अक्का, अ‍ॅलिस आणी मी!

Submitted by ट्यागो on 29 July, 2012 - 14:34

प्रत्येकाला दादरला जायचंय
दादरलाच
लास्ट डेस्टीनेशन
काय ’फकिंग’ आहे तिथं?
कुणास ठाऊक
कुठला बंगाली बाबा
कुठली पुस्तकांची दुकानं
सेंट्रल-वेस्टर्नचा रूट
पुण्यासाठी गाड्या
भाजीपाला, फळं, फुलं
बारसं-बाराव्याचं सामान
देव-देव्हार्‍याच्या गोष्टी
कंपन्यांची ऑफिसं
की अजून काही

मला गाडी पकडता येते
अगदी पर्फ़ेक्ट
म्हणजे ८.२२ ची लोकल
७.३७ ला घर सोडल्यावर मिळतेच
सेकंदाचाही फरक नाही
दोनेक सेकंद चुकलीच
तर दोन कोटी सेकंदाचा मारा
पण असं हल्ली होऊनच नाही देत
एकदम अ‍ॅक्युरेट
इतकंच नाही
गर्दीही येते सर करता
कुठल्या सेकंदाला उचलायचा
कोणता पाय
अन कुठे धरुन ढोसायची गर्दी
कसं शिरायचं सुमकन झूमकरीत
उतरतानाही तीच अ‍ॅक्युरसी
गाडी थांबल्यावर जसं आपण चढत नाय
तसंच उतरतही
दोन्ही कामं ती धावतानाच
गणित अगदी पक्कं

पयले सवाल पडताथा
How to survive here?
पण आता नाय
’बच्चायेस भडव्या अजून, पण शिकवेल हे शहर’
असं म्हणायचंच कुणीनकुणी
आणि खरंच
तेव्हापासून मरु लागली माझी अ‍ॅलीस
हळूहळू
मेलीच!
इथेच
इथेच कुठेतरी
कुठल्याश्या उपनगरात
गटारात, रस्त्यात
वा बहुधा ह्या ट्रॅकवरच
ज्यावरून वाहतात ह्या लोकली, एक्सप्रेसी, मालगाड्या
ज्यांवर हगतात कुंपणापलीकडले
ओकतात गर्दुल्ले
तिथंच
इथंच कुठंतरी

गर्दीला चेहरा घाईचा
पदर ढळतो बाईचा
कैक ढुंगणांचा एकत्रित लाँग मार्च
लै प्रश्न पडलेले आवडत नाय ह्या शहराला
मग
भजनीमंडळं दंगात गातात
जुगारी पत्ते
डोअर लटके जोषात
"ए आयटम, ए पांडू, ..गिरा देख, ओ भय्या.. चलो..चलो..चलो..चलो..चलो"
नुसतं ओरडायचं, केकटायचं
कैच नाय जमलं
तर झोपायचं उभ्या-उभ्याच
एखाद्याच्या वा स्वत:च्या
पाठीवर, खांद्यावर डोकं लटकत ठेवून
पुसायचा घाम विनाकारण
दुसर्‍याचं घामेजलं कपाळ पाहून
किंवा
दुसर्‍याच्याच पाठीत दंडावर घुसळायचं
घामेजलेलं डोकं, कपाळ, गाल, काहीही
चिकटवायचं ताठर-माठर पौरुष
घसघस घासत
काढायचा कुठलासा त्रागा, धागा
ओकायचा शिल्लक असलेला

पुन्हा धावायचं बसमध्ये
टॅक्सीत, रिक्षात, पाया-पायात
संपवायचा दिवस, वेळ
बघायची घड्याळं
स्टेशनांवरली
हातातली
इमारतींवरची
मोबाईल, लॅपटॉप कशातलीही
५.०३ ची लोकल सोडायची नैइच
नायतर भीती 'जास्त दाबले' जाऊ ची
हल्ली फुकटाची मालीश म्हणून
जास्त गर्दी आवडतेच

फर्स्टक्लासच्या डब्यात
त्याच्यासोबत ती
कुणीतरी कुस्करु पाहतं मग
कुठूनतरी हात काढून
कुणीतरी अघळ-पघळ-अंगलट
तोही मजा घेतो अन तीही!
प्रचंड दबलेलं असं
उफ़ाळून येतं काही
तोच भेसूरपणा ज्याच्या-त्याच्यात
सुप्त लैंगिकता, वासना, विकृती इ.इ.
काहीही
विरेचनाचे शॉर्टकट्स
की मोकळं व्हायची ऊर्मी
लै टायमाचं काम भंपाक
सगळं कसं झटाककन पटाकन
हे सगळीकडेच
मरीन ड्राईव्ह, बीचेस, देवळं, कोपरे, कोपचे, बागा, टॅक्स्या, रिक्षा, गाड्या
उघड्यावर, गर्दीत कुठेही
घट्टपणे चोखाळतात हे मार्ग
हे, ते, तो, ती, तू , मी..
म्हणून ती कण्हते
तो ओरडतो
ते हसतात
त्या खिदळतात
एक पाशवी खेळ
सदैव चालूच

हे ठाणं, कल्याण, वसई, विरार, डोंबिवली,
ह्या रांडा
मुंबईनं ठेवलेल्या
अजून कैक येतायेत, होतायेत, वाढतायेत
मुंबई ह्यांची अक्का
सगळ्यांचीच
माझीही!

मयुरेश चव्हाण, मुंबई.
२७.०७.२०१२, २१.१२.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीधप:
अत्यंत आदरपूर्वक प्रत्त्युत्तर देत आहे. श्री. ट्यागो यांच्या रोखठोक कवितेबद्दल माझा आक्षेप नाही. काही प्रमाणात मला ही कविता आवडलीही. मात्र या कवितेतील काही शब्द पब्लीक फोरमवर उघडपणे यावेत अशा पात्रतेचे नाहीत असे माझे मत आहे. आपण म्हणता तशा सर्वच कविता गोडगोड नाहीत. खूपशा कवितांमधून विचाराला चालना मिळते. प्रस्तुत कवितेतील भडक शब्दांचा वापर मला खटकला व त्या शब्दांमुळे कवितेचा दर्जा घसरला असे मला प्रामाणिकपणाने वाटले. मी ’कविता अगदी वाईट आहे’ असा प्रतिसादही लिहीला पण मी मूलत: सौम्य प्रकृती असल्याने इतका harsh प्रतिसाद लिहीणे योग्य नाही असे वाटून मी तो परत घेतला. सर्व प्रतिसाद पहाता ही कविता आवडलेले लोकच अधिक आहेत व माझ्यासारखा एखादाच आहे. कदाचित साठी ओलांडल्यावर मी सध्याच्या जगतातील रसिकतेपासून दूर गेलो असण्याची शक्यता आहे. मी इतरांच्या प्रतिसादाबद्दल निराश झालो ते एकाददुसरा अपवाद वगळता, कुणीही मला गैर वाटलेल्या शब्दांबद्दल एक शब्दही लिहिला नाही यामुळे. अर्थात त्याचेही कारण ’माझे मागासलेपण’ आहे हे मला आता समजले आहेच.
आपण स्वत: उच्चविद्याविभूषिता आहात. पण श्री वैद्यबुवा यांनी जे चुकीचे मत चुकीच्या पद्धतीने मांडले त्याबद्दलही आपण काहीच लिहिले नाहीत. उलट एका प्रकारे त्यांना उत्तेजनच दिलेत. दुस-यांच्या प्रतिसादांबद्दल अंडी उबवत बसण्याबद्दल त्यांनी जे लिहिले तेच त्यांनी माझ्या प्रतिसादासंदर्भात केले नाही का?
असू. हे सर्व जाऊदे. मायबोलीवरील सर्वांविषयी मला प्रेमच वाटते. व माझे सदैव आशिर्वादच रहातील.
आपला नम्र,
प्रद्युम्नसंतु

मात्र या कवितेतील काही शब्द पब्लीक फोरमवर उघडपणे यावेत अशा पात्रतेचे नाहीत असे माझे मत आहे. <<<
बोल्ड केलेला शब्द महत्वाचा.

आपण म्हणता तशा सर्वच कविता गोडगोड नाहीत. खूपशा कवितांमधून विचाराला चालना मिळते. <<<
हेही तुमचेच मत आहे. माझे मत याच्या विरूद्ध आहे. काय करणार.

>>> मी इतरांच्या प्रतिसादाबद्दल निराश झालो ते एकाददुसरा अपवाद वगळता, कुणीही मला गैर वाटलेल्या शब्दांबद्दल एक शब्दही लिहिला नाही यामुळे. <<<
हे नाही पटलं. तुम्हाला गैर वाटलेले शब्द अनेकांना नसतील गैर वाटले. अनेकांनी ते शब्द नुसतेच शब्द म्हणून न बघता संपूर्ण मूड, आशय या सगळ्याकडे एकत्रित बघितले असेल. कदाचित आशयाशी प्रामाणिक रहाण्यासाठी, त्यातल्या भावना योग्य प्रकारे व्यक्त होण्याच्या दृष्टीने तेच शब्द योग्य आहेत असंही अनेकांना वाटले असेल. निराश होण्यासारखं काय आहे यात?

इथे कुणीच तुम्हाला मागासलेले म्हणत नाहीये. तुम्ही ठणकावून तुमचं मत सांगा हो. कुणी अडवलंय. 'एकदम ब्येक्कार आहे कविता!' असंही म्हणा. कुणाला फरक पडत नाही. अनेकांना आवडली आणि तुम्हाला आवडली नाही. ठिके की. बिघडलं कुठं?

माझं उच्चविद्याविभूषिता (डोंबल!) असणं इथे कसं काय आडवं आलं. मला दहावी पास समजलात तरी चालेल.

सहीच्च..!! खुप दिवसांनी डोळ्यावरची झापडं गळून काही थेट पोचणारं वाचायला मिळालं, इतकं नेमकं कसं मांडता येतं तुला..!! Happy शुभेच्छा

मी पण , मी पण

मायबोलीवरील सर्वात दर्जेदार साहीत्य इथे मिळेल. इतर ठिकाणी फिरकूही नका Biggrin
http://www.maayboli.com/user/24727/created

मत नव्हे निर्णय ( पत्र नव्हे मित्र च्या चालीवर वाचावे )

( कौ, धुंद रवी, क्रांतितै, प्राजु, दाद, ट्युलिप आणि इतरांची क्षमा मागून )

Pages