीत इकडे.
(मी राहते तिथली मोठी मोठी ७० / ८० वर्षांची झाडं त्यांची छोटी बोरा एव्ह्डी फळं खाली पडतात ( जर कोणाच्या डोक्यात पडून खोक पडली तर या कारणासाठी..) म्हणून तोडून टाकली म्युन्सिपाल्टीनं )
बापरे हे भयानकच आहे.
बापरे हे भयानकच आहे.
(No subject)
अरे चिमण उसगावात पण तीच
अरे चिमण उसगावात पण तीच स्थिती आहे.
आम्ही २००५ मध्ये साडे तीन लाख डॉलर्स ला घर घेतले. आमच्या शेजार्यांनी २००४ मध्ये जागा तीन लाख बारा हजारला घेतली होती. आमचे घर अप्रेझ झाल्यावर त्यांनी घरावर अजुन लोन घेतले.
२००७ मध्ये घरान्च्या किमती पडु लागल्या. २००८ पासुन (ही शेजारीण नर्स आहे) या शेजारणीने आपल्या कामाचे तास कमी करुन घेतले आणि पैसे भरता येत नाही असे सांगुन लोनच्या इन्स्टॉलमेन्ट द्यायचे थांबविले. २००९ला मुलाच्या नावावर दुसरी जागा घेतली (अलस्काला क्रुझ केली) आणि तिथे रहायला केले.
एवढेच नाही तर बॅन्केला पैसे न देता घरात भाडेकरु ठेउन भाडे मात्र वसुल करत होते. २०११ पर्यंत कर्जमाफी झाली. एवढेच नव्हे तर त्यावर न दिलेल्या इन्टरेस्टवर त्यांना टॅक्स डिडक्शन पण मिळाले.
आता घरान्च्या किमती दीढलाखच्या आस्पास आहेत. बर्याच लोकांनी अॅप्रिशिएशन्स्च्या काळात त्यांचा ATM सारखा वापर करुन मजा मारली आणि नंतर रोख रकमेत अर्ध्या किमतीत घरे मिळवली. जुन्या कर्जांवर त्यांना सरकाऱकडुन कर्जमाफी मिळाली. जे आपल्यासारखे सरळमार्गी होते त्यांआ मात्र पुर्ण किंमत मोजावी लागली.
असे असले तरी मला सोशालिस्ट अॅप्रोच बरा वाटतो कारण ह्या अशा भत्ताचारी लोकांना नीट ठेवले नाही तर त्यांची व्रुत्ती काही सुधारणार नाही. उद्या ते झोपड्या बांधतील, गुन्हेगारी चालु करतील.
सुधारित समाजात रहाण्यासाठी बेजबाबदार लोकांना दिलेली ही सवलत आहे असे समजावे.
लंडनमध्ये अनेक लोक आहेत ते
लंडनमध्ये अनेक लोक आहेत ते सरकारने दिलेल्या घरात भाडेकरु,पोटभाडेकरु ठेवतात आणि त्या पैशांवर मजा मारत असतात. यात अनेक एशियन्(पाकी, लंकन, बांगलादेशी) अधिक आहेत. निदान मी जिथे राहतो तिथे तरी हीच स्थिती आहे. भारतीयांचे माहित नाही.
एक उदाहरणः एक लंकन गृहस्थ(वय-४०-४५) स्टुडंट विसावर इथे आला. ६ महिन्याने बायको आली. तिने जॉब करुन मुलांना आणण्यासाठी बँकबॅलन्स जमा केला. मग ३ मुलांना आणले. आता त्या गृहस्थाने शिक्षण सोडले कारण काय तर मुलांना पोसु शकत नाही आणि बायको मुले सोडुन कामाला जाऊ शकत नाही.
परत लंकेत जाऊ शकत नाही का तर तिथे तामीळ म्हणून मारुन टाकतील. असायलम विसासाठी अर्ज केलाय. मस्त रोकड मिळतेय आणि ३ बेडरूमचे घरपण.
धन्य या देशाची!!
लेख आवडला .. पण ह्या
लेख आवडला ..
पण ह्या भत्त्यांतून मिळणारे फायदे त्यामुळे उद्भवणार्या तोट्यांशी तुलना केली तर जास्त मोलाचे ठरतात का? ह्याची दुसरी बाजूही नीट पडताळायला हवी असं वाटतं ..
इथे बी तेच! फार मानसिक त्रास
इथे बी तेच!
फार मानसिक त्रास होतो भत्ताचारी बघितले की!
वाडामालकाला ३० - ४० रु भाडं
वाडामालकाला ३० - ४० रु भाडं देऊन रूमसाठी तिथेच राहणारे आणि मुलांच्या नावावर ४० - ५० लाखांचा फ्लॅट घेणारे पण याच वर्गात मोडतात का ?
वाचले. विषय चांगला आहे पण
वाचले. विषय चांगला आहे पण पोस्ट (लेख म्हणु शकत नाही) एकांगी आणि अपुरी वाटली.
कारणमिमांसा आणि काही उपाय, किंवा हे बंद केल्यास होणारे संभाव्य परिणाम यावरही लिहावयास हवे होते असे वाटले.
चांगली माहिती. आपल्याकडे हे
चांगली माहिती. आपल्याकडे हे भत्ते कधी सुरु होणार ?>>>> @ किरण १००% अनुमोदन
भारतात देखिल अशा फुकट्यांची कमतरता नाहिये, पण त्यासाठी 'राजनेता' हे क्वालिफिकेशन असाव लागत
ऐसा भी होता है क्या...
ऐसा भी होता है क्या...
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला,
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गूण लागला... या म्हणी नुसार १५० वर्षांच्या राजवटीनंतर भारतात देखिल असे भत्ताचारी लोक दिसु लागलेत..:)
तिकडे भत्ताचारी इथे
तिकडे भत्ताचारी इथे सत्ताचारी,भ्रत्ताचारी- सगळ्याचा परिणाम एकच
भारतातही असे बरेच भत्ते आहेत.
भारतातही असे बरेच भत्ते आहेत. पण इथे भत्ताचारी संस्कृती लोकप्रिय न होण्यामागे सरकारी वेळ काढू पणा जबाबदार आहे. तसेच भत्त्यातून मिळणारी रक्कम फार कमी असल्यामुळे त्याचा फायदा घेणार्यांची संख्या कमी आहे. त्याच बरोबर अज्ञान, राजकीय हस्तक्षेप इतर मुद्देही आहेत.
भारतात मिळणार्या सुशिक्षीत बेरोजगार भत्त्याच्या सहाय्याने एका व्यक्तीला महिनाच्या चरितार्थ चालवणे अवघड आहे.
भारतात देखिल अशा फुकट्यांची
भारतात देखिल अशा फुकट्यांची कमतरता नाहिये, पण त्यासाठी 'राजनेता' हे क्वालिफिकेशन असाव लागत
>>>>> अगदी बरोबर.
इथे मालदीवमध्ये पण हाच प्रकार
इथे मालदीवमध्ये पण हाच प्रकार आहे. मध्यंतरी इथल्या सरकारने आसनदा नावाची योजना सुरू केली. त्याअंतर्गत प्रत्येक नागरिकाला दवाखान्याचा जेवढा खर्च (व्हिजिट फी, औषधे, तपासण्या, एका बेटावरून राजधानीत रेफर केलं तर विमानखर्च सगळं) येईल तो सगळा सरकार करणार.
समाजाच्या काही घटकांना त्याचा फायदा होतोय. उदा.- वृद्ध माणसे.
पण रिसॉर्टमध्ये काम करून महिन्याला पंधरा हजार युएस डॉलर्स मिळवणारेसुद्धा फुकटात मिळतंय म्हणून अनावश्यक तपासण्या करून घेत आहेत.
बरं, सरकारचा पैसा तरी कुठे स्वतःचा आहे ? आजूबाजूच्या देशांकडून मदत मिळवलेलाच पैसा. भारत पण बरीच मदत देत असतो.
>>एक बाई आपल्याला क्रचेस
>>एक बाई आपल्याला क्रचेस घेतल्याशिवाय चालताच येत नाही आणि १० मीटर चालल्यावर प्रचंड वेदना होतात अशा बंडला मारून तो भत्ता घेत होती. रोलरकोस्टरची राईड घेतानाचे तिचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर तिला मिळालेले पैसे परत करायला लागले.
<<
आप्ल्या इथे आहे तशि कोर्तातून स्टे आणत राहून मरेपर्यम्त भत्ता खाण्याची सोय नाही का तेथे?
>>आपल्याकडे हे भत्ते कधी सुरु होणार ? <<
ते आहेतच. पण मजा मारण्याइतके हवे असतील तर कोठेना कोठे 'निवडून' यावे लागते.
रोचक माहिती आहे ही ! एकंदर या
रोचक माहिती आहे ही !
एकंदर या कायद्यात अनेक लूपहोल्स आहेत असे दिसते. 'अर्पणा' यांनी दिलेले झाड पाडण्याचे उदाहरणही विचित्र आहे. कायदा गाढव असण्याचा यापेक्षा मोठा पुरावा तो काय?
(अवांतर- 'अर्पणा' हा 'अपर्णा'चा टायपो आहे, की हेच सदस्यनाम तुम्हाला अपेक्षित आहे?)
ज्ञानेश : 'अर्पणा' हा
ज्ञानेश : 'अर्पणा' हा 'अपर्णा'चा टायपो नाही, हेच सदस्यनाम अपेक्षित आहे.
जगातल्या सगळ्या अतिरेकी संघटनांचे म्होरके / 'गरजूंना मदत' ह्या नावाखाली पैसे गोळा करणे इथे आहेत.
आत्तापर्यंत ठिक होतं, हे लोकं दुसर्या देशांत खूनखराबा करून इकडे पळून सेटल होत असत. इथल्या नागरिकाशी लग्न केलं की काम अजूनच सोप्प. अगदी इथल्या कोर्टात शिक्षा झालेल्या, भत्ताचारी आणि दुसर्या देशांत कारवाईसाठी हव्या असलेल्या लोकांना सुद्धा तिथलं कोर्ट देहांताची शिक्षा देइल या 'करूण' भावनेनं इथेच ठेवून घेतात. त्यांच्यासाठी ह्युमन राइट्स्वाले जीवाचा आटापिटा करतात.
पण काही दहशत्वादी घटनांनंतर इथल्या नागरिकांचा ह्याला विरोध होउ लागला आहे.
ह्युमन राइट्स वाल्यांची ( वकिल, खूप पैसा आहे ह्यांत ) जबरदस्त लॉबी आहे. तसच म्युन्सिपाल्टीला घरं भाड्यानं देणार्यांचीही खूप वट आहे ( करोडो रूपायांचं घर विकायच नाहीये पण सध्या त्यात रहायचही नाहीये तर म्युन्सिपाल्टी व्यतिरिक्त खात्रीचं दर महिन्याला इतकं महाग भाडं देणारं गिर्हाइक कोणतं ). त्यामुळे नॉटिंग हिल सारख्या भागात एकतर करोडपती नाहीतर भत्ताचारी .
>>आपल्याकडे हे भत्ते कधी सुरु
>>आपल्याकडे हे भत्ते कधी सुरु होणार ? <<
शासनाची श्रावणबाळ नावाची एक योजना आहे, मुले-बाळे हयात नसणारे, अनाथ अशा माता-पित्यांसाठी मासिक रक्कम अशी ही तरतूद आहे, पण प्रत्यक्षात, २-३ धडधाकट मुले असलेली लोकही ह्या योजनेचा फायदा लुटत आहेत. (खेडेगावात माझी आई पोस्ट खात्याची एजंट आहे, ही प्रत्यक्ष पाहिलेली उदाहरणे आहेत). तीच कथा 'संजय गांधी निराधार' योजनेची!
ओह माय गॉड
ओह माय गॉड
इथे जर्मनीत पण हेच आहे. दर
इथे जर्मनीत पण हेच आहे. दर महीन्याला ४०% tax देताना जाम त्रास होतो. हे सगळे पेसे ह्या अशाच फुकट्यांवर सरकार उधळत असते.
अगदी खरं. न्यू झीलंडमधे पण
अगदी खरं. न्यू झीलंडमधे पण हिच परिस्थिती आहे.
इंग्लंडमधल्या लोकांचा आणखी एक आवडता टाईमपास म्हणजे सट्टा. यात अनेकप्रकारच्या लॉटरीज तर आहेतच पण कुत्र्यांच्या शर्यती पण असत. (आताचं माहित नाही.)
भारतातही असे बरेच भत्ते आहेत.
भारतातही असे बरेच भत्ते आहेत. पण इथे भत्ताचारी संस्कृती लोकप्रिय न होण्यामागे सरकारी वेळ काढू पणा जबाबदार आहे. तसेच भत्त्यातून मिळणारी रक्कम फार कमी असल्यामुळे त्याचा फायदा घेणार्यांची संख्या कमी आहे. त्याच बरोबर अज्ञान, राजकीय हस्तक्षेप इतर मुद्देही आहेत.
भारतात मिळणार्या सुशिक्षीत बेरोजगार भत्त्याच्या सहाय्याने एका व्यक्तीला महिनाच्या चरितार्थ चालवणे अवघड आहे.<<<<<+१०० स ह म त.
तीच कथा 'संजय गांधी निराधार' योजनेची! <<<<< पण आपल्याकडे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागतो. मी प्रत्यक्ष एका गरजू स्त्रीला यासाठी रडताना पाहिले होते आणि हफ्ता तो कितीचा ५०० का १००० रुपयांचा. खूप दुख: होते जेव्हा आजूबाजूला असे काही होत असते आणि आपण काहीच करू शकत नाही याचे.
बापरे ! नवीनच माहिती सांगितली
बापरे ! नवीनच माहिती सांगितली चिमणराव आणि इतर पोस्तकऱ्यांनी..!
एकंदर काय तर आपण मध्यमवर्गीय म्हणजे मधला माकड होतो.
वरचे आपल्याला भ्रष्टाचाराने लूटतात तर खालचे भत्ताचाराने .. !!
इथल्या सरकारनेच प्रसिद्ध
इथल्या सरकारनेच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार १० पोरं असलेलं कुटुंब वर्षाला सुमारे ४८ लाखांपेक्षा जास्त रुपये विविध भत्त्यांपोटी कमवू शकतात. >>>
लालु साहेबांना ही माहीती द्यावी म्हणतो
थोड्क्यात इंग्ल्ड अधोगतीच्या
थोड्क्यात इंग्ल्ड अधोगतीच्या दिशेने जात आहे...........कधीतरी जेव्हा सरकारची अर्थव्यवस्ठा ड्बघाईला येइल याना फुकट पोसून तेव्हा हे सगळे भत्ते बंद होतील.......तेव्हा मग अवघड आहे
Pages