खूप बोलायास गेलो, बोलता आलेच नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 7 August, 2012 - 08:10

गझल
खूप बोलायास गेलो, बोलता आलेच नाही!
शल्य हृदयातील कोणा सांगता आलेच नाही!!

माझियाखेरीज सारे लोक बुद्धीमान होते;
वाहत्या वा-यासवे मज वाहता आलेच नाही!

जन्म गेला सर्व माझा राखता मर्जी जगाची;
आपल्या मर्जीप्रमाणे वागता आलेच नाही!

केवढा कर्कश्श होता भोवती गोंगाट माझ्या!
आतले आवाज केव्हा ऎकता आलेच नाही!!

सारखा रस्ता चुकीचा माझिया वाट्यास आला!
बोट रस्त्याचे धरोनी चालता आलेच नाही!

मी तहानेने भलेही जाहलो व्याकूळ होतो;
मृगजळाच्या मागुनी मज धावता आले नाही

आज कळते हे मला की, बिनहिशोबी वागलो मी;
फायदे, तोटे कधीही पाहता आलेच नाही!

मी कधीही भावनांची थाटली आरास नाही!
वेदनांना, आसवांना सजवता आलेच नाही!!

सोयरेही दूर होते, दूर होते सोबतीही;
सोय-यांना, सोबत्यांना जोडता आलेच नाही

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोट रस्त्याचे धरोनी चालता आलेच नाही!>>>>>>>>>छान ओळ
बाकी गझल नेहमीप्रमाणे (.....अर्थात तरीही आवडलीच!!)

क्ष.य.ज्ञ.
धन्यवाद, गझल नेहमीप्रमाणे असूनही आवडून घेतल्याबद्दल!
असाच लोभ असू द्या पामरावर!
......प्रा.सतीश देवपूरकर

अशा मुद्रा कुठून आणतात माहीत नाही म्हणून शब्दात व्यक्त केले!>>>>>

प्रा, साहेब : आपण जेन्व्हा प्रतिसाद टाईप करतो तेन्व्हा त्या चौकटीखाली इन्ग्रजी मजकूर असतो ना त्याखाली निळी ओळ असते पहा त्यावर क्लिक करावे - मग आपल्या नेमक्या भावना व्यक्त करणारी मुद्रा निवडावी ( कॉपी)

आता वरचे बॅक क चे बटन दाबावे.......... अशाने आपण जिथे प्रतिसाद टाईप करत होतो तिथे पोचू -मग ती कॉपी केलेलीमुद्रा हवी तिथे पेस्ट करा

झालं ........कित्ती सोप्पय

अधिक माहिती इथे पहा
http://www.maayboli.com/filter/tips

गझल अतिशय सुंदर आहे. प्रत्यक शेर खासच आवडला.
... ... जीवनामध्ये प्रत्यकास कधी ना कधी अटळपणे येणार्‍या अनुभवाचे हे सहज सुंदर भाष्य आहे.

अर्थाच्या विरोधाभासाने प्रत्यक शेर नेहमीपेक्षा नाविन्यपुर्ण वाटतो.

हा आनंद दिल्याबद्द्ल खुप खुप धन्यवाद देवसर.

वा वा मस्त सूचना बेफीजी
यास्तव शेळीतर्फे आपले अनेक अनेक आभार

काहीका आसेना आता शेळीच्या आगामी रचनेने करमणूक कुणाची होणारय मला सान्गा ....आमचीच ना ?
म्हणून सूचनेबद्दल आभार बेफीजी
(कडब्याचे चार्‍यात रूपान्तर केल्याबद्दल इन्फॅक्ट)
असो पुनश्च आभार

शेळीताई, तुम्ही या 'आलेच नाही' रदीफेऐवजी 'आले कुठे' अशी रदीफ घेऊन कालगंगेत बसवू शकता

धन्यवाद. प्रयत्न केला जाईल.

प्रियाचं दादा-ताई प्रकरण इथेही आलं की काय<<<

प्रमोद देव, तुम्ही अप्रत्यक्षरीत्या प्रियांकाला शेळी म्हणताय Angry

Lol

ते प्रोफेसर आहेत, टी आर पी या टर्मचा त्यांच्यामते असलेला लाँगफॉर्म 'टाईमपास, रिलॅक्स, पॅकअप' असा आहे.

तो वाढणारच Happy