प्रिय मायबोली,
'मैत्री'दिन म्हणताच पहिले आठवली ती तूच ! आपली ओळख तशी अलीकडचीच. माझ्या मनाचा कुठलाही प्रदेश तुला आंदण मिळाला नसतांना आपसुक रुजलेलं आपल्या मैत्रीचं बीज...
तुझी पहिली भेट अजून आठवतेय - गवसणीतून काढलेली सतार असते नं, मैफिलीसाठी जुळवलेली - तशी मनाची अवस्था होती - झंकारण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी आतूर... अन् एका रेखीव क्षणी तू दिसलीस ! एखाद्या कुशल कलावंताच्या सराईत बोटांसारखंच तुझं अस्तित्व मनाच्या तारा छेडून गेलं. त्या साध्या असण्यातून मैत्रीसाठी तू घातलेली साद - काय विलक्षण सम साधली गेली मग !
तू दरवेळी पटलीस असं नाही, दरवेळीच आवडलीस असंही नाही, पण कायम 'आपली' वाटलीस मात्र ! आवडतं गाणं ऐकताना एखाद्या लकेरीशी दरवेळी नव्यानं थबकावं, तशीच तू ! तुझ्यामुळे माझ्याही नकळत मी खूप मोकळी होत गेले...... प्रत्येक क्षणाला सन्मुख होण्यासाठी, प्रत्येक कणाचं स्वागत करण्यासाठी, प्रत्येक नाविन्यामधलं सृजन शोधण्यासाठी, प्रत्येक सौंदर्यामागची सहजता टिपण्यासाठी !
तुझ्यात होतं सुसंवादाच्या सुरेल सुरावटींतून साकारलेलं संगमरवरी शिल्प - 'मैत्री'चं ! सह-अनुभूतीच्या सोज्वळ आभाळातून बरसणारं चांदणं - 'साहचर्या'चं !! हळूहळू मैफल कशी रंगत गेली कळलंही नाही. एखादा कोमल धैवत, एखादा तीव्र निषाद, कधी मंद्र सप्तक तर कधी तार सप्तक... असं जुळवून तू उभी केलेली रागदारी. कधी अवखळ खट्याळ 'अडाणा', कधी दुखरा गहिरा 'मालकंस', तर कधी दरवळणारा 'पूरिया'... विविध प्रहरी / विविध टप्प्यांवर अनेक रुपांत भेटलेली तू...
कधी पहाटेची शुचिर्भूत आरती कधी समुद्राची फेसाळणारी भरती
कधी वैशाखातलं रणरणतं ऊन कधी सायंकाळच्या 'शुभंकरोति'ची धून
कधी थेंबबावरी वळवाची सर कधी ऊन्हातल्या गुलमोहराचा बहर
कधी अळवावरचा पाणमोती कधी सह्याद्रीच्या कातळकठीण भिंती
कधी निरांजनी तेवती सांजवात कधी फुलांनी डंवरलेला पारिजात
कधी द्वितीयेची स्तब्ध चंद्रकोर कधी थुईथुई नाचणारा मोर......
हे असेच कशाकशातून गुणगुणणारे तुझे अस्तित्व......... ज्ञानेश्वरांना अपेक्षित 'मैत्र जीवाचें' चा गर्भरेशमी शेला विणणारे......... त्यात आता माझ्याही मनाचा एक हळवा धागा गुंतलाय..... प्रत्यक्षात आपण रोज भेटू न भेटू, दरवेळीच मनमोकळ्या गप्पा होतील न होतील, पण तुझ्या आठवणींनी मनात जो अहेतुक असा रुणझुण तरंग उमटतो, जो मोगर्याचा सुवास दरवळतो तो चिरंतनच राहील ! आज तुझ्या जीवनगाण्यातील नवा षड्ज आळवतांना तुला खूप खूप शुभेच्छा - तुझ्या पुढील वाटचालीसाठी, तुझ्या प्रत्येक स्वप्नासाठी, ह्या 'मैत्र' चा वेलु गगनावरी जाण्यासाठी !!!
छान ओवी जमलय अगदी छान
छान ओवी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जमलय
अगदी छान शब्दात मांडलयेस सगळं
मला आवडलं, भावलं
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर
सुंदर
छान लिहिलेय खूप... मी
छान लिहिलेय खूप...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी कॉलेजात असताना असे काही लिहून जर........ मैत्रीणींची संख्या जरा आणखी वाढली असती....
खल्लास.... अपुन तो फिदा हो
खल्लास.... अपुन तो फिदा हो गया! (ओवा का लट्टु झाला ते अत्ता कळलं
)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक विनंती ... आता अजिबात थांबु नकोस .... साचुन तर अजिबात राहु नकोस... मुहूर्ताची कुदळ मारलीच आहेस तर झिरपु दे सगळं.... उतरु दे सगळं कागदावर....आणि चिंब भिजवुन टाक आम्हाला
पु. ले. शु.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच ग ओवी..............
मस्तच ग ओवी..............![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शागंशी सहमत.
लिखाणाचा निर्झर आता खळखळून वाहूदे.......
कित्ती सुरेख मांडलय!
कित्ती सुरेख मांडलय!
वा! छान! एकदम ओघवतं झालंय
वा! छान!
एकदम ओघवतं झालंय लिखाण! अशीच लिहीती राहा.
ओवी.... ओळींची बांधणी करतात
ओवी....
ओळींची बांधणी करतात का..जेणे करून लिखाण अजून उठून दिसेल
फारच सुंदर. सुरुवातीची
फारच सुंदर. सुरुवातीची सतारीची उपमा अगदी जमून आलीये. (एकूणच लेख जमलाय, पण मला ती सतारीची उपमा विशेष आवडली)
आवडलं लिखाण. अजून लिहा..
शुभेच्छा
-चैतन्य
मनापासून 'आवडलं'... छान,
मनापासून 'आवडलं'...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान, सुंदर, उत्तम, मस्त...
सोबत 'शुभेच्छा' देखिल...
वा! फारच सुंदर!
वा! फारच सुंदर!
ओवी मस्त गं
ओवी मस्त गं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फार छान लिहल आहे !!!!! मला
फार छान लिहल आहे !!!!! मला फार आवडल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा ! ओवी मस्त लिहीलेस. खुपच
वा ! ओवी मस्त लिहीलेस. खुपच छान ! अशीच लिहीत जा.
ओवे, सुरेख... अगदी आतलं, अगदी
ओवे, सुरेख... अगदी आतलं, अगदी सहज...
<<माझ्या मनाचा कुठलाही प्रदेश तुला आंदण मिळाला नसतांना आपसुक रुजलेलं आपल्या मैत्रीचं बीज>>
....
<<पण तुझ्या आठवणींनी मनात जो अहेतुक असा रुणझुण तरंग उमटतो, जो मोगर्याचा सुवास दरवळतो तो चिरंतनच राहील>
केवळ अप्रतिम
वाह सुंदर , ओवी दाद ने दाद
वाह सुंदर ,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओवी दाद ने दाद दिल्यावर आणखी काय हवे
वा वा खूपच छान
वा वा खूपच छान ओवि..........मस्त लिहिलस........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहिलय.
मस्त लिहिलय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर... मस्तच
सुंदर... मस्तच
किती अलवारपणे मांडलंय - जणू
किती अलवारपणे मांडलंय - जणू श्रावण पहाटेची रेशीम लड - सुगंधी, सुखावणारी, ह्रुद्बंध मोकळे करणारी .....
फार म्हणजे फारच आवडले.......
फारच छान लिहिलंय. पुलेशु.
फारच छान लिहिलंय. पुलेशु.
>>>तू दरवेळी पटलीस असं नाही,
>>>तू दरवेळी पटलीस असं नाही, दरवेळीच आवडलीस असंही नाही, पण कायम 'आपली' वाटलीस मात्र ! आवडतं गाणं ऐकताना एखाद्या लकेरीशी दरवेळी नव्यानं थबकावं, तशीच तू ! तुझ्यामुळे माझ्याही नकळत मी खूप मोकळी होत गेले.....<<<
व्वा
सुंदर
बापरे ओवे कसलं भयंकर
बापरे ओवे कसलं भयंकर लिहीतेस_________/|\ __________ तुला कसं काय सुचतं एवढ अलंकारिक ?
कधी निरांजनी तेवती सांजवात कधी फुलांनी डंवरलेला पारिजात हे मात्र खासंच आयुश्य असच असत या ओळी सारखं, चला भरपूर लिहा आमच्या शुभेच्छा, ![animated-gifs-flowers-052.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u33445/animated-gifs-flowers-052.gif)
मनापासून धन्यवाद मंडळी!
मनापासून धन्यवाद मंडळी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळे श्रेय 'मायबोली' ची सुरेल मैफल सजवणार्या इथल्या दिग्गज कलावंतांचे आणि भरभरून दाद देणार्या समस्त रसिक श्रोत्यांचेच आहे!!
हाय ओवी, कसलं सुंदर लिहितेस ग
हाय ओवी, कसलं सुंदर लिहितेस ग तू. अप्रतीम. खूप आवडलं.
ओवी, अप्रतिम जमलं आहे. सुरेख
ओवी, अप्रतिम जमलं आहे. सुरेख !
होवुनच जावु दे आता. चल हो सुरु.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी मनापासून लिहिलंय, छान
अगदी मनापासून लिहिलंय, छान लिहिलंय.
मायबोलीविषयी प्रेम, आत्मीयता शब्दाशब्दातून जाणवते.
"कधी पहाटेची शुचिर्भूत आरती ........" हेही मस्त जमलंय.
"तुझ्या आठवणींनी मनात जो अहेतुक असा रुणझुण तरंग उमटतो, जो मोगर्याचा सुवास दरवळतो तो चिरंतनच राहील " हे सर्वात आवडलं.
मस्त लिहिलंस गं
मस्त लिहिलंस गं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहलेस गं...
मस्त लिहलेस गं...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages