Submitted by गणेश कुलकर्णी on 3 August, 2012 - 09:17
तुझी याद आली म्हणून...
काल पाऊस पडून गेला!
मजजवळ काल पाऊस रडून गेला!
आता तू म्हणे भिजत नाहीस
हल्ली पहिल्या सारखी चिंब चिंब
काल पाऊस मला बोलून गेला!
तो बरसत, कोसळत असताना...
म्हणे तू आता तुझ्या घराच्या
खिडक्या, दारं बंद करून घेतेस...,
अगदी लगबगीनं!
तेव्हा...,
तुला किती आल्हाददायक वाटायचं वातावरण...
ढग दाटून आले की...!
आता म्हणे...
तुला बरं वाटते
ढग कोरडे असले की!
तेव्हा...,
तुला विजाच्यां कडकडण्याचे
आश्चर्य वाटायचं...,
आता म्हणे तुझ्या घरात वातावरण
होतं घाबरायचे!
तो कधी कधी रिमझिमताना...,
तू चक्क भिजत यायचीस घरी!
आता त्याच्यात आणि तुझ्यात म्हणे...
निर्माण झाली आहे दरी!
********************
मला वाटतं...
बहुधा पावसाला अजुनही माहीती
नसावे ...
की तू आता आई झाली आहेस ते!
********************
गणेश कुलकर्णी (समीप)
********************
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला वाटतं... बहुधा पावसाला
मला वाटतं...
बहुधा पावसाला अजुनही माहीती
नसावे ...
की तू आता आई झाली आहेस ते!<<<
व्व्व्वा व्वा
जय गणेश, शेवट सुंदरच केलात
|| चिंब चिंब आजुनी भिजलो
|| चिंब चिंब आजुनी भिजलो नाही
पाउस कधीचा पडतो आहे
तू तेव्हाच निघून गेली तरीही
अंतरी अजुनी स्मरतो आहे
तू नसताना अवती भवती
चिखल होऊनी मुरतो आहे
दिसला मग तो रंगीत इंद्रधनू
तरीही बेरंग होऊनी झुरतो आहे
थेंबांनी केली कुजबुज आणि भानावरती आलो
पण आतातर पाउस कधीचा सरतो आहे
तू येशील ह्या सावळ्या ढगांप्रमाणे
म्हणून पानांवारुनी गळतो आहे ||
अर्पित
अप्रतिम
अप्रतिम